• New

    चालू घडामोडी : 19 & 20 डिसेंबर 2016

    करुण नायरचे त्रिशतक
    ·        इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत. नायरने भारताचा सर्वात तरुण त्रिशतकवीर होण्याचा मान मिळविला.
    ·        इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात नायरच्या त्रिशतकी खेळीनंतर 7 बाद 759 धावसंख्येवर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.  कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताची 9 बाद 726 ही सर्वोच्च धावसंख्या होती. श्रीलंकेविरुद्ध 2009 मध्ये मुंबईत भारताने ही कामगिरी केली होती.
    ·        याच कसोटीत भारताने आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद पहिल्यांदा पटकावले. त्याच सामन्यात सेहवाग (293) तिसऱ्या त्रिशतकापासून दूर राहिला होता.
    एक विक्रमी दिवस
    -          भारताची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या (7 बाद 759)
    -          कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या
    -          इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावातील पिछाडी मोठ्या फरकाने भरून काढली
    -          करुण नायरचे (नाबाद 303) त्रिशतक. भारताकडून कसोटी क्रिकेटमधील तिसरी घटना
    -          कसोटीत त्रिशतक झळकावणारा दुसरा भारतीय
    -          पहिल्या शतकी खेळीचे त्रिशतकात रुपांतर करणारा पहिला भारतीय
    -          25 वर्षे आणि 13 दिवस. त्रिशतक झळकावणारा पहिला युवा भारतीय फलंदाज
    -          पहिल्याच शतकी खेळीत (नाबाद 303) सर्वोच्च खेळी करणारा नायर पहिला आशियाई खेळाडू
    -          पाचव्या क्रमांकावर येऊन त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय

    तमिळनाडूत शरिया न्यायालयावर बंदी
    ·        तमिळनाडूतील मशिदींमध्ये भरणाऱ्या शरिया न्यायालयांवर २० डिसेंबर २०१६ रोजी मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. प्रार्थनास्थळावर केवळ प्रार्थनाच व्हावी, असे न्यायालयाने संबंधित आदेश देताना स्पष्ट केले आहे.
    ·        अनिवासी भारतीय अब्दुल रहमान यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश संजय कौल व एम. सुंदर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
    ·        राज्य सरकारने अशा शरिया न्यायालयांवर बंदी घालून त्याबाबतच्या सद्यःस्थितीचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

    भारत ६ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था : फोर्ब्स
    ·        फोर्ब्स या मासिकाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताने युकेला मागे टाकून जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
    ·        भारताने १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच युके ला मागे टाकले आहे
    ·        पहिल्या सहा अर्थव्यवस्था : अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रांस, भारत
    ·        २०१६ मध्ये भारताचा वृद्धिदर ७% तर युकेचा वृद्धिदर १.८%

    हिमाचल प्रदेश ठरले सहावे १००% आधार नोंदणी राज्य
    ·        हिमाचल प्रदेश हे राज्य १००% आधार नोंदणी झालेले सहावे राज्य ठरले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ७२ लाख ५२ हजार ८८० जणांनी आधार नोंदणी केली आहे.
    ·        यापूर्वी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगड या राज्यांनी शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले होते.
    ·        आधार नोंदणीची २०१५  च्या जनगणनेच्या आकड्याशी तुलना केली जाते. या आधारे देशातील सहा राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्ये ठरली आहेत.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad