स्वच्छ भारत मोहिमेसाठी जागतिक बॅंकेची मदत
# स्वच्छ भारत मोहीम या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी जागतिक बॅंक 1.5 अब्ज डॉलरची (सुमारे 10 हजार कोटी रुपये) मदत करणार आहे.
# जागतिक बॅंक कर्जाच्या रूपाने ही मदत करणार आहे.
# 2019पर्यंत उघड्यावरील शौचाची समस्या संपविण्याच्या हेतूने बॅंकेने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
# त्याशिवाय जागतिक बॅंक काही राज्य सरकारांना तांत्रिक सहकार्य म्हणून 2.5 कोटी डॉलर (सुमारे 160 कोटी रुपये) देणार आहे.
#जागतिक बॅंकेचे भारतातील संचालक ओन रूहल व अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाचे सहसचिव राज कुमार यांनी या संदर्भातील करारावर सह्या केल्या.
# स्वच्छ भारत अंतर्गत पाच वर्षांदरम्यान ग्रामीण विकासावर ही रक्कम खर्च केली जाईल.
#या काळात जागतिक बॅंक रक्कम खर्च झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील कामांचे मूल्यांकनही करणार आहे.
#जागतिक बॅंकेच्या म्हणण्यानुसार, या रकमेतून ग्रामीण भागातील 60 टक्क्यांपेक्षा अधिक गरजू लोकांपर्यंत स्वच्छतेच्या सुविधा पोचविल्या जातील.
# स्वच्छता मंत्रालय या रकमेतून होणाऱ्या कामांवर देखरेख ठेवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत