●भारताचे बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना इतर 11 नोबेल विजेत्यासह नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले .
●नोबेल विजेते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम व नॉव्रेची राजधानी ओस्लो येथे नोबेल पुरस्कार दिले .
●माझा पुरस्कार भारतातील मुलांना अर्पण असे सत्यार्थी यानी म्हटले असून वेळोवेळी मुलांच्या हक्कांबाबत जलद न्यायालयात निकाल देणा:या भारतीय न्यायव्यवस्थेचेही त्यानी कौतुक केले आहे.
नोबेल विजेते
1) साहित्याचे नोबेल-फ्रान्सचे साहित्यिक पॅट्रिक मोदियानो यांना.
2) वैद्यकीय नोबेल-अमेरिकन ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन ओ कीफी, नॉव्रेचे पती-प}ी एडवर्ड व मे ब्रिट मोसर यांना
3) भौतिक शास्त्रचे नोबेल-जपानी शास्त्रज्ञ इसामु अकासाकी, हिरोशी अमानो , जपानी अमेरिकन शुजी नाकामुरा यांना
4) रसायनशास्त्रचे नोबेल-अमेरिकेचे एरिक बेटङिाग व विल्यम मोरेनर व जर्मन शास्त्रज्ञ स्टीफन हेल यांना
5) अर्थशास्त्रचे नोबेल -फ्रान्सचे जॉन तिरोल यांना
कैलास सत्यार्थी
* जन्म: 11 जानेवारी 1954
* मूळ गाव: विदिशा (मध्य प्रदेश).
* तरी 1980 मध्ये त्यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या "बचपन बचाव आंदोलन‘ने 80 हजारांवर मुलांना बालकामगाराच्या जोखडातून मुक्त करून त्यांचे पुनर्वसन, उत्कर्ष आणि शिक्षण यावर भर दिला आहे.
* सव्विसाव्या वर्षी भोपाळमधील विद्युत अभियांत्रिकीतील प्राध्यपकीला रामराम ठोकून मुलांना कामगाराच्या जीवनातून बाहेर काढून जीवन फुलवण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. * आजमितीला त्यांच्या नेतृत्वाखालील "ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर‘ हा महासंघ कार्यरत आहे.
*त्यांच्या कार्याचा पसारा 140 देशांमध्ये असून, दोन हजारांवर संघटना त्याच्या सदस्य आहेत.
* "साऊथ एशियन कोऍलिशन ऑन चाइल्ड सर्व्हिटूड‘ (सॅक्स) या दक्षिण आशियातील भारतासह बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ या देशांत काम करणाऱ्या संस्थेची त्यांनी 1989 मध्ये स्थापना केली. संस्थेने 40 हजारांवर बालकामगारांची मुक्तता केली आहे.
* त्यांनी बालकामगारांच्या पुनर्वसनाचे धोरण राबवले, त्यासाठी राजस्थानात "बालआश्रमा‘ची उभारणी केली.
* 1998 मध्ये सत्यर्थींनी 103 देशांमध्ये बालकामगारविरोधी जागतिक मार्च आयोजित केला होता. त्यात 20 हजार नागरी हक्क संघटना आणि पाऊण कोटीवर नागरिक सामील झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत