अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर
- भारताच्या श्रीमंतीत आता वाढ झाली असून अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
- 'फोर्ब्स'च्या अब्जाधीशांच्या यादीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
- पहिले तीन देश :-
- अमेरिका
- चीन
- भारत
- 'फोर्ब्स'ने जारी केलेल्या यादीनुसार भारतात एकूण 19 नवे अब्जाधीश आहेत.
- मागील वर्षी भारतातील अब्जाधीशांचा आकडा 102 वर गेला होता. यामध्ये आता वाढ होऊन हा आकडा 121 वर गेला आहे.
- अमेरिकेत सर्वाधिक ५८५ आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत.
- 'फोर्ब्स'ने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज 112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत.
- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची संपत्ती मागील वर्षीच्या तुलनेत 1.09 लाख करोड रूपये (16.9 अब्ज डॉलर) वाढली आहे. सध्या त्यांची संपत्ती 2.60 लाख करोड रूपये (40.1 अब्ज डॉलर) इतकी आहे.
- जागतिक पातळीवर श्रीमंतीत मुकेश अंबानी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर पोहचले आहेत. २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते.
- लक्ष्मी मित्तल हे यापूर्वी भारतातील श्रीमंतीत दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, आता अझीम प्रेमजी यांनी त्यांना मागे टाकत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसरा क्रमांक मिळवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत