चालू घडामोडी : 22 डिसेंबर 2016
२२ डिसेंबर :
राष्ट्रीय गणित दिवस
|
थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांची जयंती देशभरामध्ये राष्ट्रीय गणित दिवस
म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांच्या १२५ व्या जयंती निमित्त २०११ पासून हा
दिवस साजरा करायला सुरुवात झाली.
साहित्य अकादमी
पुरस्कार २०१६
|
·
साहित्य अकादमीने साहित्य
अकादमी पुरस्कार-२०१६ ची घोषणा केली असून २४ कवि आणि लेखकांना हा पुरस्कार जाहीर
झाला आहे.
·
२०१६ च्या विजेत्यांत ८
कवितासंग्रह, ७ कथासंग्रह, ५
कादंबऱ्या, २ समीक्षा, १ निबंध संग्रह
व १ नाटक या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहे.
·
मराठीसाठीचा साहित्य
अकादमी सन्मान-२०१६ आसाराम लोमटे यांना जाहीर झाला आहे. लोमटे यांच्या "आलोक' या कथासंग्रहाची निवड यासाठी करण्यात आली. लोमटे
यांचा "आलोक' कथासंग्रह २०१० मध्ये प्रकाशित झाला.
·
मराठी साहित्यकृतीची
निवड करणाऱ्या ज्यूरींच्या मंडळात डॉ. गंगाधर पानतावणे, मनोहर जाधव व डॉ. चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.
·
कोकणीसाठी एडविन जे. एफ.
डिसोझा यांना "काळे भांगार' या कादंबरीसाठी
पुरस्कार जाहीर झाला आहे.
·
एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
·
अन्य पुरस्कार विजेते
इंग्रजी - जेरी पिंटो
|
डोगरी- छत्रपाल
|
काश्मिरी- अजीज हाजिनी
|
हिंदी- नासिरा शर्मा
|
गुजराती- कमल वोरा
|
मैथिली- श्याम दरिहरे
|
संस्कृत- सीतानाथ आचार्य शास्त्री,
|
बंगाली- नृसिंह प्रससाद भादुरी
|
कन्नड- बोलवार महंमद कुट्टी
|
आसामी- ज्ञान पुजारी
|
बोडो- अंजू नार्जारी
|
मल्याळम- प्रभा वर्मा
|
मणिपुरी- मोइराथेम राजेन
|
नेपाळी- गीता उपाध्याय
|
ओडिया- परमिता सत्पथी
|
पंजाबी- स्वराजबीर
|
राजस्थानी- बलाकी शर्मा
|
सिंधी- नंद जावेरी
|
संथाली- गोविंदचंद्र माझी
|
तमिळ- वन्नदासन
|
तेलगू-पापिनेनी शिवशंकर
|
उर्दू- निजाम सिद्दिकी.
|
|
|
आयसीसी पुरस्कार
२०१६
|
·
भारताचा फिरकी गोलंदाज आर.
अश्विन याची २२ डिसेंबर २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी)
सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली असून त्याची कसोटी क्रिकेटमधील
सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही निवड करण्यात आली आहे.
·
आयसीसीच्या वतीने 22
डिसेंबर 2016 रोजी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात
14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 या वर्षभरात केलेल्या सर्वोत्कृष्ट
कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.
·
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक
क्विंटन डी कॉक एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.
·
आयसीसीच्या कसोटी संघाचे
नेतृत्त्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला देण्यात आले असून संघात आर. अश्विन या
केवळ एकाच भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.
·
आयसीसीच्या एकदिवसीय
संघात विराट कोहली याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे, तर संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा याला स्थान मिळाले
आहे.
·
पाकिस्तानचा कसोटी
संघाचा कर्णधार मिस्बा उल हक याला 'स्पिरीट
ऑफ क्रिकेट' हा पुरस्कार देण्यात आला.
·
वेस्ट इंडीजच्या कार्लोस
ब्रेथवेटला टी-20 परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमानला
उभारता खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
·
सर्वोत्कृष्ट पंच म्हणून
मरेइस इरॅस्मस यांची निवड झाली आहे.
·
आयसीसीच्या सहयोगी
देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद ठरला आहे.
·
महिलांमध्ये
सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आणि टी-20 खेळाडू म्हणून न्यूझीलंडची सुझी बेट्सची निवड
झाली आहे.
नगराध्यक्षांच्या
अधिकारात वाढ
|
·
थेट जनतेतून निवडून आलेल्या
नगराध्यक्षांना विविध अधिकार देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने २२ डिसेंबर २०१६ रोजी
दिला आहे. यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती
आणि औद्योगिक नगरी अधिनियममध्ये सुधारणा करण्यात आली असून, नुकत्याच
पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबतचे विधेयक पारीत करण्यात आले.
-
उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक
म्हणून नगराध्यक्षाला मतदान करता येणार
-
समसमान मते पडल्यास निर्णायक
मताचादेखील अधिकार देत नगराध्यक्षाला दुहेरी अधिकार
-
नामनिर्देशित सदस्य निवडताना
समान संख्या असलेल्या गटापैकी एका गटात स्वतःचा समावेश करून त्या पक्षाची सदस्य संख्या
वाढविण्यासही नगराध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
-
नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण
सभा बोलविण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा
अधिकार.
-
पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा
अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षास देण्यात आला आहे.
# नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत 161
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहेत. त्यापैकी भाजपचे सर्वाधिक
म्हणजे 52 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
# नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून
देण्याच्या महत्त्वाकांक्षी बदलास ११ मे
२०१६ रोजी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी
दिली, तर नगरपालिकांत दोन वॉर्डचा मिळून एक प्रभाग निर्माण
करून प्रभागनिहाय निवडणुका घेण्याचा निर्णयदेखील या वेळी घेण्यात आला.
# पंधरा वर्षांनंतर राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड
होणार आहे. राज्यात यापूर्वी सन २००१ व
त्याहीपूर्वी सन १९७१ अशी दोनदा नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत