• New

    चालू घडामोडी : 26 फेब्रुवारी 2018

    चेन्नईतील आयआयटीमधे एनटीसीपीडब्ल्यूसी केंद्राची पायाभरणी
    ____________________
    » केंद्रीय भूपृष्ठ, महामार्ग, नौवहन आणि जलस्रोत मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी 2018 रोजी चेन्नईच्या आयआयटी येथे एनटीसीपीडब्ल्यूसी अर्थात बंदरे, जलमार्ग आणि किनाऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी झाली.
    » या उपक्रमासाठी नौवहन मंत्रालय आणि आयआयटी चेन्नई यांच्यातील सामंजस्य करारावरही यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
    » नौवहन मंत्रालयाच्या ‘सागरमाला’ या पथदर्शी कार्यक्रमांतर्गत, हे केंद्र स्थापन केले जाणार आहे.
    » या केंद्रात बंदरे, जलमार्ग आणि किनाऱ्याशी संबंधित संशोधन केले जाईल. तसेच संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान विकसित केले जाईल.
    » या केंद्रासाठी 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

    जॉइन करा » @CurrentDiary @MpscMantra

    देशातील 15 शहरांमध्ये इंटरमोडल स्थानके उभारली जाणार:- 

    » नागपूर आणि वाराणसीमध्ये इंटरमोडल स्थानके उभारण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सविस्तर अभ्यास केला असून, देशभरातील 15 शहरांमध्ये प्राधान्याने अशी स्थानके उभारली जाणार आहेत.
    » नागपूर आणि वाराणसीमध्ये सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर या स्थानकांची उभारणी केली जाईल.
    » या स्थानकांवर रेल्वे, रस्ते, बस, खाजगी वाहने तसेच जलवाहतुकीची सुविधा प्रदान केली जाईल.
    » अशा इंटरमोडल स्थानकांच्या माध्यमातून रस्ते, पुल आणि उड्डाणपुलांचा वापर करत, रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार केला जाणार आहे. पुढच्या तीन वर्षात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने ही स्थानके निर्माण केली जाणार आहेत.
    » प्रायोगिक तत्वावर नागपूरमध्ये अजनी येथे, तर वाराणसीमध्ये काशी येथे अशा प्रकारची स्थानके विकसित केली जातील.
    » नागपूरच्या स्थानकामध्ये 7, तर वाराणसीच्या 5 रेल्वे फलाटांची तरतूद आहे.

    जॉइन करा » @CurrentDiary @MpscMantra

    उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 338 कामगारांना प्रधानमंत्री श्रम पुरस्कार प्रदान :- 
    _____________
    » उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी 26 फेब्रुवारी 2018 रोजी नवी दिल्ली येथे 338 कामगारांना प्रधानमंत्री श्रम पुरस्कार प्रदान केले.
    » 2011 ते 2016 अशा 6 वर्षांसाठीचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांबरोबरच 500 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या खाजगी कंपन्यांमधील उत्पादकता, सुरक्षा, दर्जा, नाविन्यता, स्रोतांचे संरक्षण, समयसूचकता आणि असामान्य शौर्य दाखवणाऱ्या कामगारांना हे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
    » श्रम रत्न, श्रम भूषण, श्रम वीर श्रम विरांगना, श्रम श्री आणि श्रम देवी अशा गटांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
    » एकूण 338 विजेत्यांमध्ये 20 महिलांचा समावेश होता तर दोघांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले.

    जॉइन करा » @CurrentDiary @MpscMantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad