Daily Loksatta Quiz : 1 March 2018
प्र.1) आंतरराष्ट्रीय
नाणेनोधीच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2018 मध्ये _______% तर 2019 मध्ये ______% नी वाढेल.
1) 7.2%, 7.4%
2) 7.4%, 7.8%
3) 7.4%, 7.2%
4) 7.8%, 7.4%
प्र2) स्टेट बँक ऑफ
इंडियाने मुदतठेवीवरील व्याजदर नुकतेच वाढविले आहेत. ही वाढ __
a) एक
ते दोन वर्षांपर्यंत मुदतच्या ठेवीवरील व्याजदर 0.15 टक्क्याने वाढवून वाढून ते
वार्षिक 6.40% झाले आहे.
b) 2
ते दहा वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 0.5 टक्क्यांनी वाढून वार्षिक
6.50% झाले आहे.
योग्य विधान ओळखा
1) फक्त
a
2) फक्त
b
3) a व b दोन्ही
4) दोन्ही
चूक
प्र.3) राज्य
शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचार्यांना 1 जुलै 2017 पासून किती टक्के महागाई
भत्तावाढ जाहिर करण्यात आली आहे?
1) 2%
2) 3%
3) 4%
4) 5%
प्र.4) 2018
सालीसाठीचे ‘द क्यू एस वर्ल्ड युनिव्हार्सिटी रॅंकिंग’ जाहीर करण्यात आली असून त्यासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
a) पहिल्या
50 यादीमध्ये केवळ 2 भारतीय संस्था आहेत.
b) यावर्षी
केवळ 20 भारतीय संस्था ‘सर्वोच्च 100’ च्या यादीत आहेत.
c) ‘इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी’ या
विषयाने सर्वोत्तम कामगिरी केली.
पर्याय :-
(1) फक्त
a
(2) फक्त
b
(3) फक्त
c
(4) यापैकी
नाही
प्र.5) राधेशाम
मोपलवार यांची ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’च्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मोपलवर यांच्या
काही वादग्रस्त ध्वनिफिती आणि सीडी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस
यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय समितीची
स्थापना केली होती?
(1) न्या.
सुधीर नाईक
(2) वसंत
देवकते
(3) जॉनी
जोसेफ
(4) सुधीर
पानधरे
प्र.6) मेक इन इंडिया
अंतर्गत आजवरची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात झाली?
(1) संरक्षण
क्षेत्र
(2) वाहन
क्षेत्र
(3) कृषी
क्षेत्र
(4) यापैकी
नाही
प्र.7) जागतिक आरोग्य
संघटनेच्या 2016 च्या महितीनुसार भारतातील एकूण लोकसंख्येतील किती टक्के लोक
मधुमेहाने ग्रस्त आहेत?
(1) 7.8%
(2) 10.5%
(3) 13.15%
(4) 16.3%
प्र.8) राज्यघटनेत
दुरूस्ती करून सहा ते चौदा वयोगटांतील मुलांना मोफत शिक्षण मिळण्याचा मूलभूत
अधिकार 2002 साली बहाल करण्यात आला. त्याला अनुसरून कोणत्या वर्षी शिक्षण हक्क
कायदा मंजूर झाला?
(1) 2005
(2) 2006
(3) 2008
(4) 2009
प्र.9) निऑन या
निष्क्रिय मूलद्रव्याबद्दल योग्य विधाने ओळखा.
a) द्रवीभूत
निऑन शितक म्हणून वापरतात.
b) निऑनची
शितक क्षमता ही द्रवीभूत हेलियम पेक्षा दुप्पट आहे.
c) निऑनचा
वापर हेलियमसोबत बारकोड डिटेक्टरच्या लेसरमधेही वापरतात.
योग्य पर्याय निवडा
(1) फक्त
a
व b बरोबर
(2) फक्त
b
व c बरोबर
(3) फक्त
a
व c बरोबर
(4) a, b, c सर्व बरोबर
प्र.10) पुढे
महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग व त्यांचे लोकसंख्या प्रमाण (2011 च्या
जनगणनेनुसार) दिले आहे. त्यापैकी चुकीची जोडी ओळखा.
a) कोकण
i) सुमारे 25%
b) पश्चिम
महाराष्ट्र ii) सुमारे 25%
c) विदर्भ
iii) 20%
d) मराठवाडा
iv) 16.7%
e) खानदेश
v) 12.5%
योग्य पर्याय निवडा
(1) फक्त
a
व b
(2) फक्त
c
(3) फक्त
e
(4) यापैकी
नाही
प्र.11) चुकीचे विधान
ओळखा
a) सन
2012 च्या आकडेवारी नुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गरिबांचे प्रमाण सर्वांत
कमी आहे. (सुमारे 9%)
b) खानदेश
आणि विदर्भामध्ये हेच प्रमाण 29 % आहे.
c) मराठवाड्यामध्ये
गरीबीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
पर्याय :-
(1) फक्त
a
(2) फक्त
b
(3) फक्त
c
(4) यापैकी
नाही
उत्तरे
:-
1) 7.4%, 7.8%, 2) दोन्ही बरोबर, 3) 3%, 4)
फक्त a (पहिल्या 50 मध्ये 3 भारतीय संस्था आहेत.), 5) जॉनी जोसेफ (निवृत्त मुख्य सचिव), 6) वाहन
क्षेत्र, 7) 7.8%, 8) 2009, 9) फक्त a व c बरोबर (निऑनची
शितक क्षमता ही द्रवीभूत हेलियम पेक्षा 40 पट आहे.), 10)
यापैकी नाही, 11) फक्त c (मराठवाड्यात
सुमारे 22% गरीबीचे प्रमाण आहे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत