• New

    लोकसत्ता क्विज : 11 मार्च 2018



    प्र.1) चुकीचे विधान/ने ओळखा.
    (1)   मेक्सिको येथे पार पाडलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरने सुवर्णपदक पटकावले आहे.
    (2)   2018 मध्ये ती विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वांत युवा भारतीय नेमबाज ठरली आहे.
    (3)   या स्पर्धेत मनूने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले.
    (4)   ती मुळची उत्तरप्रदेशची आहे.

    प्र.2) राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल अनुशेष दूर कण्याच्या उद्देशाने निधिचे वाटप कसे करायचे याचे निर्देश देतात?

    (1)   कलम 371 (1)
    (2)   कलम 371 (2)
    (3)   कलम 371 (3)
    (4)   यापैकी नाही


    प्र.3) संयुक्त राष्ट्राची मानवी हक्क परिषद 2018 कोठे पार पडली?

    (1)   पॅरिस
    (2)   वाशिंग्टन
    (3)   जिनिव्हा
    (4)   हेग


    प्र.4) योग्य विधाने ओळखा
    a)      आयुष्मान भारत ही राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना आहे.
    b)      यामध्ये 10 कोटी पेक्षा अधिक गरीब नागरिकांना 2.5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच प्रदान करण्यात येणार आहे.
    c)      हा जगातील सर्वांत मोठा सरकारी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे.
    योग्य पर्याय निवडा.

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c


    प्र.5) पुढील विधानांचा विचार करा
    a)      भारतामध्ये सध्या 25 पेक्षा कमी वय असणार्‍या तरुणांचे प्रमाण 50% आहे.
    b)      भारतामध्ये सध्या 35 वर्षापेक्षा कमी वय असणार्‍या तरुणांचे प्रमाण 65% आहे.
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

    (1)   फक्त a बरोबर
    (2)   फक्त b बरोबर
    (3)   दोन्ही बरोबर
    (4)   दोन्ही चूक


    प्र.6) केंद्रीय हवाई वाहतूक खात्याचा अतिरिक्त कारभार खालीलपैकी कोणाकडे सोपविण्यात आला आहे.

    (1)   अरुण जेटली
    (2)   स्मृति इराणी
    (3)   नितिन गडकरी
    (4)   सुरेश प्रभू


    प्र.7) कोणत्या देशाचे पंतप्रधान चार दिवसाच्या भारतच्या दौर्‍यावर आले आहेत.

    (1)   ब्रिटन
    (2)   बांग्लादेश
    (3)   म्यानमार
    (4)   फ्रान्स


    प्र.8) आझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताला कितव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे?

    (1)   4 थ्या
    (2)   5 व्या
    (3)   6 व्या
    (4)   7 व्या


    उत्तरे :- 1) 4 (ती मुळची हरियाणाची आहे), 2) कलम 371 (2), 3) जिनिव्हा, 4) फक्त a c (5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच प्रदान करण्यात येणार आहे.), 5) दोन्ही बरोबर, 6) सुरेश प्रभू , 7) फ्रान्स, 8) पाचव्या (ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली आहे) 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad