• New

    लोकसत्ता क्विज: 7 मार्च 2018



    प्र.1) विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक गटामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय जोडीने सुवर्णपदक जिंकले आहे?

    (1)   मनू भाकेर व दीपक कुमार
    (2)   मेहुली घोष व ओमप्रकाश मीथरवाल
    (3)   मनू भाकेर व ओमप्रकाश मीथरवाल
    (4)   मेहुली घोष व दीपक कुमार


    प्र.2) विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय जोडीने कांस्यपदक जिंकले आहे?

    (1)   मनू भाकेर व दीपक कुमार
    (2)   मेहुली घोष व ओमप्रकाश मीथरवाल
    (3)   मनू भाकेर व ओमप्रकाश मीथरवाल
    (4)   मेहुली घोष व दीपक कुमार


    प्र.3) सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने कोणाच्या अध्यक्षतेखाली वेतन-निर्धारण समितीची स्थापना राज्य सरकारने केली आहे?

    (1)   के. पी. बक्षी
    (2)   सुमित मलिक
    (3)   स्वाधीन क्षत्रीय
    (4)   जी. डी. कुमार


    प्र.4) सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्यासंदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे?

    (1)   हेरंब कुलकर्णी
    (2)   बी.सी.खटुआ
    (3)   एस. पी. ढोले
    (4)   वसंत फड


    प्र.5) ज्येष्ठ लेखक वसंत नरहर फेणे यांचे 6 मार्च 2018 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्याबद्दल चुकीचे विधान ओळखा.
    a)      काना मात्रा (1972) हे त्यांनी लिहिलेले पहिले पुस्तक आहे.
    b)      विश्वंभर बोलविले या त्यांच्या कादंबरीसाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला.
    c)      डिसेंबर 2017 मध्ये प्रकाशित झालेली करवारी माती ही कादंबरी त्यांचे शेवटचे पुस्तक ठरले.
    पर्यायी उत्तरे

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c


    प्र.6) एखाद्या हिंदू महिलेने स्वेच्छेने धर्मांतर केले असले तरी वडिलांच्या मालमत्तेवरील तिचा हक्क हिंदू वारसा हक्कांतर्गत अबाधित राहत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?

    (1)   मुंबई
    (2)   दिल्ली
    (3)   पाटणा
    (4)   हिमाचल प्रदेश


    प्र.7) योग्य विधान ओळखा
    a)      मॅग्नेशियम या मूलद्रव्याचा शोध स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ जोसेफ ब्लॅक यांनी लावला.
    b)      हे मूलद्रव्य आवर्त सारणीत तिसर्‍या आवर्तनात व दुसर्‍या गणात आहे.
    c)      या मूलद्रव्याचा अनुक्रमांक ‘12’ आहे.
    योग्य पर्याय निवडा

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c


    प्र.8) पुढील विधांनांचा विचार करा
    a)      भारताच्या नवीन परराष्ट्र सचिवपदी विजय गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    b)      विजय गोखले याआधी चीनमधील राजदूत होते.
    c)      बांग्लादेशचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात.
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c


    प्र. 9) चुकीचे विधान ओळखा
    (1)   कॉनराड संगमा यांनी मेघालयच्या मुख्यमंत्री पदाची 6 मार्च 2018 रोजी शपथ घेतली.
    (2)   ते नॅशनल पीपल्स पक्षाचे (एनपीपी) नेते आहेत.
    (3)   ते मेघालयचे 12 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
    (4)   त्यांना कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे.

    प्र.10) खालीलपैकी बरोबर विधान ओळखा
    a)      फीच या जागतिक पतमानांकन संस्थेने 2017 मध्ये भारताचे पतमानांकन बीबीबी - (उणे) असे ठेवले आहे.
    b)      देशातील गुंतवणुकीबाबतचे हे पतमानांकन नकारात्मक दर्शक आहे.
    c)      यापूर्वी फीचने ऑगस्ट 2006 मध्ये बीबी+ वरून भारताचा गुंतवणूक दर्जा उंचावला होता.
    योग्य पर्याय निवडा

    (1)   फक्त a b बरोबर
    (2)   फक्त b c बरोबर
    (3)   फक्त a c बरोबर
    (4)   सर्व a, b, c बरोबर


    प्र.11) अन्नसुरक्षा विकसित करून ओरिसा येथील आदिवासी जमातींच्या विकासासाठी जमीनीअंतर्गत पाण्याच्या स्त्रोताचे पुनर्भरण आणि सौर सूक्ष्म सिंचनाचे प्रकल्प कार्यान्वयित करण्यासाठी कोणत्या बँकेने ग्रीन क्लायमेट फंड (जीसीएफ) सोबत करार केला आहे?

    (1)   नाबार्ड
    (2)   रिझर्व बँक
    (3)   स्टेट बँक ऑफ इंडिया
    (4)   आयडीएफसी बँक


    उत्तरे :- 1) मनू भाकेर व ओमप्रकाश मीथरवाल (मनू भाकेर ने या स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकले आहे.) 2) मेहुली घोष व दीपक कुमार, 3) के. पी. बक्षी, 4) बी.सी.खटुआ, 5) फक्त a c (काना मात्रा या त्यांच्या कथासंग्रहाला कादंबरीसाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला. विश्वंभर बोलविलेकादंबरीसाठी त्यांना ना. सी. फडके पुरस्कार मिळाला.), 6) मुंबई  7) सर्व a, b, c , 8) फक्त a b (चीनचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात.), 9) 4 (त्यांना बीजेपी व इतर प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे), 10) सर्व a, b, c बरोबर, 11) नाबार्ड   

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad