स्मशानभूमिती नैवेद्यावर गुजराण करून बनला पीएसआय
जगामध्ये बहुतांशी यशस्वी व्यक्तींच्या पाठीशी त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य हे असतेच. खडतर परिस्थितितून शिक्षण घेत यशोशिखर गाठलेल्या व्यक्तींमध्ये पोलिस उपनिरीक्षक संभाजी कांबळे यांचाही उल्लेख करावा लागेल. परिस्थितीमुळे त्यांना स्मशानभूमीत ठेवलेले नैवेद्य खाऊन गुजराण करावी लागली. परंतु त्यातून त्यांनी शिक्षण घेत पोलिस उपनिरीक्षकपदापर्यंत मजल मारली.
कोल्हापूर जिल्ह्यातील किनी-घुणकी या गावात राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितून अनेक संकटावर मात करत आज मुंबई सारख्या महानगरात पोलिस उपनिरीक्षक पदावर संभाजी कांबळे कार्यरत आहेत. आई-वडील शेतमाजुर असल्याने वडिलांबरोबर दुसर्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करत शिक्षण घेतले.
किनी-घुणकीच्या स्मशानभूमीशेजारी संभाजी कांबळे यांची झोपडी होती. या स्मशानभूमीमध्ये ठेवलेले नैवेद्य खाऊन बर्याचदा आपली गुजराण करावी लागली. परंतु न डगमगता शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून खासगी कंपनीत काम सुरू केले. त्यानंतर होमगार्ड, पोलिसमध्ये भरती होऊन खात्याअंतर्गत परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला... कांबळे यांच्या संघर्षावर आधारित 'फिनिक्स' या लघुपाटाची निर्मिती करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत