One Liner
थोडक्यात महत्त्वाच्या घडामोडी
· भारतामध्ये प्रचलित असलेली पारंपरिक औषधोपचार पद्धती आणि टांझानियातील होमीओपॅथी उपचार पद्धती या क्षेत्रात सामंजस्य करार उभय देशांनी केला होता.
· ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी भारत आणि मॉरिशस यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार ग्रामीण विकास सहकार्यासाठी संयुक्त समिती नियुक्त करण्यात येणार आहे.
· लातूर महापालिका क्षेत्रासाठी लातूर येथे नव्याने कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली.
· वक्फ न्यायाधिकरण त्रिसदस्यीय करण्यात आले असून, त्यास आता दिवाणी न्यायालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण त्रिसदस्यीय करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
· केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयातर्फे देशातील सर्वाधिक पवन व सौर संकरित संयंत्रे स्थापित केल्याबद्दल महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाला (महाऊर्जा) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
· जुलै २०१६ दरम्यान मोदी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी यांना रेल्वेतून ज्या ठिकाणी रंगभेदामुळे बाहेर ढकलण्यात आले होते त्या पीटर मॉरित्झबर्ग या स्थानाला भेट देण्यासाठी मोदी यांनी रेल्वेने प्रवास केला होता.
· भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने नायजेरियातील कदूना येथे तयार कपडे निर्मिती प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
© www.mpscmantra.com
· चालू मोसमातील सर्वांत घातक अशा ‘नेपार्टक’ या चक्रीवादळाने चीनमध्ये थैमान घातले होते.
· केनियात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत तेथे कर्करोगावरील एक रुग्णालय बांधणार आहे.
· उत्तर प्रदेशातील गोरखपूर त्याचप्रमाणे सिंद्री (झारखंड) आणि बरौनी (बिहार) येथील बंद पडलेल्या खत कारखान्यांच्या पुनरुज्जीवनाला मंजुरी देण्यात आली.यातून 1200 प्रत्यक्ष, तर 4500 अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
· ‘National Buildings Construction Corporation Limited’ (एनबीसीसी) या सरकारी कंपनीत 15% हिशांच्या निर्गुंतवणुकीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यातून सरकारला 1706 कोटी रुपये मिळकत अपेक्षित आहे.
· महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांत म्हादेई (मांडवी) नदीच्या पाणीवाटपावरून सुरू असलेल्या तंट्याची सुनावणी सध्या लवादासमोर चालू आहे.
· यंदाच्या आर्थिक वर्षात (2016-17 साठी) केंद्र सरकारने 27 कोटी टन धान्योत्पादनाचे उद्दिष्ट ठरविले आहे.
· रसगुल्ला मूळ कुठला यावरून ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 2015 पासून वाद सुरू आहे. ‘पहल रसगुल्ला’ साठी ‘जीआय’ मानांकन मिळविण्यासाठी या दोन्ही राज्यांत स्पर्धा सुरू आहे.
· भारतातील पहिले इ-न्यायालय हैदराबाद उच्च न्यायालयामध्ये सुरू करण्यात आले आहे.
· तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा अवमान टाळण्यासाठी त्यांना ‘ही’ (He) अथवा ‘शी’ (She) असे सर्वनाम लावण्यापेक्षा ‘झी’ (Zie) हे सर्वनाम लावण्याचे आदेश लंडन येथील बोर्डिंग स्कूल च्या शिक्षकांना देण्यात आले आहेत. यु.के. बोर्डिंग स्कूल असोसिएशनने हा आदेश जारी केला आहे.
· पंजाबमधील घुमान परिसरात संत नामदेव यांच्या नावाने महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे त्याचे नुकतेच शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
· केरळचे अनुकरण करीत गुजरातही पिझ्झा, बर्गर सारख्या जंक फूडवर 14.5 टक्के फॅट टॅक्स लावण्याचा विचार करीत आहे. या करातून मिळालेला निधी आरोग्याविषयी उपाययोजनांसाठी वापरला जाणार आहे.
· देशात सध्या 21 अणुभट्ट्या असून त्यांची क्षमता 5780 मेगावॅट इतकी आहे. यापैकी 8 अणुभट्ट्याना स्वदेशी युरेनियम इंधन म्हणून वापरले जाते. तर उर्वरित 13 अणुभट्टयांसाठी आयात केलेले युरेनियम वापरले जाते. सध्या रशिया, कॅनडा आणि कजाकीस्तान येथून युरेनियमची आयात केली जाते.
· भारताने युरेनियम आयात करण्यासाठी रशिया, कजाकिस्तान, आणि कॅनडासोबत करार केले आहेत.
· भारत मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम (MTCR) मध्ये सहभागी झाला असून भारत MTCR चा ३५ वा सदस्य ठरला आहे.
· जागतिक पर्यटन संघटनेनुसार आंतरराष्ट्रीय पर्यटक अवकच्या यादीत भारताने ४० वे स्थान मिळविले आहे.
· लष्करी बंडामागे असलेल्या दहशतवादी गटांचा शोध घेण्यासाठी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी तीन महिन्यांची आणीबाणी घोषित केली आहे.
© www.mpscmantra.com
· निसार (NISAR) : हा नासा आणि इस्रोचा संयुक्त उपक्रम असून दुहेरी वारांवारिता असलेले हे इमेजिंग उपगृह आहे.
· केरळ राज्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये योगा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे.
· भारतीय शेअर बाजार, बँकिंग कंपन्या विमा कंपन्या वायदे बाजार विनिमयात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 15 टक्क्यांपर्यंत वाढावायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या आधी ही मर्यादा 5 टक्के होती.
· नागालँड विधानसभेने शहरी स्थानिक संस्थेत महिलाना ३३% आरक्षण देण्याचा ठराव पास केला आहे.
· सर्वाधिक महिला सरपंच : उत्तर प्रदेश > महाराष्ट्र > मध्य प्रदेश
· उत्तर प्रदेश मध्ये २०,००० तर महाराष्ट्रात १४,००० महिला सरपंच.
· राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा-नागपूर
· शास्त्रज्ञ आणि कायदेतज्ज्ञांच्या एका पथकाने अवकाशात पहिला देश वसविण्याचा प्रस्ताव तयार केला असून या देशाचे नाव असेल अस्गार्दिया.
· ऑक्टोबर 2016 मध्ये मुंबईत हंटा व्हायरसचा रुग्ण आढळून आला. उंदराच्या मूत्रातून, विष्ठेतून हंटा व्हायरसचा प्रसार होतो. श्वसनावाटे आणि उंदराच्या हंटा व्हायरस असलेल्या मूत्राशी, थुंकीशी, विष्ठेशी संपर्क आल्यास हंटा व्हायरसची लागण होण्याचा धोका असतो.
· मुंबईतील 36 रेल्वे स्टेशन सुंदर करण्याच्या ‘हमारा स्टेशन, हमारी शान' या उपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम 2 ते 8 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राबविण्यात आला आहे.
· भारत फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. या विमानांच्या निर्मिती प्रक्रियेत उद्योगपती अनिल अंबानींची रिलायन्स एअरोस्पेस ही कंपनी सहभागी होणार आहे.
· सातारा जिल्ह्यातील गुंडेगाव या गावाने ठराव करून आपल्या गावाचे नामकरण ‘मराठानगर’ असे केले.
· आम आदमी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी स्थापन केलेला पक्ष - स्वराज इंडिया
· स्वच्छ भारत अभियानच्या दुसऱ्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुढील राज्ये देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित केले- गुजराथ, आंध्रप्रदेश
· महाराष्ट्रात सेवा हमी कायद्याअंतर्गत १६३ सेवा जनतेला ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे ऑनलाइन सेवांची संख्या ३६९ झाली आहे.
· २०१७ च्या प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून शेख मोहम्मद बिन झायेद अल उपस्थित असणार आहे.
· कोलाकुरी ईनोच यांना २०१५ च्या मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
· पहिल्या ब्रिक्स ‘अंडर १७’ फुटबॉल स्पर्धा भारतात गोवा राज्यात पार पडल्या आहेत.
· २०२६ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा जपान या देशात आयोजित केल्या जाणार आहे.
· Kunjamma Ode to a Nightingale: M.S. Subbulakshmi’ हे पुस्तक खालीलपैकी लक्ष्मी विश्वनाथन यांनी लिहिले आहे.
· अरुण गोयल यांची वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषद अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
· स्वच्छता अभियानाचे ब्रांड अम्बेसीडर म्हणून अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांची निवड केली गेली.
· झारखंड हे राज्य केरोसिन थेट लाभ हस्तांतरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
· सीमापार घुसून केलेल्या आणि किमान ५० दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या ‘ऑपरेशन डार्क थंडर’मध्ये पंजाब रेजिमेंटच्या लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर या वरिष्ठ मराठी लष्कर अधिकाऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
· Night of Fire हे पुस्तक कॉलिन टुब्रोन यांनी लिहिले आहे.
· ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस' हे अरुंधती रॉय यांचे पुस्तक आहे.
· एंटोनियो गुतेरस (पोर्तुगालचे माजी प्रधानमंत्री) संयुक्त राष्ट्र संघाचे नवे मुख्य महासचिव.
· २८ आक्टोंबर हा दिवस या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. या दिवसाची संकल्पना :-आयुर्वेदाच्या माध्यमातून मधुमेहाचे नियंत्रण.
· ग्रामीण जनतेपर्यंत विशेषतः तरुण पिढीपर्यंत साहित्यगंगा पोहोचविण्यासाठी साहित्य अकादमीने ‘ग्राम लोक’ हा अभिनव उपक्रम आखला आहे.
© www.mpscmantra.com
· गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदि गोदरेज यांच्या पत्नी आणि समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे निधन झाले. गोदरेज या फॅशन आयकॉन म्हणून देखील प्रसिद्ध होत्या.
· गुरू गोविंदसिंग यांच्या 350 व्या जयंतीचे निमित्त साधून पुणे येथे शहरात ‘पंजाबी विश्वव साहित्य संमेलन' 18 ते 20 नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजित करण्यात आले होते.
· मुंबईसारख्या शहरामध्ये शेअर टॅक्सी मध्ये दाटीवाटीने प्रवास करताना महिलांची कुचंबणा होते.त्यामुळेच टॅक्सीतील चालकाशेजारील पुढची जागा महिलांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला .ही योजना भगिनी सन्मान योजना म्हणून ओळखली जाते.
· कर्नाटक-तमिळनाडू या दोन राज्यामध्ये सुरु असलेल्या कावेरी पाणी वाटपाचा प्रश्न सोडविण्यासाठी जी एस झा समिती यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली.
· युवा मतदारांची नोंदणी करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटबरोबर कामकरत आहे
· तमिळनाडू या राज्यात भारतातील प्रथम वैद्यकीय पार्क स्थापन करण्यात आले.
· ‘The Greatest Bengali Stories Ever Told’ हे पुस्तक अरुणिमा सिन्हा यांनी लिहिले आहे
· २०१७ या वर्षी प्रकाशित होत असलेले " द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस' हे पुस्तक अरुंधती रॉय लिहित आहे.
· ऑल इंडिया रेडिओ वरून प्रसारित होणारे कार्यक्रम ‘बलूच’ भाषेतही प्रसारित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
· केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ब्रँड अँबेसिडर पदी पी.व्ही. सिंधुची निवड करण्यात आली आहे.
· तमिळनाडू सरकारने महिला कर्मचार्यांना सहा महिने मिळणारी प्रसूती रजा वाढवून नऊ महिने करण्याचा निर्णय घेतला आहे.
· केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘वाहन आणि सारथी’ या वेब पोर्टलची सुरुवात केली असून राष्ट्रीय स्तरावरील वाहन नोंदणी नोंदवही तयार करणे आणि राष्ट्रीय स्तरावरील चालक परवाना नोंदवही तयार करणे हा त्याचा उद्देश आहे.
· नोबेल पुरस्कार विजेते अहमद झेवाली यांचे नुकतेच निधन झाले आहे. 1999 साली त्यांना रसानशास्त्राचा नोबेल मिळाला होता. नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले अरेबी होते. ते ‘father of Femtochemistry’ म्हणून ओळखले जात. Femtochemistry म्हणजे सेकंदाच्या 15 व्या भागपेक्षा कमी कालावधीत घडून येणार्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास होय.
· कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांत मसाला बॉन्ड जारी करणारे पहिले परकीय सरकार ठरले आहे.
· राजस्थान हे राज्य सांडपाणी प्रक्रिया धोरण जाहीर करणारे पहिले राज्य ठरले आहे.
© www.mpscmantra.com
· देशातील पहिले वायफाय हॉटस्पॉट गाव म्हणून हरियाणातील गुमथला या गावाने मान पटकावला आहे.
· अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला असून करझाई भारतामध्ये चौथ्यांदा पिता बनले आहेत.
· प्रशांत महासागरातील कुरे प्रवाळात सुमारे ३०० फुट खाली सापडलेल्या माशांच्या नव्या प्रजातीला शास्त्रज्ञांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव दिले आहे.
· आरबीआयकडून लघु-वित्त बँक म्हणून परवाना मिळविणार्या दहापैकी सर्वप्रथम आपल्या बँकिंग व्यवहारांना सुरुवात करण्याचा मान इक्विटास होल्डिंग्जने मिळविला आहे.
· भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
· वीज ग्राहकाला लोडशेडिंगच्या वेळापत्रकाबद्द्ल माहिती मिळावी यासाठी दूरसंचार विभागाने ‘ऊर्जा मित्र’ हेल्पलाईन सुरू केली आहे.
· बँक ऑफ इंग्लंडने नुकतीच प्लॅस्टिकची नोट व्यवहारात आणली आहे. त्यावर विस्टन चर्चिल यांचे चित्र आहे.
· ऑगस्ट महिना हा गेल्या १३६ वर्षांतील सर्वांत उष्ण ठरल्याचे नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडीजने केलेल्या तापमानाच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे.
· देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता व त्यांच्या विकासासाठी केंद्रीय उच्चशिक्षण वित्त संस्थेची (HEFA) स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
· अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये डायने गुजराती या भारतीय अमेरिकन वंशाच्या महिलेची ओबामा यांनी निवड केली आहे.
· ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक दिल्ली मध्ये १४-१५ सप्टेंबर २०१६ रोजी पार पडली आहे.
· फेसबुकने आपल्या वाढत्या युजर्सची संख्या लक्षात घेत अमेरिकेतील उताह शहरात नवे डेटा सेंटर उभारले आहे.
· अलिप्त राष्ट्र चळवळीची (NAAM) १७ वी शिखर परिषद व्हेनेझुएला येथे सप्टेंबर २०१६ मध्ये पार पडली. भारतातर्फे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी उपस्थित होते.
· पतंजलीमार्फत विकली जाणारी उत्पादने रास्त भावात मिळावी यासाठी मध्य प्रदेश सरकारने मसुदा बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
· स्वातंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्या ब्रह्मदाग बुगती या बलूच नेत्याने भारताकडे आश्रय मागितला आहे.
· स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन स्कीम : निवृत्ती वेतनात २०% वाढ, महागाई भत्ता.
· जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धर्मा अशी नैसर्गिक वायू वाहुन नेणारी अडीच हजारहून अधिक किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने २२ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आहे. GAIL तर्फे ही लाइन टाकली जात आहे.
· अंदमान आणि निकोबार बेटे मुख्य भूमीशी म्हणजेच चेन्नईशी ऑप्टिकल फायबरने जोडण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
© www.mpscmantra.com
· अर्थसंकल्प बाह्य आर्थिक निधी: पायाभूत सुविधांसाठी अधिक निधीची तरतूद करण्यासाठी हा निधी उभारण्यात येणार, २०१६-१७ मध्ये ३१,३०० कोटी उभारण्याचे लक्ष, नाबार्ड व इरेडामार्फत उभारण्यात येणार.
· श्रीलंकेत भारताचे उच्च आयुक्त यश सिन्हा यांच्या जागी तरंजीतसिंग सिद्धू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
· मैत्री-२०१६ : पाकिस्तान आणि रशिया दरम्यानचा पहिले संयुक्त लष्करी सराव.
· मिशन दोस्ती : भारत-पाकिस्तानमधील संबंध वृद्धिंगत करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या मिशन दोस्ती या कुस्ती स्पर्धेत यंदाही पाकिस्तानने सहभागी होण्यास नकार दिला आहे. २००५ पासून आयोजन. २०१२ पासून पाकिस्तान सहभागी होत नाही. यंदा पहिल्यांदाच जॉर्जियाचा सहभाग. इंग्लंड, युक्रेन हे देशही सहभागी.
· संयुक्त राष्ट्र २०१६ हे वर्ष जागतिक कडधान्ये वर्ष आणि जागतिक उंट वर्ष म्हणून साजरे करत आहे . प्रथिन पीक अभिवृद्धीचे वर्ष म्हणूनही साजरे केले जात आहे.
· भारतीय लोकांना दररोजच्या अन्नातून सरासरी ३७ ग्राम प्रथिन मिळतात असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत म्हटले आहे.
· भारत जागतिक अंडी उत्पादनात तिसरा तर ब्रॉयलर उत्पादनात चौथा आहे, मात्र दरडोई अंडी सेवनात भारताचा क्रमांक ६९ वा आहे.
· महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये अलीकडेच सिंचन प्रकल्प उभारणीसंदर्भात करार झाला. त्यामध्ये तुमडहेटी या धरणाची ऊंची १५२ वरुण १४८ वर आणायला तेलंगणाला भाग पडले आहे.
· जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला मलेरिया मुक्त असल्याचे घोषित केले आहे.
· वस्तू व सेवाकर परिषदेच्या अतिरिक्त सचिवपदी अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
· ससा या प्राण्याच्या प्रवर्गात मोडणारा 'पिकास' हा प्राणी नुकताच सिक्किम मध्ये आढळून आला आहे.
· व्यापारवृद्धीसाठी ‘एअर कॉरिडॉर’ स्थापन करण्याचा करार भारताने अफगणिस्तानबरोबर नुकताच केला आहे.
· हॉकी इंडियायाच्या अध्यक्षपदी निवड झालेली व्यक्ति....मरियमा कोशी
· सुलभ हवाई प्रवासासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ ---- एअर सेवा
· कॅशलेस अर्थव्यवस्थेत भारताचा कायापालट करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती ______ अमिताभ कांत समिती
· आंतरराष्ट्रीयहॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले पहिले गैर युरोपीय व्यक्ति ______ नारिंदार ध्रुव बात्रा
· नालंदा विद्यापीठाच्या कुलपती पदाचा राजीनामा देणारी व्यक्ति______जॉर्ज येओ
· १० व्या आशियाई-पॅसिफिक स्क्रीन अवॉर्डसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळविणारे अभिनेते_______ मनोज वाजपेयी
· नुकतीच लिमा, पेरु येथे पार पडलेल्या २४व्या APEC परिषदेची संकल्पना_____ गुणवत्ता वाढ आणि मानव विकास
· सर्व शासकीय इमारतींची पर्यावरण लेखापरीक्षण करण्याचा आदेश देणारे राष्ट्रीय हरित लवाद _____ दिल्ली
· एअरटेलने पहिली पेमेंट बँक _____ या राज्यात सुरू केली .... राजस्थान
· राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झालेले अधिकारी _____ युद्धविरसिंग मलिक
· भारतातील पहिली पेमेंट बँक सुरू करणारी________ Airtel
· Smart Water Distribution Monitoring वेब पोर्टल सुरू करणारे राज्य ______ आंध्र प्रदेश
· नुकतीच या देशामध्ये ७००० वर्षापूर्वीचे प्राचिन शहर सापडले आहे____ इजिप्त
· ‘Death Under The Deodar’ पुस्तकाचे लेखक _____ रसकिन बॉन्ड
· अमेरिकेची संयुक्त राष्ट्रातील सद्दिच्छादूत म्हणून निवादेलेली व्यक्ति ___ निकी हले
· मध्य प्रदेशाचे माजी गव्हर्नर ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे____ राम नरेश यादव
· भारत नुकतेच या संस्थेचा सहयोगी सदस्य बनला आहे___ CERN
· प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि ISRO चे माजी अध्यक्ष यांचे नुकतेच निधन झाले ____एमजीके मेनन
· २०१७ साठी फिक्कीच्या अध्यक्षपदी यांची निवड झाली आहे___ पंकज पटेल
· १३ व्या जागतिक रोबोट ओलीपियाडची संकल्पना __ Rap the Scrap
· या भारतातील सर्वांत लांब द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन झाले आहे___ आग्रा – लखनौ
· सिक्किम आणि हिमाचल प्रदेश नंतर हे उघड्यावरील शौचमुक्त तिसरे राज्य ठरले आहे______ केरळ
· डीआरडीओच्या आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास येथे स्थापन करण्यात येणाऱ्या प्रोपल्शन टेक्नॉलॉजी केंद्र अर्थात सीओपीटीचा पायाभरणी समारंभ नुकताच मुंबईत संपन्न झाला.
· केंद्रीय गृह मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशमधील तीन जिल्ह्यांमध्ये आफ्स्पा कायद्याचा विस्तार केला आहे__ तिरप, चेंगलांग, लॉन्गडिंग
© www.mpscmantra.com
· चेन्नईमध्ये या बँकेने भारतातील पहिले बँकिंग रोबोट 'लक्ष्मी'चे अनावरण केले आहे___ सिटी युनियन बँक
· केंद्र सरकारतर्फे नुकताच राबवण्यात आलेला राष्ट्रीय बिल्डिंग उपक्रम ___ स्मार्ट इंडिया हॅकथॉन
· सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लक्ष्य भागीरथी अभियान राबवणारे राज्य – छत्तीसगढ
· नुकतेच निधन पावलेले भूगोलतज्ञ- जनार्दन नेगी
· उत्तर प्रदेशचे गव्हर्नर राम नाईक यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक - 'चरैवेती,चरैवेती'
· देशातील पहिली एलएनजी वर धावणारी बस येथे सुरू करण्यात आली___ केरळ
· महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरी पायाभूत सुविधा विकासासाठी ___सोबत संयुक्त कृतिआराखडा जाहीर केला आहे.-- कॅनडा
· दीनदयाळ जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स सुरू करणारे राज्य- गुजरात
· केंद्र सरकारने आसाममधील ऊर्जा वितरणप्रणाली सुधारण्यासाठी आशियाई विकास बँकेसोबत कर्जपुरवठा करण्यासंदर्भात करार केला आहे.
· स्वित्झर्लंड टुरिझमच्या सदिच्छा दूतपदी निवड झालेले बॉलिवूड अभिनेते - रणवीर सिंग
· हिमनद्यांच्या २५ कि.मी. त्रिजेअंतर्गत कुठलेही बांधकाम करण्यास उत्तराखंड उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
· उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते शशी थरूर यांच्या ‘An Era of Darkness: The British Empire in India’या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
· डोंबिवली येथे होणारे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ तर ५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
· अमेरिकेतील पहिली कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारी व्यक्ती ज्यांचे नुकतेच निधन झाले___ डॉ. डेंटन कुली
· इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ लंग कॅन्सर या संस्थेमार्फत दरवर्षी हा महिना फुपुसाच्या कर्करोगावरील जनजागृतीसाठी पाळण्यात येतो___ नोव्हेंबर
· राजधानी नवी दिल्लीत नागरिकांच्या सुविधेसाठी शहर विकास मंत्रालयातर्फे लवकरच ही सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे____ ‘गुगल टॉयलेट लोकेटर’
· राष्ट्रपती भवनात आयोजित पहिल्या तीन दिवसीय आगंतुक परिषदेचा १६ नोव्हेंबर २०१६ रोजी समारोप झाला. या परिषदेत उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील केंद्रीय संस्था आणि औद्योगिक संघटनांमध्ये तब्बल 67 सामंजस्य करारांची देवाण-घेवाण झाली.
· केंद्रीय कापडउद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी कारागिरांसाठी 'पहचान' या ओळखपत्राची योजना सुरू केली आहे. हे ओळखपत्र गुजरातमधील जामनगर, नरोडा, सुरेंद्रनगर, अमरेली,कलोल या पाच क्लस्टर्स मध्ये देण्यात येणार आहे.
· आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातून बाहेर पडणारा देश – रशिया
· भारत-चीन दरम्यान होणाऱ्या हॅन्ड-इन-हॅन्ड या लष्करी प्रशिक्षण सरावाच्या सहाव्या आवृत्तीला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे.
· फ्लाय ऍश वापर धोरण राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.
· २०१७ हे वर्ष महाराष्ट्राने ____________म्हणून घोषित केले आहे………‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’
· जगातील सर्वाधिक लांबीची क्वांटम कम्युनिकेशन लाइन प्रक्षेपित करणारा देश _______ चीन
· उत्तर प्रदेश सरकारने कोणती एकात्मिक आपत्कालीन सेवा सुरू केली आहे? ------UP-100
· क्यूबाचे क्रांतिकारी नेते आणि माजी राष्ट्रपती यांचे नुकतेच निधन झाले आहे____ फिडेल कॅस्ट्रो
· बालकांच्या हक्कांमध्ये सुधारणा घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या___ या मूळ भारतीय वंशाच्या मुलीची निवड यंदाच्या आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये करण्यात आली आहे.___ केहकशा बासू
· यांना यंदाचा भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे____ अनिल भारद्वाज
· आंतरराष्ट्रीय कृषी वैज्ञानिक डॉ. राजीव वाष्णेय यांना या देशाचा ‘क्वीलू मैत्री पुरस्कार’ प्राप्त झाला आहे____ चीन
· मंगळयानाद्वारे काढलेल्या छायाचित्राला या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे_____नॅशनल गेओग्राफिक
· नेटवर्कच्या गुणवत्तेची माहिती मिळविण्यासाठी भारतीय नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ‘मायस्पीड’ हे नवीन अप्लिकेशन विकसित केले आहे.
© www.mpscmantra.com
· भारतीय टपाल विभाग आणि पोर्तुगाल टपाल विभाग यांनी संयुक्तपणे टपाल तिकीट प्रकाशित केले आहे.
· चीनमध्ये आलेले विषुववृत्तीय वादळ – निडा (Nida)
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अमली पदार्थांच्या मागणीत घट आणि अवैध व्यापाराला आळा घालण्याच्या क्षेत्रात भारत आणि मोझाम्बिक यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
· मोझाम्बिकबरोबर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून दीर्घ काळ डाळींची आयात करण्यासाठी सामंजस्य करार करायला मंजुरी दिली.पाच आर्थिक वर्षांसाठी तूर आणि अन्य डाळींच्या निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित करून २०१६-२०१७ मधील १ लाख टनावरून २०२०-२१ पर्यंत २ लाख टनापर्यंत नेण्याचा यात समावेश आहे.
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तमिळनाडू येथे कोलचेल जवळ ‘इनायाम’ येथे प्रमुख बंदर स्थापन करायला मंजुरी दिली.
· प्रसिद्ध आधुनिक बंगाली कवि शंख घोष यांना २०१६ चा प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ते ५२ वे ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. हा पुरस्कार मिळविणारे ते सहावे बंगाली व्यक्ती आहेत.
· ईशान्येकडच्या हस्तकला आणि हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे आणि विकासाला चालना मिळावी यासाठी ‘पूरबश्री एम्पोरियमचे’ उद्घाटन करण्यात आले आहे.
· तृतीयपंथीयांना सामाजिक कल्याण फायदे देणारे पहिले राज्य म्हणून ओडिशाने बहुमान पटकाविला आहे.
· इंटरनेट वापरकर्त्यांच्या यादीत भारत दूसरा असून पहिल्या क्रमांकावर चीन आहे.
· पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील सायरनच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
· एअरबस या कंपनीने जगातील पहिले थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेले विमान – थॉर
· आसाम मधील गुवाहाटी शहराने आपला शहर प्राणी म्हणून गंगेतील डॉल्फिनला घोषित केले आहे. स्वतःचे शहर प्राणी असलेले हे भारतातील पहिलेच शहर असणार आहे. या डॉल्फिनचे स्थानिक नाव सीहू असे असून हाच डॉल्फिन भारताचा राष्ट्रीय जल प्राणीसुद्धा आहे.
· नॉर्वे सरकारने संपूर्ण जंगलतोड बंदी अमलात आणली असून जंगलतोडीवर संपूर्णपणे बंदी घालणारा नॉर्वे जगातील पहिला देश बनला आहे.
· हॉलिवूड अभिनेत्री अॅनी हॅथवेची UN Women च्या जागतिक सदिच्छा दूतपदी निवड करण्यात आली आहे.
· मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल ऍलन यांनी जगातील सर्वांत मोठे विमान बनविण्याची आपली योजना नुकतीच उघड केली असून ‘स्ट्रॅटोलाँच’ असे या विमानाचे नामकरण करण्यात आले आहे.
· पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर केंद्रीय अन्न सुरक्षा विभागाने बंदी घातली आहे. अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या या रसायनाच्या वापरावर फक्त भारतातच परवानगी होती.
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच केंद्रीय नागरी सेवा आयोग आणि भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिस कमिशन दरम्यानच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.
· प्रगती : कार्यक्षम प्रशासन आणि जलद अंमलबजावणीसाठी तयार केलेले बहु-आयामी ऑनलाईन व्यासपीठ.
· ऑगस्टा वेस्टलॅण्ड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना पटियाला हाऊस न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
· दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी डिसेंबर 2016 मध्ये राजीनामा दिला आहे. 65 वर्षीय नजीब जंग हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ते उपकुलगुरुही होते. 2013 च्या जुलैमध्ये त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालपद स्वीकारले होते.
· नवी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगडनंतर आता हिमाचल प्रदेशही शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले अहे. त्यामुळे आता देशभरात एकूण सहा राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्य ठरले आहेत.
· जगातील सर्वाधिक शक्तीशाली 'टॉप 10' व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले असून फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलल्या या यादीत नवव्या क्रमांकावर नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सलग चौथ्या वर्षी यादीतील पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
· तोंडी किंवा लेखी तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट देणे घटनाबाह्य असून, त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन होते असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
© www.mpscmantra.com
· एप्सिलॉन-2 या घन इंधन स्वरूपातील क्षेपणास्त्राचे जपानमधील उचिनोरा अवकाश केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वीभोवतीच्या उर्त्सजनाचा अभ्यास करण्यासाठीचा उपग्रह या क्षेपणास्त्रातून पाठविण्यात आल्याची माहिती जपान एरोस्पेस इक्सप्लोरेशन एजन्सीने दिली आहे.
· अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेव्हिड फ्रीडमन यांची इस्राईलमधील अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून निवड केली आहे.
· भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांमधील रेडियो केंद्राच्या बंगाली कार्यक्रमासाठी एकसमान मंच म्हणून मैत्री वहिनीची सुरू केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत