• New

    लोकसत्ता क्विज : 8 मार्च 2018


    प्र.1) योग्य विधान/ने ओळखा.
    a)      केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 2% नी वाढ करण्याचा निर्णय 7 मार्च 2018 रोजी घेतला आहे.
    b)      ही वाढ 1 जानेवारी 2017 या पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
    c)      सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित महागाई भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे.
    पर्यायी उत्तरे :-

    (1)   फक्त a b बरोबर
    (2)   फक्त b cबरोबर
    (3)   फक्त a c बरोबर
    (4)   सर्व a, b, c बरोबर


    प्र.2) आपत्कालीन स्थितीत मदत आणि महामार्गाविषयीच्या माहितीबरोबरच महामार्गाशी संबंधित तक्रार नोंदविण्याची व्यवस्था असलेल्या कोणत्या अॅप्लिकेशनचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे?

    (1)   सुलभ यात्रा
    (2)   सहज यात्रा
    (3)   सुखद यात्रा
    (4)   आरामदायी यात्रा


    प्र.3) पुढील विधानांचा विचार करा.
    a)      2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना जाहीर झाली.
    b)      मुद्रा योजनेत एकूण 76% कर्ज-लाभार्थी महिला आहेत.
    वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

    (1)   फक्त a
    (2)   फक्त b
    (3)   दोन्ही
    (4)   दोन्ही नाही


    प्र.4) योग्य विधान/ने ओळखा
    a)      स्टँड अप योजना 2016 मध्ये राबविण्यात आली.
    b)      त्यात 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतची कर्जे देण्यात आली.
    c)      यामध्ये एकूण कर्ज प्रकरणांत 81 % महिलांचा वाटा आहे.
    पर्यायी उत्तरे

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त  a   c
    (4)   सर्व a, b, c


    प्र.5) मॅग्नोक्स या मिश्र धातूमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूंचा समावेश असतो?

    (1)   मॅग्नेशियम व ऑक्सिजन
    (2)   मॅग्नेशियम व अॅल्युमिनियम
    (3)   मॅग्नेशियम, ऑक्सिजन व अॅल्युमिनियम
    (4)   मॅग्नेशियम, ऑक्सिजन व कार्बन


    प्र.6) पुढील विधान AB यांचा विचार करून योग्य पर्याय निवडा
    A.    मॅग्नेशियमला लागलेली आग पाण्याने विझत नाही.
    B.     मॅग्नेशियमवर पाणी टाकले असता पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होऊन ज्वलनशील हायड्रोजन तयार होतो.
    पर्याय :-
    (1)   विधान A बरोबर असून B हे त्याचे योग्य कारण आहे.
    (2)   विधान A बरोबर असून B हे त्याचे कारण नाही.
    (3)   फक्त विधान A बरोबर आहे.
    (4)   फक्त विधान B बरोबर आहे.

    प्र.7) खालीलपैकी कोणत्या खनिजांवर अमेरिकेने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे?

    (1)   पोलाद
    (2)   अॅल्युमिनियम
    (3)   मॅग्नेशियम
    (4)   वरील 1 व 2


    प्र.8) बोंड आळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली आहे. यामध्ये अनुक्रमे कोरडवाहु शेतकर्‍यांना _____ तर बागायती कापूस शेतकर्‍यांना _____ एवढी हेक्टरी भरपाई मिळणार आहे.

    (1)   30,800 रु, 37,500 रु.
    (2)   37,500 रु, 30,800 रु.  
    (3)   30,500 रु, 37,800 रु.
    (4)   37,800 रु, 30,500 रु.


    प्र.9) जनतेतून थेट निवडून येणार्‍या नगराध्यक्षांना किती वर्षे अविश्वास ठरवापासून संरक्षण देणारे विधेयक 7 मार्च 2018 रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आले?

    (1)   एक वर्ष
    (2)   दीड वर्ष
    (3)   2 वर्ष
    (4)   अडीच वर्ष


    प्र.10) खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा
    (1)   नैफियू रिओ यांनी नागालँडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ 8 मार्च 2018 रोजी घेतली.
    (2)   ते नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक पक्षाचे (एनडीपीपी) नेते आहेत.
    (3)   ते चौथ्याण्दा नागालँडचे मुख्यमंत्री बनले आहेत.
    (4)   नागालँड विधानसभा निवडणुकीत एनडीपीपीला एकूण 20 जागा मिळाल्या आहेत.

    प्र.11) फोर्ब्स या मासिकाने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली असून त्याबद्दल पुढील विधांनांचा विचार करा.
    a)      यादीत बिल गेट्स जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ति आहेत.
    b)      मुकेश अंबानी सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्ति ठरले आहेत.
    c)      जेफ बेझॉस हे शतकातील अब्जाधीश ठरले आहेत.
    वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

    (1)   फक्त a
    (2)   फक्त b
    (3)   फक्त c
    (4)   यापैकी नाही


    प्र. 12) कापूस या पिकावर खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अळ्या येतात?
    a)      ठिपक्यांची बोंड आळी
    b)      हिरवी बोंड आळी
    c)      गुलाबी बोंड आळी
    योग्य पर्याय निवडा

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c



     
    उत्तरे :- 1) फक्त a c बरोबर (ही वाढ 1 जानेवारी 2018 या पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.), 2) सुखद यात्रा (त्या माध्यमातून आपत्कालीन स्थितीसाठी 1033हा टोलफ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.), 3) दोन्ही नाही, 4) सर्व a, b, c, 5) मॅग्नेशियम (99%) व अॅल्युमिनियम (1%), 6) विधान A बरोबर असून B हे त्याचे योग्य कारण आहे., 7) वरील 1 व 2, 8) 30,800 रु, 37,500 रु.  9) अडीच वर्ष , 10) 4 (एनडीपीपीला 17 जागा मिळाल्या तर भाजपला 12 जागा मिळाल्या), 11) फक्त a (अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ति ठरले आहेत. मुकेश अंबानी जगातील 19 वे सर्वांत श्रीमंत व्यक्ति ठरले आहेत.), 12) सर्व a, b, c

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad