हिंदुजा समूहाने घेतली लंडनमधील ऐतिहासिक इमारत
-हिंदुजा समूहाने 11क्क् खोल्यांची सेंट्रल लंडनमधील ‘ओल्ड वॉर ऑफिस’ ही ऐतिहासिक इमारत 25 वर्षाच्या भाडेपट्टय़ाने घेतली आहे.
- हे वारसास्थळ पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि रहिवासी अपार्टमेंटमध्ये रुपांतरित करण्याची योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत असलेल्या हिंदुजा बंधुंनी ओब्रास्कॉन हुआर्ते देसारोलोस या स्पॅनीश कंपनीसोबत मिळून ही इमारत भाडेपट्टय़ावर घेतली आहे.
- ही ऐतिहासिक इमारत ब्रिटिश संसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असून सात मजले मिळून तिचे एकूण क्षेत्र पाच लाख 8क् हजार स्क्वेअर फूट आहे.
- युद्धकाळातील तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल या इमारतीत राहात होते व त्यांनी दुस:या महायुद्धातील अनेक डावपेच याच इमारतीत आखले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत