• New

    ऑस्कर पुरस्कार 2018


    हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला, अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. यंदा गईलर्मो डेल टोरोचा 'द शेप ऑफ वॉटर' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले. डार्केस्ट अवर चित्रपटासाठी गॅरी ओल्डमॅन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी चित्रपटातील अभनयासाठी फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.


    ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची यादी :- 

    • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जॉने (आय, टॉन्या)
    • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
    • सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) - द सायलेंट चाईल्ड
    • सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट - हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405
    • सर्वोत्कृष्ट संकलन - डंकर्क
    • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर 2049
    • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर - कोको
    • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - डिअर बास्केटबॉल
    • सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट - अ फँटॅस्टिक वुमन (चिली)
    • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन - द शेप ऑफ वॉटर
    • सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण - डंकर्क
    • सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन - डंकर्क
    • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर - इकरस
    • सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टम थ्रेड
    • सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा - डार्केस्ट अवर
    • सर्वोत्कृष्ट दिगिदर्शन - गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
    • सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad