चालू घडामोडी : 15 डिसेंबर 2016
|
एकाचवेळी दोन
जागांवरून निवडणूक लढण्यास प्रतिबंध करावा
|
·
निवडणूक कायद्यात
सुधारणा करून उमेदवाराला एकाचवेळी दोन जागांवरून निवडणूक लढण्यावर प्रतिबंध घालावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने कायदे मंत्रालयाकडे केली आहे.
काय आहे आयोगाचे मत?
·
उमेदवाराला एकाचवेळी दोन
जागांवरून निवडणूक लढण्यावर प्रतिबंध घालावा
·
जर केंद्र सरकार यात
कोणता बदल करण्यास तयार नसेल तर, अशा स्थितीत
निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी संबंधित उमेदवारावर सोपवावी.
·
किंवा अशा उमेदवाराला
निवडणूक खर्च म्हणून जमा कराव्या लागणाऱ्या रकमेत वाढ करावी.
सुधारणा सुचविण्यामागचे कारण काय?
·
उमेदवाराला एकाचवेळी दोन
मतदारसंघातून निवडणूक लढण्यास कायद्याने मुभा आहे. मात्र, उमेदवार दोन्ही जागांवर निवडून आला तर, त्याला
त्यापैकी एक जागा रिक्त करावी लागते.
·
परिणामी एका जागेसाठी
पुन्हा पोट निवडणूक घेऊन सर्व प्रकिया नव्याने पार पाडावी लागते. हा प्रकार
एकाअर्थी मतदारांसाठी अन्यायकारक असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
·
रिक्त जागेसाठी पुन्हा
निवडणूक घेणे म्हणजे प्रशासकीय यंत्रणा, सरकारी
तिजोरी तसेच, मतदार या सर्वांवर एक अनाहूत ओझे आहे.
|
रेक्स टिलेर्सन हे
अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री
|
अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्झॉन मोबिल या
प्रभावी बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेक्स डब्ल्यू टिलेर्सन
यांच्याकडे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची धुरा सोपविण्यासंदर्भातील औपचारिक
घोषणा केली आहे.
रशियाशी गेली दोन दशके व्यावसायिक संबंध असलेल्या टिलेर्सन यांना रशियाकडून 2013 मध्ये "ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप' पुरस्काराने
गौरविण्यातही आले होते.
|
डिजीटल पेमेंटला
प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाकडून दोन योजनांचा प्रारंभ
|
·
डिजीटल पेमेंटला
प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाने भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजी-धन-व्यापारी
योजना जाहीर केल्या आहेत.
·
याद्वारे वैयक्तिक
खर्चासाठी डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्याला बक्षीस दिलं जाणार आहे.
·
डिजीटल व्यवहाराच्या क्षेत्रात
गरीब, मध्यमवर्ग आणि लहान व्यापाऱ्यांना
आणण्याच्या दृष्टीने या योजना आखण्यात आल्या आहेत.
·
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन
ऑफ इंडियामार्फत या योजनांची अंमलबजावणी होणार आहे.
# भाग्यवान ग्राहक योजना
-
या योजनेअंतर्गत डिजिटल
माध्यमातून पेमेंट करणार्या व्यक्तिला दर दिवशी किमान १००० रुपये तर आठवड्याला १
लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
-
२५ डिसेंबर २०१६ च्या
पहिल्या सोडतीद्वारे योजना कार्यान्वित होणार असून १४ एप्रिल २०१७ रोजी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी महासोडत काढण्यात येणार आहे.
-
१५,००० विजेत्यांना प्रतेकी दररोज १००० रुपये कॅशबॅक बक्षिसे
प्राप्त होणार आहेत
-
योजनेच्या शेवटच्या
दिवशी मेगा परितोषिक विजेता घोषित करण्यात येणार असून त्याला १ कोटी रुपयाचे
बक्षीस देण्यात येणार आहे.
# डिजी-धन-व्यापारी योजना
-
ही योजना देशभरातील
व्यापारी वर्गासाठी आहे.
-
व्यापर्यांना कॅशलेस व्यवहारांसाठी
पीओएस(पॉईंट ऑफ सेल) मशीन अनिवार्य करण्यात आले आहे.
-
या अंतर्गत व्यापारी जर पीओएस च्या माध्यमातून व्यवसाय करत असेल तर त्याला
दर आठवड्याला २५ डिसेंबर २०१६ ते १४ एप्रिल २०१७ पर्यंत ५०,०००
रुपयाचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
-
शेवटच्या दिवशी ५० लाख, २५ लाख आणि १२ लाख रुपयाचे तीन मेगा पुरस्कार जाहीर करण्यात
येणार आहेत.
|
सुषमा स्वराज
ठरल्या ‘ग्लोबल थिंकर’
|
·
केंद्रीय परराष्ट्रमंत्री
सुषमा स्वराज यांचा ग्लोबल थिंकर्स ऑफ २०१६ या सूचीत समावेश झाला आहे.
·
फॉरेन पॉलिसी
मॅगझिनतर्फे ही सूची जाहीर करण्यात येते.
·
या सूचीत स्वराज
यांच्याव्यतिरिक्त अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या हिलरी क्लिंटन, संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीस बान की मून आदींचा समावेश
आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत