मानवी डोळा (Human Eye)
» प्राण्यांमधील प्रकाशसंवेदी व प्रतिमाग्राहक इंद्रियाला डोळा म्हणतात.
» डोक्याच्या कवटीतील खाचेत डोळा सात अस्थींनी वेढलेला असतो.
» डोळ्याचा व्यास साधारणपणे २.५ सेंमी. असून सर्व प्रौढ व्यक्तींमध्ये त्याचा आकार जवळपास सारखा असतो.
» संयोजी ऊतींमधील मेदामुळे डोळा स्थिर राहतो.
» वरची पापणी आकाराने मोठी तर खालची पापणी लहान असते.
» जागे असताना दर मिनिटास ८-१० वेळा पापण्यांची उघडझाप होते.
» डोळा तीन थरांनी बनलेला असतो. या थरांना बाहेरून आत अनुक्रमे श्वेतपटल (Sclerotic), रंजितपटल (Choroid) आणि दृष्टिपटल (Retina) अशी नावे आहेत.
▪️शवेतपटल (Sclerotic) :-
» हे डोळ्याचे सर्वांत बाहेरील पटल
» ते कोलॅजेन आणि इलॅस्टिन या तंतूंनी बनलेले असते.
» त्याचा बाहेरून दिसणारा भाग पारदर्शक, तर मागचा न दिसणारा भाग अपारदर्शक असतो.
» श्वेतपटलाच्या पारदर्शक भागाला पारपटल म्हणतात.
▪️ रजितपटल (Choroid) :-
» हा डोळ्याचा मधला थर आहे.
» या थरामध्ये रंगीत संयोजी ऊती असतात.
» रंजितपटलाच्या पारदर्शक भागातून दिसणाऱ्या चकतीच्या आकारास बुबूळ (परितारिका) (Iris) म्हणतात.
» बुबळाच्या मध्यभागी लहान-मोठ्या होणाऱ्या छिद्राला बाहुली (Pupil) म्हणतात.
» बुबळात असलेल्या दोन प्रकारच्या स्नायूंमुळे प्रकाशाच्या तीव्रतेनुसार बाहुलीचा आकार लहान-मोठा होतो.
» अंधुक प्रकाशात शक्य तेवढा प्रकाश डोळ्यांत शिरण्यासाठी विस्फारक स्नायुंद्वारे डोळ्यांची बाहुली मोठी होते.
» प्रखर प्रकाशात किमान प्रकाश डोळ्यात शिरण्यासाठी बाहुली लहान होते.
» प्रत्येक व्यक्तीच्या बुबळांचा रंग व रचना वेगळी असते.
नेत्रभिंग (Lens) :-
» बुबळाच्या आतील बाजूस नेत्रभिंग असते.
» नेत्रभिंग बहिर्गोल असून ते नेत्रभिंगकोश या पातळ व पारदर्शक पिशवीत असते.
» नेत्रभिंगकोशाभोवती असलेले रोमकाय स्नायू आणि रोमक प्रवर्ध यांमुळे नेत्रभिगांची जाडी कमी-अधिक होते.
» या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे नेत्रभिंगाचे नाभीय अंतर बदलते आणि प्रतिमा दृष्टिपटलावर स्पष्ट पडते.
अॅक्विअस ह्युमर (नेत्रोद):- नेत्रभिंग व बुबळामुळे डोळ्याच्या पोकळीचे दोन कक्ष होतात. श्वेतपटल आणि बुबूळ यांमधील लहान कक्षाला अग्रकक्ष, तर बुबळाच्या मागच्या बाजूस असलेल्या मोठ्या कक्षाला पश्चकक्ष म्हणतात. अग्रकक्षामध्ये पाण्यासारखा द्रव असतो. त्याला नेत्रोद (अॅक्विअस ह्युमर) म्हणतात.
व्हिट्रिअस ह्युमर (काचाभ द्रव) :- पारपटल आणि नेत्रभिंग या दोन्ही भागांदरम्यानचा भाग या द्रवाने भरलेला असतो. या द्रवाद्वारे पारपटल आणि नेत्रभिंग यांच्या पोषणाचे तसेच वंगणाचे कार्य घडून येते. पश्चकक्षामध्ये विष्यंदी स्वरूपाचा काचाभ द्रव (व्हिट्रिअस ह्युमर) असतो. काचाभ द्रवामध्ये जन्मल्यापासून वयानुसार बदल होत नसल्यामुळे डोळ्यांचा आकार कायम राहतो.
▪️दष्टिपटल (Retina) :-
» डोळ्याचा सर्वांत आतील थर
» तो प्रकाशसंवेदी पेशींच्या थरांनी बनलेला असतो.
» दृष्टिपटलाचा बाह्यस्तर मेलॅनीन या रंगद्रव्याने बनलेल्या पेशींचा असतो.
दंडपेशी आणि शंकुपेशी :-
» प्रकाशसंवेदी पेशी दोन प्रकारच्या असतात: दंडपेशी आणि शंकुपेशी. ही नावे त्यांना आकारानुसार पडली आहेत.
» मानवी दृष्टिपटलात सु. १२ कोटी दंडपेशी आणि सु. ६० लाख शंकुपेशी असतात.
» दंडपेशी आणि शंकुपेशींवर प्रकाश पडल्यास त्या उत्तेजित होतात. उत्तेजित झाल्यामुळे त्या विद्युत विभव (दाब) निर्माण करतात.
» दंडपेशीत ऱ्होडॉप्सीन हे रंगद्रव्य असते. त्यामुळे राखाडी रंगाच्या छटा ओळखता येतात.
» शंकुपेशीत तीन रंगद्रव्ये असतात. त्यामुळे रंगांचे ज्ञान होते आणि उजेडात प्रतिमा स्पष्ट दिसतात.
» शंकुपेशीतील सायनोलेब, क्लोरोलेब आणि एरिथ्रोलेब या रंगद्रव्यांद्वारे अनुक्रमे निळा, हिरवा आणि लाल रंग शोषले जातात. त्यामुळे आपले डोळे २०० पेक्षा अधिक रंगछटांतील फरक ओळखू शकतात.
» डोळ्यातील प्रकाशसंवेदी रंगद्रव्य कणांच्या शोधाबद्दल १९६७ सालचे नोबेल पारितोषिक जॉर्ज वॉल्ड यांना देण्यात आले.
अंधबिंदू (Blind Spot) :- दृष्टिपटलाच्या ज्या भागातून दृष्टिचेता डोळ्यांमध्ये प्रवेश करते तेथे दंडपेशी व शंकुपेशी नसतात. या भागास अंधबिंदू म्हणतात.
पीतबिंदू (yellow spot) :-
» दृष्टिपटलाच्या मध्यभागात एक वर्तुळाकार पिवळसर भाग दिसतो. त्यास पीतबिंदू म्हणतात.
» दृष्टिपटलाच्या मध्यभागाजवळ असलेल्या पीतबिंदूमध्ये प्रामुख्याने शंकुपेशी असतात. आपण जे पाहतो, त्याची स्पष्ट प्रतिमा या भागाद्वारे निर्माण होते.
▪️परतिमाग्रहण :-
» डोळ्यांची रचना एखाद्या कॅमेऱ्यासारखी असते. परंतु डोळ्यांचे कार्य कॅमेऱ्याहून अधिक संवेदनशील असते.
» प्रतिमाग्रहण आणि क्रमवीक्षण (स्कॅनिंग) या दोन्ही क्रिया डोळ्यांमध्ये एकाच वेळी घडत असतात.
» नेत्रभिंगाद्वारे दृष्टिपटलावर पडलेली प्रतिमा उलटी, लहान व खरी असते.
▪️दष्टिदोष :-
निकटदृष्टिता (myopia):-
» निकटदृष्टिता दोषामुळे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.
» वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होत असल्यामुळे निकटदृष्टिता दोष उद्भवतो.
» अंतर्वक्र भिंगांचा चष्मा लावल्यास प्रतिमादृष्टिपटलावर पडते.
दूरदृष्टिता (hyperopia) :-
» दूरदृष्टिता दोष असल्यास दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, परंतु जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.
» या दोषामुळे वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पलीकडे तयार होते.
» बहिर्वक्र भिंगांचा चष्मा लावल्यास हा दोष सुधारता येतो.
जरादृष्टिक्षीणता :-
» मनुष्याचे सामान्यपणे ४०-५० वर्षे वयाच्या दरम्यान नेत्रभिंग कठीण होऊ लागते आणि लवचिकपणा कमी होतो. त्यामुळे काही जणांमध्ये निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता हे दोन्ही दोष एकाच वेळी होतात. या अवस्थेला जरादृष्टिक्षीणता म्हणतात.
» निकटदृष्टिता व दूरदृष्टीता हे दोष शस्त्रक्रियेने दूर करता येतात. या शस्त्रक्रियेला लॅसिक शस्त्रक्रिया म्हणतात. यात लेसर किरणांचा वापर करून पारपटल पूर्ववत केले जाते.
रंगांधळेपणा (color blindness) :-
» हा आनुवंशिक दोष आहे.
» ज्या व्यक्तित हा दोष असतो ती व्यक्ती रंग किंवा रंगाच्या छटा नीट ओळखू शकत नाही.
» रंगांधळेपणाचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत