• New

    लोकसत्ता क्विज : 5 मार्च 2018



    प्र.1) मेक्सिकोमध्ये पार पाडलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे?

    (1)   जितू राय
    (2)   शहझार रिझवी
    (3)   ओम प्रकाश 
    (4)   मेहुली घोष


    प्र.2) मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या ताल चषक आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत खालीलपैकी कोणाला विजेतेपद मिळाले आहे?

    (1)   विश्वनाथ आनंद
    (2)   हिकारू नाकामुरा
    (3)   बोरिस गेलफंड
    (4)   पिटर स्वीडलर


    प्र.3) नुकत्याच पार पाडलेल्या मेघालय विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत?

    (1)   भारतीय जनता पक्ष
    (2)   कॉंग्रेस
    (3)   एनपीपी
    (4)   यूडीपी


    प्र.4) आधार क्रमांक किती अंकांचा असतो?

    (1)   8
    (2)   10
    (3)   12
    (4)   14


    प्र.5) परवानगी नसलेल्या तणनाशकाला अनुकूल जनुक (हार्बिसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जिन) वापरुन बी.टी. बियानांचे अवैध उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली विशेष तपस पथक (एसआयटी) स्थापन केले आहे?

    (1)   सुभाष नगारे
    (2)   संजीव कुमार
    (3)   कृष्णप्रकाश
    (4)   अब्दुल फारूख


    प्र.6) योग्य विधान ओळखा
    a)      राज्याच्या वित्त विभागाने अंगणवाडी सेविकांचे निवृतीचे वय सध्याच्या 65 वर्षावरून 60 वर्षे वर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
    b)      या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2018 पासून करण्यात येणार आहे.
    c)      राज्यात सध्या सुमारे 97 हजार अंगणवाड्या आहेत.
    योग्य पर्याय निवडा

    (1)   फक्त ab
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b c


    प्र.7) खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा
    a)      राष्ट्रीयकृत बँकांचा सद्य:स्थितीचा अहवाल आरबीआयकडून वर्षात तीन वेळा संसदेला सादर करण्यात येतो.
    b)      केंद्र सरकारचे रोखे जोखीम विरहित असतात.
    पर्याय

    (1)   फक्त a
    (2)   फक्त b
    (3)   दोन्ही नाही
    (4)   दोन्ही


    प्र.8) योग्य विधान ओळखा
    a)      सोडियम कार्बोनेट म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरतील मीठ होय.
    b)      सोडियम कार्बोनेट साबनामध्ये वापरले जाते.
    c)      सोडियम कार्बोनेट कठीण पाणी मृदु करण्यासाठी वापरले जाते.
    पर्यायी उत्तरे

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c


    प्र.9) सोडीयम या मुलद्रव्याबद्दल चुकीचे विधान ओळखा
    (1)   सोडियमचा अनुक्रमांक 11 आहे.
    (2)   हे मूलद्रव्य तिसर्‍या आवर्तनातील आणि पहिल्या गणातील मूलद्रव्य आहे.
    (3)   नॅट्रीअम या लॅटिन नावावरून सोडियमची संज्ञा ‘Na’ अशी ठेवण्यात आली.
    (4)   सोडियमची संज्ञा ‘Na’ ही 1814 मध्ये सर हमफ्री डेव्ही यांनी प्रसिद्ध केली.

    प्र.10) प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जेराल्ड रीव्हन यांचे इतक्यात निधन झाले. त्यांच्याबद्दल पुढे दिलेल्या विधांनांचा विचार करून योग्य विधाने ओळखा.
    a)      मधुमेहाचे जगातील प्रमाण फारसे नसताना इन्श्युलीनला आपल्या शरीरात प्रतिरोध झाला तर त्यामुळे टाइप 2 मधुमेह होतो व इतर अनेक रोग उद्भवतात हे त्यांनी सिद्ध केले.
    b)      त्यांनी सिण्ड्रोम एक्स नावच्या रोगाचा शोध लावला व त्या नावाचे पुस्तकही लिहिले
    c)      त्यांनी स्टानफर्ड विद्यापीठात प्राध्यापकाची नौकारी केली.
    योग्य पर्याय निवडा

    (1)   फक्त a b
    (2)   फक्त b c
    (3)   फक्त a c
    (4)   सर्व a, b, c


    प्र.11) कसवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध असलेली वेळास ही सागरी किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात आहे?

    (1)   सिंधुदुर्ग
    (2)   रत्नागिरी
    (3)   रायगड
    (4)   पालघर


    प्र.12) भारताच्या कोणत्या शेजारी देशात पहिल्यांदाच कृष्णकुमारी कोहली ही एक हिंदू महिला सिनेटर झाली आहे?

    (1)   पाकिस्तान
    (2)   बांग्लादेश
    (3)   श्रीलंका
    (4)   चीन


    उत्तरे :- 1) शहझार रिझवी (10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात त्याने सुवर्ण पदक जिंकले आहे. जितू राय व मेहुली घोष यांनी कांस्य पदक जिंकले), 2) विश्वनाथ आनंद , 3) कॉंग्रेस, 4) 12, 5)  कृष्ण प्रकाश (राज्याचे व्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख. सुभाष नगारे हे या एसआयटीचे सदस्य सचीव आहेत., 6) सर्व a, b, c, 7) दोन्ही नाही , 8) फक्त b c (सोडियम क्लोराइड म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरतील मीठ होय.), 9) 4 (सोडियमची संज्ञा ‘Na’ ही 1814 मध्ये जॉन्स जॅकोब यांनी प्रसिद्ध केली.), 10) सर्व a, b, c, 11) रत्नागिरी , 12) पाकिस्तान

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad