म्यानमारच्या अध्यक्षपदी तिन क्याव विराजमान
लष्करी राजवटीकडून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या म्यानमारच्या अध्यक्षपदी तिन क्याव यांनी शपथ घेतली.
लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचे विश्वासू सहकारी असले तिन क्याव यांनी माजी लष्करप्रमुख थेन सेन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
स्यू की यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास लष्करी राजवटीदरम्यान करण्यात आलेल्या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे स्यू की यांनी आपले विश्वासू सहकारी असलेल्या तिन क्याव यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती.
स्यू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे तिन क्याव यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली.
# स्यू की परराष्ट्रमंत्रिपदी :
स्यू की यांनीही परराष्ट्रमंत्रिपदाची शपथ घेतली.
मंत्रिमंडळात लष्कराचे प्रतिनिधित्व करणारे तीन मंत्री आहेत. त्यामुळे म्यानमारच्या मंत्रिमंडळावर लष्कराची अद्यापही काही प्रमाणात छाप असल्याचे यातून स्पष्ट झाले
नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये स्यू की यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत