आयसीसीच्या जागतिक टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली
- आयसीसीने निवडलेल्या टी-२० जागतिक संघाच्या कर्णधारपदी भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीची निवड केली आहे.
- या संघामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरालाही स्थान मिळाले आहे.
- वर्ल्डकप टी-२०मधील कामगिरीच्या आधारावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी पुरुष आणि महिला संघाची निवड केली.
- या वर्ल्डकपमध्ये कोहलीन १३६.५० च्या सरासरीने एकूण २७३ धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता.
- विराटने या स्पर्धेत २९ चौकार आणि पाच षटकार लगावले.
- या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये तमिम इक्बालच्या पाठोपाठ दुस-या स्थानावर आहे. तमिमने २९५ धावा केल्या.
आयसीसीने निवडलेला टी-२०चा जागतिक संघ -
जेसन रॉय (इंग्लंड), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका, यष्टीरक्षक), विराट कोहली ( भारत, कर्णधार), जो रुट ( इंग्लंड), जोस बटलर ( इंग्लंड), शेन वॉटसन ( ऑस्ट्रेलिया), अँड्रे रसेल ( वेस्ट इंडिज), मिचेल सेंटर ( न्यूझीलंड), डेव्हीड विले ( इंग्लंड), सॅम्युल बद्री ( वेस्ट इंडिज), आशिष नेहरा ( भारत) १२ वा खेळाडू मुस्ताफिझूर रहमान ( बांगलादेश)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत