चालू घडामोडी : 23 डिसेंबर 2016
बौद्घिक संपदा हक्क प्राधिकरणाची फेररचना
|
·
राष्ट्रीय
बौद्धिक संपदा अधिकार धोरणांतर्गत सरकारने बौद्धिक संपदा हक्क संरक्षण प्राधिकरणाची
पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे. पीक वाण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची जपणूक यासाठी
ही पुनर्रचना करण्यात येणार आहे.
·
सरकारने
प्राधिकरणाला तीन शाखा कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असून पालमपूर (हिमाचल
प्रदेश),
पुणे (महाराष्ट्र) आणि शिवमोगा (कर्नाटक) या तीन ठिकाणी ही
कार्यालये सुरू केली जातील.
·
पिकांच्या
संकरित वाणांसाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार धोरण लागू करण्याच्या तयारीत
सरकार आहे.
·
संरक्षण
प्राधिकरनाचे बौद्धिक संपदा अधिकारांच्या निकषांमध्ये सुधारणा करणे आणि संकरित
वाणांमध्ये बौद्धिक संपदेचा वापर करणे हे
कार्य असेल.
·
त्याचप्रमाणे
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्था, राज्यांमधील कृषी विद्यापीठे, एनएसएआय (नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थांशीही
प्राधिकरणाचे सहकार्य असेल.
·
जागतिक
व्यापार संघटनेच्या करारांच्या पार्श्वभूमीवर वनस्पतींच्या बौद्धिक संपदा
अधिकारांचे त्याचप्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांचे संरक्षण
यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाचे आहे.
ओबामा नावाचा मासा
|
·
अमेरिकेतील
संशोधकांना पिवळ्या, सोनेरी रंगाच्या माशाची एक प्रजाती सापडली असून, या नव्या प्रजातीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा यांचे नाव देण्यात आले आहे.
·
माशांची
ही प्रजाती पॅसिफिक महासागरात हवाई बेटांच्या संरक्षित भागात ३०० फूट खोल असणाऱ्या
कुरे या प्रवाळ बेटांवर आढळली आहे.
·
जपानमध्ये
आढळणा-या माशांच्या प्रजातीशी या माशांचे साधर्म्य आहे असून या माशांवर सखोल
संशोधन सुरु आहे.
का देण्यात आले बाराक ओबामा यांचे नाव?
पापाहनॉमोक्वाकी या सागरी क्षेत्राचे संवर्धन करण्यात ओबामा यांनी सक्रिय
सहभाग घेतला होता. या सागरी पट्ट्यात दुर्मिळ पाणवनस्पती, सागरी जलचरांच्या प्रजाती, दुर्मिळ प्रजातीचे कासव असे जीव नामशेष होण्याच्या मार्गावर
आहेत. त्यामुळे या जीवांच्या संवर्धनाची जबाबदारी बराक ओबामा यांनी घेतली होती.
वैज्ञानिकांनी त्यांचा सन्मान म्हणून या प्रजातीला बराक ओबामा यांचे नाव दिले आहे.
बंगाली कवि शंख घोष
यांना ज्ञानपीठ पुरस्कार
|
·
प्रसिद्ध आधुनिक बंगाली
कवि शंख घोष यांना २०१६ चा प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ते ५२ वे
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ठरले आहेत.
·
हा पुरस्कार मिळवणारे ते
सहावे बंगाली ठरले आहेत. यापूर्वी ताराशंकर बंडोपाध्याय (१९६६), बिष्णु देय (१९७१), आशापूर्णा देवी
(१९७६), सुभाष मुखोपाध्याय (१९९१),
महास्वेता देवी (१९६६) यांना हा पुरस्कार मिळाला होता.
शंख घोष यांच्याविषयी
-
त्यांचा जन्म ६
फेब्रुवारी १९३२ रोजी सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या चाँदपुर मध्ये झाला.
-
महाश्वेता देवी
यांच्यानंतर वीस वर्षांनी साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार
प्रसिद्ध बंगाली कवी व समीक्षक शंख घोष यांना जाहीर झाला आहे.
-
त्यांच्या
साहित्यकृतींचे हिंदी, मराठी, आसामी,
पंजाबी व मल्याळम तसेच पंजाबी या भारतीय तसेच काही परदेशी भाषांत
भाषांतर झालेले आहे.
-
त्यांना २०११ मध्ये
पद्मभूषण हा सन्मान मिळाला, त्याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार,
सरस्वती सन्मान, रवींद्र पुरस्कार, नरसिंहदास पुरस्कार हे इतर मानाचे पुरस्कार त्यांना पूर्वीच मिळाले आहेत.
-
आदिम लता गुलमोमय, मुर्खो बारो, सामाजिक नॉय, बाबोरेर प्रार्थना, दिंगुली रातगुली, निहिता पतलछाया या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या.
-
-
बंगवासी कॉलेज व सिटी
कॉलेज या कोलकाता विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. १९९२ मध्ये ते जादवपूर विद्यापीठातून निवृत्त
झाले.
-
दिल्ली विद्यापीठ, सिमल्याची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज तसेच
विश्वभारती विद्यापीठातही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.
पासपोर्ट नियमांत
बदल
|
§ सरकारने २३ डिसेंबर २०१६ रोजी पासपोर्ट नियमांत मोठे फेरबदल केले असून
पासपोर्टच्या नव्या नियमानुसार साधू व संन्यासी यांना आता त्यांच्या जैविक
पालकांऐवजी आध्यात्मिक गुरूंच्या नावाचा उल्लेख करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
काय आहे नव्या नियमांत?
-
२६ जानेवारी १९८९ नंतर जन्मलेल्या
सर्व अर्जदारांना पारपत्र मिळण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र सादर
करणे अनिवार्य होते. आताही हे प्रमाणपत्र चालणार असले, तरी ते अनिवार्य असणार नाही.
-
आता जन्म दाखला, ट्रान्सफर सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा
दाखला, अखेरचे शैक्षणिक प्रमाणपत्र (मान्यताप्राप्त शाळा
किंवा महाविद्यालय असणे गरजेचे), पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, मतदान
ओळखपत्र, पॉलिसी, बाँड आणि जीवन विमा
पॉलिसी ज्यावर जन्मतारखेचा उल्लेख असेल, अल्पवयीन मुलांचा
पासपोर्ट आता आई-वडील यांच्यापैकी एकाच्या कागदपत्रांवरून काढता येऊ शकेल.
-
लग्नाच्या प्रमाणपत्राची
आवश्यकता नाही.
-
साधू-संत आपल्या आई-वडिलांच्या
नावाऐवजी गुरूंचेही नाव देऊ शकणार. साधू-संतांना
एक ओळखपत्र आणि प्रतिज्ञापत्रही द्यावे लागेल.
-
आता पासपोर्टसाठी जन्म तारखेच्या
पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्राच्या अनिवार्यतेची अट काढण्यात आली आहे.
सर्व राज्यांचे अर्थमंत्री सदस्य असणाऱ्या जीएसटी परिषदेची दोन दिवसांची बैठक
२३ डिसेंबर २०१६ रोजी संपली असून
त्यामध्ये केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) व राज्य वस्तू व सेवा कराच्या
(एसजीएसटी) विधेयकांवर जीएसटी परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीमध्ये एकमत झाले आहे. आता
फक्त एकात्मिक जीएसटीचे (आयजीएसटी) विधेयक आणि केंद्र व राज्यांचे अधिकार
क्षेत्रांबाबतचा (क्रॉस एम्पावरमेंट) तिढा शिल्लक राहिला असून पुढील बैठक ३ आणि ४
जानेवारीला होईल.
भारतीय कुमार संघाने शुक्रवारी 19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत
विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. कर्णधार अभिषेक शर्माच्या (29 धावा आणि 4-37)
अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांनी अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा 34 धावांनी
पराभव केला. भारताने यापूर्वी 2012 आणि 2004 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले
होते.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसह सर्व
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला.
असे आहेत बदल
-
नव्या नियमानुसार 2018 पासून
होणारी विश्वकरंडक हॉकी स्पर्धा 16 संघांची असेल.
-
त्यांना चार गटांत विभागण्यात
येईल आणि गटातील विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
-
त्याचवेळी गटातील
अखेरच्या क्रमांकावरील संघ वगळला जाईल.
-
प्रत्येक गटातील दुसऱ्या
आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात सामने होऊन विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी
पात्र ठरतील. या सामन्यांना "क्रसओव्हर' असे
मानले जाईल.
-
ही स्पर्धा सोळा
दिवसांची असेल.
-
1 जानेवारी 2017 पासून
सर्व स्तरातील हॉकी सामने चार सत्रातच खेळविण्यात येतील. यातील प्रत्येक सत्र
पंधरा मिनिटांचे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत