• New

    लोकसत्ता क्विज : 13 मार्च 2018



    प्र.1) लेंडी नदीवर बांधण्यात येणारा आंतरराज्य लेंडी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

    (1)   लातूर
    (2)   नांदेड
    (3)   यवतमाळ
    (4)   गडचिरोली


    प्र.2) भारतातील पहिल्या महिला खाजगी गुप्तहेर कोण?

    (1)   वैष्णवी पंडित
    (2)   रजनी पंडित
    (3)   विमल पंडित
    (4)   संगीता पंडित


    प्र.3) ड्युराल्युमिनीअम या समिश्र धातूमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूंचे मिश्रण असते?

    a)      तांबे
    b)      मॅग्नेशियम
    c)      मॅग्निज
    d)      अॅल्युमिनियम

    योग्य पर्याय ओळखा:-  

    (1)   फक्त a, b, d
    (2)   फक्त a, c, d
    (3)   फक्त b, c, d
    (4)   सर्व a, b, c, d


    प्र. 4) कोणत्या वर्षी वन हक्क कायदा करण्यात आला आहे?

    (1)   2005
    (2)   2006
    (3)   2007
    (4)   2008


    प्र.5) केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

    (1)   अर्थसंकल्पात एकूण जमेपेक्षा एकूण खर्च कमी आहे.
    (2)   अर्थसंकल्पात एकूण जमेपेक्षा एकूण खर्च जास्त आहे.
    (3)   अर्थसंकल्पात एकूण जमा व खर्च समान आहे.
    (4)   वरीलपैकी एकही नाही


    प्र.6) भारत व भुतानच्या दौर्‍यावर असलले ताओ झांग हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक आहेत?

    (1)   जागतिक बँक
    (2)   आंतरराष्ट्रीय नाणे निधि
    (3)   जागतिक व्यापार संघटना
    (4)   जागतिक आरोग्य संघटना


    प्र.7) सर जॉन सुल्स्टन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याबद्दल पुढील विधानांचा विचार करा.
    a)      त्यांना 2002 साली नोबेल परितोषक मिळाले.
    b)      सी एलेगन्स या गोल कृमीवरील प्रयोगातून कर्करोगाच्या उत्पत्तिबाबत केलेल्या संशोधांनामुळे त्यांना हा सन्मान मिळाला.
    c)      जॉन यांना 2017 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी इंग्लंडच्या रानीकडून गौरविण्यात आले.
    वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

    (1)   फक्त a
    (2)   फक्त b
    (3)   फक्त c
    (4)   यापैकी नाही


    प्र.8) योग्य विधान ओळखा
    a)      खासगी कॅप वाहतुकीसाठी आघाडीच्या सेवा असलेल्या उबर इंडियाचा विराट कोहली सदिच्छादूत बनला आहे.
    b)      विराट कोहली भारतातील कंपनीचा पहिला सदिच्छादूत ठरला आहे.
    पर्यायी उत्तरे :-

    (1)   फक्त a बरोबर
    (2)   फक्त b बरोबर
    (3)   दोन्ही बरोबर
    (4)   दोन्ही चूक


    प्र.9) पुढील विधानांचा विचार करा
    a)      भारताने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 4 सुवर्णपादकांसह अव्वल स्थान मिळविले आहे.
    b)      या स्पर्धेत भारताला दुसर्‍यांदा अव्वल स्थान मिळाले आहे.
    c)      या स्पर्धेत भारताला 4 सुवर्ण, एक रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 9 पदके मिळाली आहेत.
    वरील पैकी कोणते विधान चुकीचे आहे?

    (1)   फक्त a
    (2)   फक्त b
    (3)   फक्त c
    (4)   यापैकी नाही


    उत्तरे :-
    1)      नांदेड (नांदेडमधील गोणेगाव येथे हे धरण बांधण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने 9 मार्च 2018 रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लेंडी प्रकल्पातील बाधित 1 हजार 310 कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी 70 कोटी रुपये मंजूर केले आहेत.)
    2)      रजनी पंडित (बेकायदेशीर सीडीआर (मोबाइल कॉल तपशील) मिळवून त्याची विक्री करणार्‍या गुप्तहेरांच्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने दोन महिन्यापूर्वी पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती.)
    3)      सर्व  
    4)      2006
    5)      2 (एकूण जमा : 18,17,937 कोटी, एकूण खर्च : 24,42,213 कोटी, एकूण तुट : 6,24,276 कोटी)
    6)      आंतरराष्ट्रीय नाणे निधी
    7)      यापैकी नाही (मानवी जनुकीय आराखड्याचे कोडे उलगडण्यात त्यांचा वाटा आहे. त्यांनी केंब्रिजमध्ये वेल्कम ट्रस्ट सँगर इंस्टीट्यूटची स्थापना केली. ते रोयल सोसायटीचे फेलो होते.)
    8)      दोन्ही बरोबर 
    9)      फक्त b (भारताला प्रथमच या स्पर्द्धेत अव्वल स्थान मिळाले आहे. मेक्सिकोमध्ये ही स्पर्धा पार पडली. भारताचे सुवर्ण पदक विजेते खेळाडू :- शहझार रिझवी, मनू भाकेर, अखिल शेरॉन व ओमप्रकाश मिथारवाल.पदक तालिका पुढीलप्रमाणे:-
    देश
    सुवर्ण
    रौप्य
    कांस्य
    एकूण
    भारत
    4
    1
    4
    9
    अमेरिका
    3
    1
    2
    6
    चीन
    2
    2
    1
    5
    फ्रान्स
    1
    1
    3
    5
    रूमाणिया
    1
    1
    -
    2
        

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad