चालू घडामोडी : 18 डिसेंबर 2016
लेफ्टनंट जनरल
बिपिन रावत नवे लष्करप्रमुख
|
·
भारताचे नवे लष्करप्रमुख
म्हणून केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली आहे.
·
सध्याचे लष्करप्रमुख
जनरल दलबीरसिंह सुहाग हे या महिना शेवटी निवृत्त होत असून, रावत हे त्यांची जागा घेणार आहेत.
·
दोन महिन्यांपूर्वीच
रावत यांच्याकडे लष्कराचे उपप्रमुखपद सोपविण्यात आले होते.
·
१९७८ मध्ये गोरखा
रायफल्समधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली.
·
त्यांनी चीन आणि
पाकिस्तान सीमेवरील भारतीय तुकड्यांचे नेतृत्व केले आहे.
·
रावत यांच्याहून वरिष्ठ
असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलून त्यांना लष्करप्रमुखपद दिल्याने वाद निर्माण
झाला आहे.
एअर मार्शल बी. एस.
धनोआ नवे हवाई दलप्रमुख
|
नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचे नाव सरकारने जाहीर
केले असून हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत
असल्याने त्यांच्या जागी धनोआ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. धानोआ
सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. कारगिल
युद्धावेळी रात्रीच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांनी थेट सहभाग घेतला होता.
राजीव जैन यांची ‘आयबी’च्या प्रमुखपदी निवड
|
·
आयपीएस अधिकारी राजीव
जैन यांची इंटेलिजन्स ब्यूरोच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आयबी’चे प्रमुख दिनेश्वर शर्मा हे महिनाअखेरीस निवृत्त होत असून, त्यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली मुदतवाढ नाकारली आहे. त्यांची जागा
राजीव जैन घेणार असून १ जानेवारी २०१७ ला नवी जबाबदारी स्वीकारतील.
·
राजीव जैन हे १९८० च्या
बॅचचे झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या ‘आयबी’मध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत
असून त्यांनी अतिशय संवेदनशील असलेल्या जम्मू आणि काश्मीरसंबंधात काम पाहिले आहे.
अनिलकुमार धस्माना
यांची ‘रॉ’ च्या प्रमुख पदी
निवड
|
अनिलकुमार धस्माना यांची भारतीय गुप्तचर संघटना RAW च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून 1 जानेवारी 2017
पासौने ते पदभार स्वीकारतील.धस्माना हे १९८१ च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयपीएस
अधिकारी आहेत. ते सध्याचे ‘रॉ’ प्रमुख
राजेंद्र खन्ना यांची जागा घेतील. धस्माना हे मागील २३ वर्षांपासून ‘रॉ’मध्ये आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत