पनामा पेपर्स : मोसॅक फॉन्सेकाची 11 लाख गोपनीय कागदपत्रे उघड
पनामा पेपर्स म्हणजे काय?
- उत्तर व दक्षिण अमेरिका यांच्या मधोमध वसलेल्या पनामा या देशात २१ अन्य देशांतून व अधिकारक्षेत्रांतून अब्जावधी रुपये जमवण्यात आल्याचे व याद्वारे कोट्यवधींचा कर चुकवल्याचे उघड झाले.
- इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट अर्थात आयसीआयजे या गटाने ही माहिती रविवारी उघड केली.
- ही सर्व रक्कम मोझॅक फोन्सेका या विधी कंपनीमध्ये ठेवण्यात आली आहे. याविषयी ११.५ दशलक्ष कागदपत्रे मिळाली असून २.६ टेराबाइट माहिती समोर आली आहे. यासाठीच याला पनामा पेपर्स असे नाव पडले आहे.
मल्टि-एजन्सी गट:
या गटात केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळ (सीबीडीटी), फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (एफआययू), फॉरेन टॅक्स अँड टॅक्स रिसर्च (एफटीअँडटीआर) व रिझर्व्ह बँक या तपास यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. याखेरीज विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आली असून हे पथक आयसीआयजेने उघड केलेल्या भारतीयांच्या यादीची तपासमी करणार आहे.
- भारतातील सुमारे 500 उद्योजक, सत्ताधीश आणि कलाकारांचा काळा पैसा पडून असल्याची धक्कादायक बाब 'पनामा पेपर्स'मध्ये उघड झाली आहे.
- पनामामधील लॉ फर्म मोसॅक फॉन्सेकाची 11 लाख गोपनीय कागदपत्रे उघड झाली आहेत.
- मोसेक फोन्सेका परदेशात कंपन्या स्थापन करुन देण्यास मदत करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
- अनेक नागरिकांनी आपला कर चुकवण्यासाठी मोसेन फोन्सेकाला पैसै देऊन टॅक्स हॅवन्समध्ये कंपन्या स्थापन केल्या.
मोसॅक फॉन्सेकाच्या यादीतील भारतीय:
भारतातील सुमारे 500 उद्योजक, सत्ताधीश आणि कलाकारांचा काळा पैसा.
- अभिनेते अमिताभ बच्चन,
- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन,
- डीएलएफ कंपनीचे के. पी. सिंग व त्यांचे कुटुंबीय,
- गौतम अदानींचे जेष्ठ बंधू विनोद अदानी,
- इंडियाबुल्सचे प्रवर्तक समीर गेहलोतसह इतर अनेकांचा समावेश आहे.
जगभरातील सत्ताधीशांच्या यादीत.....
- रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन
- चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग
- युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को
- इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक
- लिबियाचे मोहम्मद गडाफी
- सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय
- आईसलँडचे पंतप्रधान
- सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय etc....
- जगभरातील पत्रकारांनी विविध देशांमध्ये असलेल्या काळ्या पैशाविषयी तपास केला. तपासाअंती भारतासह जगभरातील अनेक बड्या कंपन्या, राजकारणी आणि उद्योजकांचा काळा पैसा परदेशात असल्याचे आढळून आले आहेत. पनामा पेपर्समध्ये गेल्या 40 वर्षांचे (1977 ते डिसेंबर 2015) व्यवहारांचा तपशील उघड झाला आहे.
- भारतीयांना परदेशात कंपन्या स्थापन करण्याचा अधिकार नाही. परंतु 2004 साली 25,000 डॉलरपर्यंत रक्कम परदेशात पाठवण्याची परवानगी नागरिकांना देण्यात आली होती. परंतु ही परवानगी मिळण्याआधीच अनेक भारतीयांनी परदेशात कंपन्या स्थापन केल्याचे समोर आले आहे. पनामामध्ये कंपन्या स्थापन करण्यासाठी 234 भारतीय पासपोर्ट सादर करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत