• New

    संक्षिप्त घडामोडी : फेब्रुवारी 2017



    फेब्रुवारी 2017
    1)      कोणत्या अभिनेत्रीची नुकतीच स्वच्छ भारत मोहिमेची सदिच्छादूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? अनुष्का शर्मा (अमिताभ बच्चनही या मोहिमेचे सदिच्छादूत आहेत)
    2)      केंद्रीय अर्थसंकल्पात किती रुपयाचा डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? 800 कोटी रुपये (हा निधी नाबार्डमध्ये उभारण्यात येणार आहे)
    3)      केंद्रीय अर्थसंकल्पात सहा सदस्यीय देयके नियामक मंडळ (Payments Regulatory Board) स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असणार आहेत? आरबीआयचे गव्हर्नर (हे मंडळ सध्याच्या देयक नियामक आणि पर्यवेक्षक आणि समझोता व्यवस्थापन मंडळाची जागा घेईल.
    4)      भारतीय कोस्ट गार्ड अमि यूएई यांच्यामध्ये नुकताच संयुक्त सराव दुबई येथे पार पडला. यामध्ये भारतीय कोस्ट गार्डचे कोणते जहाज सहभागी झाले होते? समुद्र पावक (अर्थ समुद्र शुद्ध करणारा)
    5)      आंदमान व निकोबार बेटावर पहिला रेल्वे प्रकल्प सुरू करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प कोणत्या दोन स्थांनाकांना जोडणार आहे? फोर्टब्लेयर-डिगलिपुर (240 किमी)
    6)      BIMSTEC देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोणत्या देशात होणार आहे? भारत (पहिल्यांदाच भारतात)
    7)      अल्पसंख्यांक समुदायातील कारागिर आणि कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हुनर हाथ हा उपक्रम कोणत्या शहरात पार पडला? दिल्ली (दुसरी आवृत्ती. संकल्पना : हस्तकला और पाककृती का संगम)
    8)      संजय किशन कौल, शांतनगौदार मोहन मल्लिकार्जुन गौडा, नवीन सिन्हा, दीपक गुप्ता आणि एस. अब्दुल नझिर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे.
    9)      केंद्र सरकारने सौर ऊर्जा क्षमता 20,000 मेगावॅट वरुन वाढवून किती करण्याचा निर्णय घेतला आहे? 40,000 मेगावॅट
    10)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी 112 फूट उंच शिव मूर्तिचे कोणत्या ठिकाणी अनावरण केले आहे? कोइंब्तुर (तमिळनाडू)
    11)  आदियोगा: द सोर्स ऑफ योगा या योग विज्ञानवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले? नरेंद्र मोदी  
    12)  भारत कोणत्या देशबरोबर राजनैतिक संबंधाचे 25 वे वर्ष साजरे करत आहे? इस्राइल (1992 मध्ये हे संबंध प्रस्थापित झाले होते)
    13)  अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या कोणत्या चित्रपटाला ग्लासगोव फिल्म फेस्टिवल मध्ये पेक्षक अवॉर्ड मिळाला आहे? लिपस्टिक अन्डर माय बुरखा
    14)  केंद्र सरकारने प्रत्येक गावापर्यंत हाय स्पीड ब्रौडबॅंड सुविधा कोणत्या सालापर्यंत पुरविण्याचे लक्ष जाहीर केले आहे? 2018
    15)  जीवाश्म इंधनात संपूर्णपणे गुंतवणूक थांबविण्याचा निर्णय घेणारा जगातील पहिला देश कोणता? आयरलॅंड
    16)  कोणत्या शेजारील देशमध्ये नुकताच महितीचा अधिकार अधिनियमाची नुकतीच अमलबजावणी सुरू झाली? श्रीलंका
    17)  चीन 2016 मध्ये 77.42 GW सौर ऊर्जा निर्माण करून जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. चीनने कोणत्या देशाला मागे टाकले आहे? जर्मनी (भारताने 2016 मध्ये 9 GW सौर ऊर्जा उत्पादित केली आहे)
    18)  देशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या विवाहाचे नियमन करण्यासतही कोणत्या देशाने विधेयक पारित केले आहे? पाकिस्तान
    19)  आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातून (ICC) बाहेर पडण्याच्या कोणत्या देशाच्या निर्णयाला आयसीसीने अवैध ठरविले आहे? दक्षिण आफ्रिका
    20)  दहशतवादाचे निर्मूलन कर्णयसाठी कोणत्या देशाने रद्द-उल-फसाद हे लष्करी ऑपरेशन आपल्या देशात राबवत आहे? पाकिस्तान
    21)  थकबाकी न भरल्याने संयुक्त राष्ट्र साधारण परिषदेत 2016-17 च्या बैठकींमध्ये कोणत्या देशांचा मतदान करण्याचा हक्क रद्द करण्यात आला आहे? व्हेनेजुएला आणि लिबिया
    22)  भारतीय रेल्वेची पहिली अंत्योदय एक्सप्रेस कोणत्या दोन स्थांनाकांदरम्यान धावली? एर्णाकुलम(केरळ) ते हवडा (प.बंगाल) (वैशिष्ट्ये : दीर्घ पल्ला, संपूर्ण अनारक्षित, सुपर फास्ट ट्रेन सेवा)
    23)  सामाजिक परिवर्तन (Innovation) केंद्र सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तेलंगणा (निझामबाद मध्ये)
    24)  अन्नधान्याच्या वाटपासाठी रोकडविरहित व्यवस्था स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? गुजरात
    25)  इ-जेल प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? जम्मू व कश्मीर
    26)  कलिमपोंग (Kalimpong) हा नवीन जिल्हा नुकताच कोणत्या राज्याने घोषित केला आहे? पश्चिम बंगाल (राज्याचा 21 वा जिल्हा, दार्जिलिंगपासून वेगळा केला आहे)
    27)  मिल बांचे (Let read together) हा कार्यक्रम प्राथमिक आणि माध्यमिक शासकीय शाळांमध्ये कोणत्या राज्याने सुरू केला आहे? मध्य प्रदेश
    28)  2017 हे वर्ष सफरचंद वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? जम्मू-काश्मीर (देशातील सर्वाधिक सफरचंद उत्पादक राज्य. देशाच्या 71% उत्पादन या राज्यात होते.)
    29)  गुटखा, तंबाखू, पानमसाला आणि नोकोटीनयुक्त अन्य पदार्थांवर एका वर्षाची बंदी नुकतीच कोणत्या राज्याने घातली आहे? पंजाब
    30)  लैंगिक गुन्हेगार रेजिस्ट्री स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? केरळ
    31)  मनरेगा योजनेअंतर्गत सध्याचा 100 दिवसांच्या रोजगार दिवसांमध्ये वाढ करून 150 दिवस करण्यासाठी कोणत्या राज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे? तामिळनाडू
    32)  कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या थंड हवेच्या ठिकाणी सायकल मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे? दार्जिलिंग
    33)  जगातील पहिल्या दहा पुळणीमध्ये राधानगर पुळणीचा समावेश करण्यात आला आहे. ही पुळण कोणत्या ठिकाणी आहे? आंदमानमधील हॅवलॉक बेटावर (ट्रीपअॅडव्हायजरने ही यादी जाहीर केली. ब्राझिलमधील पुळण पहिल्या क्रमांकावर)
    34)  भारतातील पहिली कॅशलेश टाऊनशिप कोणती? गुजरात नर्मदा व्हॅली फर्टीलायझर्स लि.
    35)  इंटेक डीएमएलएसने भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे जेट इंजिन विकसित केले आहे. स्वदेशी बनावटीचे जेट इंजिन विकसित करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? अमेरिका, युरोप आणि इस्राइल नंतर जगातील चौथा आणि आशियातील पहिला.   इंटेक डीएमएलएसने Poeir Jetsया ब्रॅंडखाली हे इंजिन विकसित केले आहे.
    36)  असोचेमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुती करण्यात आली आहे? संदीप जजोडिया
    37)  भारतातील पहिले ऑनलाइन डेबिट कार्ड कोणी सुरू केले आहे? एयरटेल पेमेंट बँक आणि मास्टरकार्ड
    38)  न्यू वर्ल्ड वेल्थनुसार भारतातील सर्वांत श्रीमंत शहर कोणते? मुंबई (मुंबई>दिल्ली>बंगळुरु>कोलकत्ता)
    39)  आफ्रिकन युनियन च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? चाडचे परराष्ट्र मंत्री मुस्सा फाकी महमत. (AU : सदस्य 54, स्थापना 2001, मुख्यालय : Addis Ababa, इथियोपिया)
    40)  राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळच्या महासंचालक पदी कोणाची नेमणूक झाली आहे? आनंद कुमार
    41)  राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंच (एनएसई)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? विक्रम लिमये
    42)  48.8 फूट उंच वाळूचा किल्ला बनवून कोण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविले आहे? सुदर्शन पटनाईक
    43)  भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) पहिल्या महिला संचालक बनण्याचा मान कोणी पटकावला आहे? डॉ. निलू रोहमेत्रा
    44)  कोणत्या भारतीय तबला वादकाने ग्रामी पुरस्कार मिळवाल आहे? संदीप दास
    45)  संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिन तेंडुलकरने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे? डोंजा (जिल्हा उस्मानाबाद) (त्याने पहिल्यांदा आंध्र पदेशमधील पट्टमराजू कंद्रिका हे गाव दत्तक घेतले होते)
    46)  कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? विकास स्वरूप
    47)  जांबूवंतराव धोटे यांचे निधन : वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते. विदर्भाचे सिंह अशी ओळख. 1971 मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य. 2002 मध्ये विदर्भ जनता पार्टी या पासकाची स्थापना. 5 वेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य.
    48)  लिजेंडरी अवॉर्ड 2017 कोणाला प्राप्त झाला आहे? लता मंगेशकर (2012 मध्ये शाह रुख खानला)
    49)  माजी सरन्यायाधीश अल्तमाश कबीर यांचे निधन झाले. ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? 39 वे (अल्पपरिचय: 39 वे सरन्यायाधीश. सप्टेंबर 2012 ते जुलै 2013 असे 9 महीने कार्यकाल. 19 जुलै 1948 रोजी कलकत्ता येथे जन्म. कलकत्ता विद्यापीठातूनच एलएलबी आणि एमए पूर्ण. 1973 मध्ये अॅडव्होकेट म्हणून कारकिर्दीला सुरुवात. 1990 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश. 2005 मध्ये झारखंडचे मुख्य न्यायाधीश. 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयात बढती.)
    50)  कावेरी जलविवाद लवादाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? अभय मनोहर सप्रे
    51)  पी शिवशंकर यांचे निधन : (अल्पपरिचय : सिक्किम आणि केरळचे गव्हर्नरपद. कायदा मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मानव संसाधन विकास मंत्री ही पदे त्यांनी भूषविली. 1979 मध्ये सिकिंदराबाद मतदार संघातून लोकसभेत. 1985-93 गुजरात मधून लोकसभेवर)
    52)  महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? सुमित मल्लीक
    53)  भारतातील पहिले अपंग व्यक्तींचे केंद्र कोठे सुरू होत आहे? गांधीनगर
    54)  भारतात पार पाडलेल्या फिफा अन्डर-17 वर्ल्डकपचे शुभंकर खेलिओ हा कोणता प्राणी होता? बिबट्या
    55)  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 250 बळी घेणारा खेळाडू कोण? रविचंद्रन अश्विन (बांग्लादेश विरुद्ध खेळताना 41 व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.  ऑस्ट्रेलियाच्या डेनीस लीली याचा रेकॉर्ड त्याने मोडला. कसोटीमध्ये 250 बळी घेणारा सहावा भारतीय)
    56)  मार्च 2017 मध्ये पहिला ग्रामीण खेल मोहत्सव कोठे पार पडला? दिल्ली
    57)  शूटिंग वर्ल्डकप : जितू राय (सुवर्ण पदक), हीना सिद्धू (सुवर्ण पदक), अंकुर मित्तल (सिल्वर)
    58)  बीसीसीआयचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ? शांथा रंगास्वामी (माजी भारतीय महिला क्रिकेटपट्टू. पहिली महिला कप्तान. महिला क्रिकेटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला. पहिली कसोटी विजेती कप्तान. अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिली महिला क्रिकेटपट्टू. )
    59)  पहिली राष्ट्रीय महिला संसद कोठे पार पडली? अमरावती (आंध्रप्रदेश) (थिम: महिला सशक्तीकरण – लोकशाही बाळकटीकरण )
    60)  भारतीय बियाणे काँग्रेस 2017 कोठे पार पडली? कोलकत्ता (थिम : सीड ऑफ जॉय)
    61)  यूनेस्कोने नेचर फेस्ट कोठे आयोजित केले होते? हिमालयीन नॅशनल पार्क (हिमाचल प्रदेश)
    62)  वार्षिक कोब्रा गोल्ड संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात पार पडला? थायलंड आणि अमेरिका (29 देशांचा सहभाग)
    63)  दक्षिण आशिया सभापती समिट (Speakers Summit) नुकतीच कोठे पार पडली? इंदोर (मध्य प्रदेश)
    64)  कोणत्या दोन भारतीय चित्रपटांना बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात पुरस्कार मिळाला आहे? न्यूटन आणि आबा
    65)  कोणत्या देशाने टीबी प्रतिबंधक जीवंत गाय विकसित केली आहे? चीन
    66)  केंद्रीय अर्थसंकल्प 2017-18 मध्ये किती विशेष पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? पाच
    67)  जागतिक पाणथळ क्षेत्र दिन कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारी (थिम : आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी पाणथळ प्रदेश.
    68)  जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारी (थिम : वी कॅन, आय कॅन)
    69)  हज धोरण आणि अनुदान समस्येचा विचार करण्यासाठी सरकारने सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे संयोजक कोण आहेत? अफझल अमानूल्लाह
    70)  चौथी बिमस्टेक (BIMSTEC) परिषद 2017 कोणत्या देशात होणार आहे? नेपाळ
    71)  जगातील सर्वांत मोठा डिजिटल साक्षरता कार्यक्रम कोणता? प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान (PMGDISHA)
    72)  निलांबूर साग या वनस्पतीला भौगोलिक निर्देशांक मिळाला आहे. ही वनस्पती कोणत्या राज्यातील आहे? केरळ.
    73)  केंद्रीय एचआरडी मंत्रालयाने मुलींच्या शिक्षणातिल समस्येसाठी सीबीएसईची एक उपसमिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख कोण आहेत? कडियम श्रीहरी (तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री)
    74)  आंध व्यक्तींसाठी जगातील पहिला ब्रेल अॅटलस कोठे प्रकाशित करण्यात आला? दिल्ली (डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते प्रकाशन. NATMO ने बनविला. जगातील पहिलाच ब्रेल अॅटलस. सिल्क-स्क्रीन पेंटिंग तंत्रज्ञानाचा वापर)
    75)  केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थानक पुनर्विकास कार्यक्रमाचा पहिला टप्पा जारी केला. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या स्थांनाकांचा समावेश आहे? पुणे, मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, बोरीवली, लोकमान्य टिळक टर्मिनस
    76)  आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकमध्ये 45 देशांच्या यादीत भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? 43 वा (पहिला: अमेरिका)
    77)  सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? अजय त्यागी 9त्यांनी यूके सिन्हा यांची जागा घेतली. त्यांना 5/65 वर्षे कार्यकाल लाभणार आहे. 1984 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी.)
    78)  राष्ट्रीय उत्पादकता दिन कधी साजरा केला जातो? 12 फेब्रुवारी (थिम : फ्रॉम वेस्ट टु प्रॉफिट-थ्रो रिडूस, रिसायकल अँड रियुज)
    79)  सौर ऊर्जा प्रणाली अस्तीत्वात असलेली भारताचे पहिले हरित जहाज कोणते? आयएनएस सर्वेक्षक
    80)  जागतिक रेडियो दिन कधी साजरा केला जातो? 13 फेब्रुवारी (थिम : रेडियो इज यू)
    81)  भारतातील पहिल्या तरंगत्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? लोकटक सरोवर, मणीपुर
    82)  कंबाला आणि बैलगाडी शर्यत विध्येयक कोणत्या राज्याने पारित केले आहे? कर्नाटक (कांबाला-म्हशींची शर्यत)
    83)  भारतीय हवाई दलाने औपचारिकरित्या पहिली स्वदेशी बनावटीची चेतावणी आणि नियंत्रण प्रणाली  दाखल केली आहे तिचे नाव काय? नेत्र
    84)  2016 चा व्यास सन्मान कोणाला मिळाला आहे? सुरेन्द्र वर्मा. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कटना शमी का वृक्ष : पद्म पंखुडी की धारसे (2010 मध्ये प्रकाशित) साठी देण्यात आला आहे. हा सन्मान के के बिराला फाउंडेशनतर्फे 1991 पासून दिला जातो.
    85)  आर्थिक स्वतंत्रत निर्देशांकमध्ये भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? 186 देशांमध्ये 143 वा क्रमांक. हॉंगकॉंग पहिल्या स्थानी.
    86)  2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने क्लाऊड सिडिंग प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे? सोलापूर
    87)  भारतीय नौदलाने कोणती नौकाविहार बोट नुकतीच समाविष्ट केली आहे? आयएनएसव्ही तारिणी
    88)  भारतीय कॉस्ट गार्डचे कोणते नवीन जहाज फेब्रुवारी 2017 मध्ये दाखल झाले आहे? आयसीजीएस आयुष
    89)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? 20 फेब्रुवारी (2017 ची थिम : Preventing conflict and sustaining peace through decent work)
    90)  भारताचा एकमेव जीवंत ज्वालामुखी इतक्यात सक्रिय झाला आहे त्याचे नाव काय? बॅरन
    91)  शास्त्रज्ञांनी झीलँडिया हा हरवलेला खंड सापडल्याचा दावा केला आहे. हा खंड कोणत्या महासागरातील पाण्याखाली आहे? पॅसिफिक महासागर
    92)  आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? 21 फेब्रुवारी (2017  ची थिम : बहुभाषिक शिक्षणाद्वारे शाश्वत भविष्यकडे)
    93)  राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस 2017 कोणत्या राज्यात पार पडली? केरळ. थिम : शाश्वत विकाससाठी जैवविविधतेला मुख्य प्रवाहात आणणे.
    94)  केंद्र सरकारने साबर स्वच्छता केंद्र कोठे सुरू केले आहे? दिल्ली
    95)  जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार सुलभीकरण कराराची अमलबजावणी सुरू झाली आहे. हा करार कधी स्वीकारण्यात आला होता? 2014
    96)  राहत हा वैद्यकीय प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केल आहे? राजस्थान
    97)  बांगलादेशमधील कोणत्या शहराचा विकास करण्यासाठी भारत आणि बांग्लादेशमध्ये सामंजस्य करार झाला ? सीलहेट
    98)  राष्ट्रीय अनुसूचीत जमतीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? नंदकुमार साई
    99)  भारतातील पहिल्या एकात्मिक हेलीपोर्टचे उद्घाटन कोठे झाले? रोहिणी, नवी दिल्ली
    100)          राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?  28 फेब्रुवारी (थिम : विशिष्ट विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान)


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad