Daily Loksatta Quiz : 3 March 2018
प्र.1) खालीलपैकी
कोणत्या देशकडून भारत 36 रफाएल लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?
(1)
इस्राइल
(2)
रशिया
(3)
फ्रान्स
(4)
अमेरिका
प्र.2) कोणत्या
वर्षापर्यंत शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे?
(1)
2019
(2)
2020
(3)
2022
(4)
2025
प्र.3)
महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे?
(1)
सातारा
(2)
सांगली
(3)
नागपूर
(4)
अमरावती
प्र.4) योग्य विधान
ओळखा
a)
‘हाऊ इंडिया सीज द वर्ल्ड – कौटिल्य टु द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ हे श्याम सरन यांचे पुस्तक आहे.
b)
श्याम सरन हे भारताचे माजी संरक्षण सचिव आहेत.
c)
सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे
अध्यक्ष आहेत.
पर्याय
(1)
फक्त a व b
(2)
फक्त b व c
(3)
सर्व a, b व c
(4)
फक्त a व c
प्र.5) यूएनएफसीसीसी
(UNFCCC) चे खालीलपैकी योग्य पूर्णरूप ओळखा.
(1)
यूनायटेड नेशन्स फंड कन्व्हेंशन ऑन क्लायमेट
चेंज
(2)
यूनायटेड नेशन्स फंड कन्व्हेंशन ऑन चिल्ड्रेन
केएर
(3)
यूनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन
क्लायमेट चेंज
(4)
यूनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन
चिल्ड्रेन केएर
प्र.6) प्रसिद्ध
वैज्ञानिक ‘गुंथर ब्लोबेल’ यांचे इतक्यात निधन झाले. त्यांच्याबद्दल
योग्य विधान ओळखा.
a)
1999 मध्ये त्यांना वैद्यक शास्त्राचा नोबेल
पुरस्कार मिळाला होता.
b)
पेशींच्या अंतर्गत भागामध्ये मेदांच्या
हालचालीशी संबंधित संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.
c)
1997 मध्ये त्यांना विज्ञान संशोधनात
न्यूयॉर्कच्या महापौरांचा पुरस्कार मिळाला.
d)
दुसर्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतून
अमेरिकेत आले होते.
योग्य पर्याय निवडा
(1)
केवळ a, b व c बरोबर
(2)
केवळ b, c व d बरोबर
(3)
केवळ a, c व d बरोबर
(4)
a, b, c, d सर्व बरोबर
प्र.7) फेब्रुवारी
2018 मध्ये खालीलपैकी कोणत्या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या?
a)
त्रिपुरा
b)
मणीपुर
c)
नागालँड
d)
मेघालय
योग्य पर्याय निवडा
(1)
a, b, c
(2)
b, c, d
(3)
a, c, d
(4)
a, b, d
प्र.8) ‘आशियाई
कुस्ती स्पर्धेबाबत’ चुकीचे विधान ओळखा
(1)
या स्पर्धेत नवज्योत कौरने 65 किलो गटात
सुवर्ण पदक जिंकले.
(2)
या स्पर्धेत साक्षी मलिकने 62 किलो गटात
कांस्य पदक जिंकले.
(3)
या स्पर्धेत विनेश फोगटने 50 किलो गटात रौप्य
पदक जिंकले.
(4)
संगीता कुमारीने 59 किलो गटात रौप्य पदक
जिंकले.
प्र.9) योग्य विधान
ओळखा
a)
व्यंकटेश प्रसाद यांनी कनिष्ठ राष्ट्रीय
क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे.
b)
ते माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज आहेत.
c)
त्यांनी 33 कसोटी आणि 161 एकदिवस्यीय
सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
पर्यायी उत्तरे
(1)
फक्त a व b योग्य
(2)
फक्त b व c योग्य
(3)
फक्त a व c
योग्य
(4)
सर्व विधाने योग्य
उत्तरे :-
1) फ्रान्स,
2) 2022, 3) सातारा (देगाव येथे), 4) फक्त a
व c (श्याम सरन हे माजी परराष्ट्र सचिव आहेत.),
5) यूनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन क्लायमेट चेंज,
6) केवळ a, c व d बरोबर
(पेशींच्या अंतर्गत भागामध्ये प्रथीनांच्या हालचालीशी संबंधित संशोधनाबद्दल
त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.), 7) a,c,d, 8) 4 (सिंगीता
कुमारीने कांस्य पदक जिंकले. नवज्योत कौर
या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.), 9) सर्व विधाने योग्य आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत