Daily Loksatta Quiz : 2 March 2018
प्र.1) ‘फ्यूगिटिव्ह
इकनॉमिक ऑफेंडर्स बिल 2018’ या विधेयकाबाबत योग्य विधाने
ओळखा.
a)
आर्थिक घोटाळे करून परदेशात जणार्यांची
देशातील संपत्ती जप्त करण्याचे अधिकार यामुळे सरकारला मिळणार आहेत.
b)
या विधेयकात आर्थिक गैरव्यवहार करून विदेशात
पळ काढणार्यांची व्याख्या ‘बँकिंग नियमन कायद्याप्रमाणे’ असेल अशी तरतूद आहे.
योग्य पर्याय निवडा
(1)
फक्त a
(2)
फक्त b
(3)
दोन्ही
(4)
दोन्ही नाही
प्र.2) अरबी
समुद्रात उभारण्यात येणार्या आणि अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या छत्रपती शिवाजी
महाराज स्मारकाचे काम कोणत्या कंपनीला देण्यात आले आहे?
(1)
टाटा स्टील
(2)
लार्सन अँड टर्बो
(3)
पॉस्को
(4)
यापैकी नाही
प्र.3) अरबी
समुद्रात उभारण्यात येणार्या छत्रपती
शिवाजी महाराज स्मारकाबाबतीत चुकीचे विधान ओळखा.
(1)
या प्रकल्पांतर्गत 210 मीटर उंचीचा शिवाजी
महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.
(2)
हा पुतळा जगातील सर्वांत उंच पुतळा ठरणार आहे.
(3)
हे स्मारक 6.8 हेक्टर क्षेत्र असालेल्या
बेटावर उभारण्यात येणार आहे.
(4)
हे स्मारक लार्सन आणि टर्बो ही कंपनी दीड
वर्षांत उभारणार आहे.
प्र.4) ‘स्टेट
फॉरेस्ट रीपोर्ट 2017’ या अहवालानुसार भारताचे एकूण
वनक्षेत्र 7 लाख 8 हजार 273 चौकिमी आहे. ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ________ % आहे.
(1)
24.54%
(2)
23.54%
(3)
22.54%
(4)
21.54%
प्र.5)
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
a)
70% किंवा अधिक घनता असलेल्या जंगलांना ‘अत्यंत
घनदाट’ असे संबोधले जाते.
b)
40% पेक्षा अधिक व 70% पेक्षा कमी घनता असणार्या
जंगलांना ‘मध्यम दाट’ असे संबोधले जाते.
c)
10% पेक्षा अधिक व 40% पेक्षा कमी घनता असणार्या
जंगलांना ‘विरळ जंगल’ असे संबोधले जाते.
पर्यायी उत्तरे
(1)
फक्त a
(2)
फक्त b
(3)
फक्त c
(4)
यापैकी नाही
प्र.6) स्टेट
फॉरेस्ट रीपोर्ट 2017 नुसार घनदाट जंगलांच्या प्रमाणात 2015 च्या तुलनेत ________ या राज्यामध्ये सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे.
(1)
आंध्र प्रदेश
(2)
कर्नाटक
(3)
केरळ
(4)
ओडिशा
प्र.7) ‘स्टेट
ऑफ फॉरेस्ट रीपोर्ट 2017’ नुसार वनाच्छाद आणि वृक्षाच्छादन
यामध्ये सर्वाधिक घट कोणत्या राज्यात झाली आहे?
(1)
नागालँड
(2)
मिझोराम
(3)
अरुणाचल प्रदेश
(4)
त्रिपुरा
प्र.8) पुढील
विधानांचा विचार करा
a)
‘इस्लामिक हेरिटेज : प्रमोटिंग अन्डरस्टँडिंग अँड मॉडरेशन’ ही परिषद नुकतीच हैद्राबाद येथे पार पडली.
b)
या परिषदेला जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे
हजर होते.
वरीलपैकी कोणते विधान
चुकीचे आहे?
(1)
फक्त a
(2)
फक्त b
(3)
दोन्ही
(4)
दोन्ही नाही
प्र.9)
चंद्रावर पुढील वर्षापर्यंत फोर जी नेटवर्क सेवा सुरू करण्यात येणार असल्याची
घोषणा कोणत्या टेलीकॉम कंपनीने केली आहे?
(1)
एयरटेल
(2)
वोडाफोन
(3)
टेलिनॉर
(4)
बीटफोन
प्र.10)
कोणत्या खेळाडूला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम पुनरागमन करणारा खेळाडू
असे दोन्ही लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कार मिळाले आहेत?
(1)
राफेल नदाल
(2)
ख्रिस्तीयानो रोनाल्डो
(3)
रॉजर फेडरर
(4)
अँडी मरे
उत्तरे :-
1) फक्त a (या
विधेयकातच व्याख्या दिली आहे), 2) लार्सन अँड टर्बो, 3) 4 (तीन वर्षांत), 4) 21.54 %, 5) यापैकी नाही , 6) आंध्र प्रदेश (2015 पेक्षा
देशात 1.36% वाढ, सर्वाधिक घनदाट जंगलात वाढ :- आंध्र प्रदेश,
कर्नाटक, केरळ, ओडिशा,
तेलंगणा), 7) मिझोराम (क्रम :- मिझोराम,
नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय), 8) फक्त a
(दिल्ली येथे ही परिषद पार पडली), 9) वोडाफोन,
10) रॉजर फेडरर (वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला – सेरेना विल्यम्स, सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू –
गोल्फपट्टू सर्जी गार्सिया)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत