राष्ट्रीय विज्ञान दिन 2018
» दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
» 28 फेब्रुवारी 1928 रोजी भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमन यांनी 'रामन इफेक्ट'चा शोध लावला होता
» 2018 ची संकल्पना :- शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology for a Sustainable Future)
» 28 फेब्रुवारी हा दिवस 1987 सालापासून ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
काय आहे रामन इफेक्ट’?
28 फेब्रुवारी 1928 या दिवशी रामन यांनी आपलं प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात केलेलं संशोधन जाहीर केलं आणि हे संशोधन ‘रामन इफेक्ट’ या नावाने अजरामर झालं.
रामन इफेक्ट हा प्रकाशाच्या विकिरणाच्या संदर्भातील एक परिणाम आहे. एखाद्या द्रव पदार्थावर पडणारे प्रकाशकिरण आणि त्या द्रव पदार्थामधून बाहेर पडणारे प्रकाशकिरण यांच्यामध्ये योग्य ते प्रकाश शोषक पदार्थ वापरल्यास विकिरण (scattering) प्रक्रियेमुळे वर्णपटामध्ये नवीन रंगरेषा तयार होतात. एकच तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण काही पदार्थावर पडल्यास पदार्थातील रेणूंमुळे प्रकाशकिरणांचे विकिरण होते आणि मूळ प्रकाशाच्या तरंगलांबीइतक्या किरणांबरोबरच वेगळी तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण दिसतात, असं रामन यांनी सिद्ध केलं. रामन इफेक्ट हा प्रकाशाच्या विकिरणाच्या संदर्भातील एक परिणाम आहे. एखाद्या द्रव पदार्थावर पडणारे प्रकाशकिरण आणि त्या द्रव पदार्थामधून बाहेर पडणारे प्रकाशकिरण यांच्यामध्ये योग्य ते प्रकाश शोषक पदार्थ वापरल्यास विकिरण (scattering) प्रक्रियेमुळे वर्णपटामध्ये नवीन रंगरेषा तयार होतात. एकच तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण काही पदार्थावर पडल्यास पदार्थातील रेणूंमुळे प्रकाशकिरणांचे विकिरण होते आणि मूळ प्रकाशाच्या तरंगलांबीइतक्या किरणांबरोबरच वेगळ्या तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण दिसतात, असं रामन यांनी सिद्ध केलं.
सी व्ही रामन :-
» जन्म :- 7 नोव्हेंबर 1888
» निधन :- 21 नोव्हेंबर 1970
» शिक्षण :- बी.ए. (मद्रास विद्यापीठ, 1904) (भौतिकशास्त्रात गोल्ड मेडल), एम.एस.सी. (मद्रास विद्यापीठ, 1907) , एम.ए.
» पुरस्कार :-
- १९३० सालचा नोबेल पुरस्कार सी. व्ही. रामन यांना घोषित झाला.
- सन १९२९ मध्ये ‘सर’ हा किताब
- १९३० मध्ये रॉयल सोसायटीतर्फे दिले जाणारे हायग्रेझ पदक
- १९५१ साली फिलाडेल्फिया विद्यापीठाचे फ्रँँकलिन पदक
- १९५४ साली ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार
- १९५७ मध्ये लेनिन पारितोषिक
» पुस्तके :- ‘मॉलेक्युलर डिफ्रॅक्शन ऑफ लाइट’, ‘स्ट्रिंग्ज अँड डिफ्रॅक्शन ऑफ एक्सरेज’, ‘थिअरी ऑफ म्युझिकल इंस्ट्रमेंट्स’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत