• New

    जागतिक हवामान परिषदेला सुरुवात


    जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये आणखी घट करण्याचे संवेदनशील उद्दिष्ट बाळगलेल्या जागतिक हवामान परिषदेस सोमवारी दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये सुरुवात झाली.
    ही परिषद १२ दिवस चालणार असून, भारतासह १९० हून अधिक देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.
    ●प्रदुषणाच्या अन्य स्त्रोतांसह कोळसा आणि पेट्रोल यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाच्या होणा-या हानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक हवामान करार करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून राष्ट्रसंघाकडून प्रयत्न सुरू आहेत.
    ●२०१५ मध्ये पॅरिस येथे होणा-या हवामान परिषदेमध्ये यासंदर्भातील करार पूर्णत: संमत करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रसंघाने ठेवले आहे. 
    ●पॅरिस परिषदेच्या आधी, २०१५ वर्षाच्या पूर्वार्धामध्ये जागतिक हवामान बदलाविरोधात करावयाच्या उपाययोजनेची माहिती या परिषदेमध्ये विविध देश मांडणार आहेत. या हवामान करारासंदर्भात करावयाच्या वाटाघाटींसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय भारतीय शिष्टमंडळ लिमामध्ये दाखल झाले आहे.
    ●मुंबई आणि कलकत्ता या समुद्रकिना-यावरील शहरांना या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पुरामुळे मोठी जीवितहानी व प्रचंड नुकसानास सामोरे जावे लागण्याची भीती या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रसंघाच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे ही हवामान परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad