• New

    चालू घडामोडी : 23 मे 2018

    आयएनएसव्ही तारीणी वरील अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


    • आयएनएसव्ही तारीणी या नौकेवरुन यशस्वीपणे विश्व प्रदक्षिणा करणाऱ्या भारतीय नौदलातील सहा महिला अधिकाऱ्यांनी 23 मे 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
    • नाविका सागर परिक्रमा’ असे नाव असलेल्या या मोहिमेत केवळ महिलांचा समावेश असलेल्या नौकेने पहिल्यांदाच विश्व प्रदक्षिणा पूर्ण केली.
    • लेफ्टनंट कमांडर वर्तीका जोशी यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी.स्वाती तसेच लेफ्टनंट एस.विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता या अधिकाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग होता.


    नवी दिल्लीमध्ये आसियान भारत चित्रपट महोत्सवाचे आयोजन

    • नवी दिल्लीतील सिरीफोर्ट सभागृहात आसियान भारत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
    • माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते येत्या 25 मे रोजी या महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. 
    • आसियान देशांमधील चित्रपट उद्योगातील कलाकार आणि सर्व संबंधितांना चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य वाढविता यावे, यादृष्टीने हा महोत्सव एक आदर्श मंच उपलब्ध करुन देईल.
    • या महोत्सवात 11 देशांमधले 32 चित्रपट प्रदर्शित केले जातील. 
    • चित्रपट प्रदर्शनाबरोबरच चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध मुद्यांबाबत चर्चा करण्यासाठी चर्चा सत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. 
    • हा महोत्सव 30 मे पर्यंत चालणार आहे.


    कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी विराजमान

    • जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी 23 मे 2018 रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 
    • राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 
    • त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा हा शपथविधी सोहळा विधानसौंध येथे पार पडला.
    • एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

    सीआयएच्या संचालकपदी जीना हास्पेल यांची नियुक्ती


    Gina Hospel appointed as CIAs director
    • अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकपदी प्रथमच जीना हास्पेल या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही हास्पेल यांची निवड करण्यात आली आहे. 
    • 9/11च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर कैद्यांच्या चौकशीसाठी सीआयएकडून वॉटरबोर्डिंगसारख्या अतिशय क्रूर पद्धती वापरण्यात आल्या होत्या, त्यातील सहभागामुळे हास्पेल या वादग्रस्त ठरला आहेत. सीआयएच्या संचालकपदावर हास्पेल यांच्या नियुक्तीवर सिनेटने गुरुवारी 54 विरुद्ध 45 मतांनी शिक्कामोर्तब केले.
    • मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. मात्र, मतदानावेळी सहा डेमोक्रॅटिक सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला. हास्पेल यांच्या नियुक्तीनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. सीआयएच्या 70 वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती होणाऱ्या हास्पेल या पहिल्याच महिला आहेत. 
    वादग्रस्त व्यक्तिमत्त्व 
    - हास्पेल सध्या सीआयएच्या उपप्रमुख होत्या
    - चौकशीदरम्यान कैद्यांच्या अमानवी छळ केल्याचा आरोप
    - कैद्यांना लष्करी कायद्यानुसार वागविण्याचे दिले आश्वासन
    - जगभरात सीआयएसाठी विविध भूमिकांमध्ये काम केले
    - 1980 मध्ये आफ्रिकेत मदर तेरेसा यांच्या सामाजिक कार्यात सहकार्य






    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad