• New

    लोकसत्ता क्विज : 12 मार्च 2018



    प्र.1) शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने किती सदस्यीय मंत्रिगट स्थापन केला आहे?

    (1)   चार
    (2)   पाच
    (3)   सहा
    (4)   सात


    प्र.2) बरोबर विधान ओळखा
    a)      भारताचा युवा खेळाडू अखिल शेरॉनने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.
    b)      पदार्पणातच सुवर्ण पदक जिंकणारा तो पाचवा युवा भारतीय नेमबाज ठरला आहे.
    योग्य पर्याय निवडा.

    (1)   फक्त a
    (2)   फक्त b
    (3)   दोन्ही
    (4)   दोन्ही नाही


    प्र.3) सूफी संगीत गायक प्यारेलाल वडाली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याबद्दल चुकीचे विधान ओळखा.
    a)      पिंजर या चित्रपटातून वडाली यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
    b)      सूफी संगीत गाणार्‍या त्यांच्या घराण्यातील ते पाचव्या पिढीतले होते.
    c)      1975 मध्ये त्यांनी जलांधार येथे हरवल्लभ मंदिरात पहिला कार्यक्रम केला.
    पर्यायी उत्तरे

    (1)   फक्त a
    (2)   फक्त b
    (3)   फक्त c
    (4)   यापैकी नाही


    प्र.4) खालीलपैकी कोणत्या तारखेपासून वस्तु व सेवाकर अंमलात आला?

    (1)   1 मार्च 2017
    (2)   1 एप्रिल 2017
    (3)   1 जून 2017
    (4)   1 जुलै 2017


    प्र.5) रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेनुसार राज्याच्या डोक्यावरील कर्ज उत्पन्नाच्या किती टक्क्यांपेक्षा अधिक नसावे?

    (1)   22 %
    (2)   23 %
    (3)   24 %
    (4)   25 %


    प्र.6) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्टाच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याचा कृषि विकासदर किती आहे?

    (1)   4 %
    (2)   – 4%
    (3)   8 %
    (4)   – 8%


    प्र.7) राज्याचा एकूण विकासदर मागील वर्षी 10% होता. तो आता _____% इतका घसरला आहे.

    (1)   6%
    (2)   6.3%
    (3)   7%
    (4)   7.3%


    प्र.8) बॉक्साइट या खांनीजपासून कोणता धातू मिळविला जातो?

    (1)   मॅग्नेशियम
    (2)   पोटॅशियम
    (3)   अॅल्युमिनियम
    (4)   लोह


    प्र.9) खडकी हे कोणत्या शहराचे प्राचीन नाव आहे?

    (1)   पुणे
    (2)   औरंगाबाद
    (3)   अहमदनगर
    (4)   सातारा


    प्र.10) लॉर्ड मेघनाद देसाई यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या नेहरूंचा नायक दिलीपकुमार या अनुवादीत पुस्तकाचे 91 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन झाले. हा अनुवाद कोणी केला आहे?

    (1)   दीपक देवधर
    (2)   लक्ष्मण माने
    (3)   वसंत डहाके
    (4)   लक्ष्मण गायकवाड


    उत्तरे :- 1) सहा (यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णु सावरा, सुभाष देशमुख), 2) फक्त a (चौथा खेळाडू ठरला आहे.), 3) यापैकी नाही, 4) 1 जुलै 2017, 5) 22% , 6) - 8% , 7) 7.3 %, 8) अॅल्युमिनियम, 9) औरंगाबाद, 10) दीपक देवधर (देवधर यांच्या लेकसत्तामधील सदर लेखनावर आधारित तंत्रजिज्ञासाया पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी झाले.)    

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad