• New

    चालू घडामोडी : 13 मार्च 2018

    गुन्हेगारी-मुक्त क्षेत्र (crime-free zone ) :-
    » भारत-बांग्लादेश यांच्यामधील 8.3 किमीचे क्षेत्र  गुन्हेगारी-मुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
    » सशस्त्र सीमा दल (बीएसएफ) आणि बॉर्डर गार्डस बांग्लादेश यांनी 10 मार्च 2018 रोजी हे क्षेत्र घोषित केले.
    » तस्करीसह गुन्हेगारी कृत्यांना रोखणे हा यामागचा उद्देश आहे.

    जॉइन करा » @CurrentDiary

    संवेदना :- 
    » भारतीय हवाई दलाचा पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव
    » केरळच्या किनार्‍यावर 12 मार्च 2018 पासून दक्षिण आशियाई देशांच्या सहयोगाने हा सराव सुरू झाला.
    » या 6 दिवासीय सरावामध्ये श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आणि यूएई च्या हवाई दलाचे प्रतीनिधी सहभागी होणार आहेत.

    जॉइन करा » @CurrentDiary

    रंजन रॉय यांचे निधन :- 
    » 10 मार्च 2018 रोजी दिल्ली येथे निधन 
    » टाइम्स न्यूज नेटवर्कचे प्रमुख 
    » द टाइम्स ऑफ इंडिया राष्ट्रीय संपादक मंडळाचे सदस्य 
    » 1982 मध्ये प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.


    जॉइन करा » @CurrentDiary

    गोदावरी गौरव पुरस्कार :- 
    » प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गोदावरी गौरव पुरस्कार 10 मार्च 2018 रोजी नाशिक येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
    » गोलमाल, छोटी सी बात, चिटचोर सारख्या चित्रपटांत त्यांनी भूमिका केली.
    » 21000 रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
    » कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे हा पुरस्कार दिला जातो.
    » शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांनाही हा सन्मान देण्यात आला आहे.

    जॉइन करा » @CurrentDiary

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad