• New

    लोकसत्ता क्विज : 6 मार्च 2018



    प्र.1) सोडीयम हे मूलद्रव्य वनस्पतीमध्ये खालीलपैकी कोणते महत्त्वाचे कार्य करते?
    a)      वनस्पतींमध्ये  हरितद्रव्य तयार करणे.
    b)      वनस्पती पेशीमधील स्फीती (टर्गर) दाब समतोल ठेवणे.
    c)      पर्णरन्ध्राची उघडझाप करणे.
    योग्य पर्याय निवडा

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c


    प्र.2) चुकीचे विधान ओळखा
    a)      सोडीयमच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब अनुभवास येतो.
    b)      सोडीयमच्या कमतरतेमुळे अल्प रक्तदाब अनुभवास येतो.
    पर्यायी उत्तरे

    (1)   फक्त a
    (2)   फक्त ब
    (3)   दोन्ही
    (4)   दोन्ही नाही


    प्र.3) कोणत्या अवयवातील रेनीन अँजिओटोनिन्स ही प्रणाली सोडीयमची रक्तातील पातळी नियमनाचे कार्य करते?

    (1)   हृदय
    (2)   यकृत
    (3)   किडनी
    (4)   फुफुस


    प्र.4) 5 मार्च 2018 रोजी लॉस एंजलीस येथे पार पडलेला कितवा ऑस्कर सोहळा होता?

    (1)   89 वा
    (2)   90 वा
    (3)   91 वा
    (4)   92 वा


    प्र.5) ऑस्कर पुरस्कार 2018 च्या योग्य जोड्या जुळवा
    a)      सर्वोत्कृष्ट चित्रपट                   1) गेट आऊट
    b)      सर्वोत्कृष्ट अभिनेता                 2) गिलर्मो डेल टोरो
    c)      सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक                 3) गॅरी ओल्डमन
    d)      सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा            4) द शेप ऑफ वॉटर
    योग्य पर्याय निवडा
    (1)   a) 1, b) 2, c) 3, d) 4
    (2)   a) 4, b) 3, c) 2, d) 1
    (3)   a) 4, b) 2, c) 3, d)1
    (4)   a) 1, b) 3, c) 2, d) 4

    प्र. 6) अपांगच्या हक्कांसाठी लढणारे आघाडीचे कार्यकर्ते जावेद अबिदी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा.
    a)      त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे झाला.
    b)      अमेरिकेतील राइट स्टेट विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली.
    c)      अपांगासाठी 1990 चा कायदा होण्यात त्यांचा वाटा होता.
    d)      2013 मध्ये त्यांची इंटरनॅशनल डिसअॅबिलिटी अलायनस च्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
    योग्य पर्याय निवडा

    (1)   फक्त a, b, c बरोबर
    (2)   फक्त b, c, d बरोबर
    (3)   फक्त a, b, d बरोबर
    (4)   सर्व a, b, c, d  बरोबर


    प्र.7) ऑस्कर पुरस्कार सोहळा 2018 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले आहेत?

    (1)   गेट आऊट
    (2)   द डार्केस्ट अवर
    (3)   द शेप ऑफ वॉटर
    (4)   द सायलेंट चाईल्ड


    प्र.8) विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे?

    (1)   रवी कुमार
    (2)   दीपक कुमार
    (3)   यशस्विनी सिंग
    (4)   मनू भाकेर


    प्र.9) विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे?

    (1)   रवी कुमार
    (2)   दीपक कुमार
    (3)   यशस्विनी सिंग
    (4)   मनू भाकेर


    उत्तरे
    1) सर्व a, b, c, 2) दोन्ही नाही , 3) किडनी, 4) 90 वा, 5) a) 4, b) 3, c) 2, d) 1 , 6) फक्त a, b, d बरोबर (कायदा 1995 चा आहे), 7) द शेप ऑफ वॉटर (एकूण चार पुरस्कार. एकूण 13 नामांकणे), 8) मनू भाकेर, 9) रवी कुमार 


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad