• New

    संक्षिप्त घडामोडी : मार्च 2017

    1)      केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ शक्ति सप्ताह हे अभियान कधी राबविले? 1-8 मार्च 2017
    2)      सर्वोत्तम विद्यापीठ 2017 हा पुरस्कार कोणत्या विद्यापीठाने पटकावला आहे? जेएनयू
    3)      भारतातिल सर्वांत उंच राष्ट्रध्वज पंजाब मधील अटारी सीमेजवळ फडकविण्यात आला त्याची ऊंची किती आहे? 360 फूट. रांची येथील ध्वजाचे 293 उंचीचे रेकॉर्ड मोडले. 
    4)      योगदा सत्संग मठास 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष पोस्टाचे तिकीट काढण्यात आले. या मठाचे संस्थापक कोण होते? परमहंस योगानंद (1917 मध्ये स्थापना)
    5)      भारतातील सर्वांत लांब केबल ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? गुजरात (भरूच येथे नर्मदा नदीवर. लांबी : 1.4 किमी. लार्सन अँड टर्बो (L&T) या कंपनीने बांधला.)
    6)      राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने राष्ट्रीय सुरक्षा आठवडा कधी साजरा केला? 4 ते 10 मार्च 2017. (थिम : किप ईच अदर सेफ)
    7)      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वांत मोठ्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले?  दहेज, गुजरात
    8)      मध्य रेल्वेने भारतातल पहिल्या वातानुकूलित रेल अँबुलंसचे नुकतेच अनावरण केले आहे. ही अँबुलंस कोणत्या स्थानकावर थांबणार आहे? कल्याण
    9)      क्राइम अँड क्रीमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम्सशी (CCTNS) जोडण्यात आलेले भारतातील पहिले पोलिस स्टेशन कोणते? संजौली पोलिस स्टेशन, शिमला (हिमाचल प्रदेश)
    10)  लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? मल्लिकार्जुन खरगे (के व्ही थॉमस यांची जागा त्यांनी घेतली आहे.
    11)  पर्यावरणावरील तिसरी जागतिक परिषद नुकतीच कोणत्या शहरात पार पडली? नवी दिल्ली
    12)  आठवीपर्यंत राज्य मंडळाच्या शाळांमध्ये संस्कृत शिक्षण अनिवार्य करणारे राज्य कोणते? आसाम
    13)  विमानतळ गुणवत्ता सेवा सर्वेक्षणामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या भारतीय विमानतळाने प्राप्त केला आहे? हैद्राबाद
    14)  भारतातील पहिल्या स्मार्ट आदिवासी गावाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? जम्मू-काश्मीर (राजौरी जिल्ह्यात हुब्बी हे गाव)
    15)  नौकारीच्या शोधत असणार्‍यांसाठी मेरा हुनर हे मोबाइल अॅप्लिकेशन कोणत्या राज्याने सुरू केले आहे? हिमाचल प्रदेश
    16)  सरकारने नुकतेच कोणत्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थापन केले आहे? गोरौल, जिल्हा वैशाली (बिहार), तिरूचेरपल्ली (तमिळनाडू) नंतर दुसरे संशोधन केंद्र.
    17)  पाटणा उच्च न्यायालयच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणी शपथ घेतली आहे? न्या. राजेंद्र मेनन
    18)  भारतातील पहिले अनुलंब (Vertical) गार्डन कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? बंगळुरु
    19)  युरोझोनला मागे टाकत कोणत्या देशाची बँकिंग प्रणाली ही जगातील सर्वांत मोठी बँकिंग प्रणाली ठरली आहे? चीन
    20)  कोणत्या देशातील संसदेने  व्हांगानुई नदीला नुकताच कायदेशीर मनुष्याचा दर्जा दिला आहे जो जगातील अशा प्रकारचा पहिलाच निर्णय समाजाला जातो? न्यूझीलँड
    21)  चक्रीवादळ डेबी (Debbie) नुकतेच कोणत्या देशाच्या किनारी भगत थैमान घातले आहे? ऑस्ट्रेलिया
    22)  भारताचा कोणता शेजारील देश तब्बल 19 वर्षानी जनगणना घेत आहे?  पाकिस्तान
    23)  39 वा आंतरराष्ट्रीय योगा फेस्टिवल कोठे पार पडला? ऋषिकेश (उत्तराखंड)
    24)  जल क्रांती अभियानावरील राष्ट्रीय परिषद कोठे पार पडली? नवी दिल्ली
    25)  आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च (थिम : विमेन इन द चेंजिंग वर्ल्ड ऑफ वर्क : प्लॅनेट 50-50 बाय 2030) अभियानाची थिम : #BeBoldForChange
    26)  जागतिक किडनी दिन कधी साजरा जातो? 9 मार्च (2017 ची थिम : किडनी डिसीज अँड ऑबेसिटी : हेल्दी लाईफस्टाइल फॉर हेल्दी किडनी)
    27)  जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? 20 मार्च (2010 मध्ये पहिल्यांदा साजरा)
    28)  पाचवा राष्ट्रीय संस्कृत महोत्सव कोठे पार पडला ? अरुणाचल प्रदेश
    29)  3-7 जानेवारी 2018 रोजी होणारी 105 वी भारतीय विज्ञान कोंग्रेस कोठे होणार आहे? हैदराबाद
    30)  जागतिक व्यापार संघटनेत भारताचे सदिच्छादूत म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? जे एस दीपक
    31)  माजी कोलसभा अध्यक्ष रबी राय यांचे निधन झाले. त्यांचा लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यकाल कोणता होता? नवव्या लोकसभेत 1989-91.
    32)  आर. गांधी यांच्या जागी कोणाची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली आहे? बी पी कनुंगो
    33)  नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज ओलाह यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता? 1994 साली रसायनशास्त्राचा नोबेल. अस्थिर कार्बन रेणु कार्बोकॅटायन (Carbocations) साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.
    34)  डोनाल्ड टस्क यांची यूरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी पुनर्नेमणूक झाली. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत? पोलंड. त्यांची युरोपिय कौन्सिलवर पुन्हा 2.5 वर्षासाठी नेमणूक झाली असून नोव्हेंबर 2019 पर्यन्त ते या पदावर असतील. त्यांची युरोपिय समिटच्या अध्यक्षपदीही पुनरनेमणूक झाली. डिसेंबर 2014 मध्ये त्यांची यूरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
    35)  रोनाल्ड ड्रिवर यांचे निधन झाले. ते स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ आणि गुरुत्व लहरीचे प्रणेते होते. लायगो प्रयोगशाळेचे ते सह संस्थापक होते.
    36)  प्रसिद्ध फोटोजर्नलिस्ट रघु राय यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
    37)  केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? न्या. नवनिती प्रसाद सिंग
    38)  बीएसएफची पहिली महिला फील्ड ऑफिसर कोण ठरली आहे? राजस्थानची  तनुश्री पारीक
    39)  महिला क्रिकेट वर्ल्डकप 2017 च्या सदिच्छादूतपदी आयसीसीने कोणाची नेमणूक केली आहे? सचिन तेंडुलकर
    40)  एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स किताब कोणी जिंकला आहे? रॉजर फेडरर. स्टेन वावरिंकाला हरवून. हे त्याचे पाचवे इंडियन वेल्स किताब आहे त्याने नोवक जोकोविचची बरोबरी केली आहे.
    41)  जानेवारी 2018 मध्ये पाकिस्तान आणि यूएई मध्ये होणार्‍या ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपच्या सदिच्छादूतपदी कोणाची नेमणूक केली आहे? शाहीद आफ्रिदी
    42)  सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपट्टूला देण्यात आला आहे? रविचंद्रन अश्विन. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरनंतर हा पुरस्कार जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हा पुरस्कार आयसीसी कडून प्लेयर ऑफ द इयर हा किताब पटकावणार्‍याला दिला जातो. 2004 मध्ये पहिला पुरस्कार राहुल द्रविडला देण्यात आला.
    43)  जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? 3 मार्च (2017 ची थिम : लिसन टु द यंग व्हायसेस)
    44)  जगातील सर्वांत जुने जीवाश्म नुकतेच कोणत्या देशात सापडले आहे? कॅनडा
    45)  2016 चा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला आहे? कोकणी लेखक महाबळेश्वर सेल. त्यांच्या Hawthan  या कादंबरीसाठी. 1991 पासून हा सन्मान के के बिराला फाउंडेशनतर्फे देण्यात येतो.
    46)  पहिल्यांदाच हत्ती गणनेसाठी चार राज्य एकत्र आली आहेत. टी राज्य कोणती? ओडिशा, पश्चिम बंगाल, छतीसगड आणि झारखंड
    47)  केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नेमणूक झाली आहे?
    48)  नरेंद्र कुमार
    49)  एनटीपीसीने भारतातील सर्वांत मोठे तरंगते सौर फोटोव्होल्टिक प्रकल्प कोठे स्थापन केले आहे? कायमकुलम, केरळ
    50)  मानवी संसाधन सल्लागार संस्था मर्सर च्या अहवालनुसार भारतातील गुणवत्तापूर्ण राहण्यायोग्य शहारच्या यादीत पहिले स्थान कोणत्या शहराने पटकावले आहे? हैद्राबाद
    51)  सीमा संरक्षण संबंधित कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्राला सुपूर्द केल आहे? मधुकर गुप्ता समिती.
    52)  जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? 15 मार्च (2017 ची थिम: बिल्डिंग ए डिजिटल वर्ल्ड कंजूमर्स कॅन ट्रस्ट)
    53)  चेनेनी-नशेरी : भारतातील सर्वांत लांब महामार्ग बोगदा नुकताच कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? जम्मू-काश्मीर
    54)  उत्तराखंड उच्च न्यायालयाने कोणत्या नद्यांना जीवित घटकाचा दर्जा दिला आहे? गंगा आणि यमुना
    55)  जागतिक आनंदी अहवालात भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? 155 देशांच्या यादीत 122 वा क्रमांक. सर्वांत आनंदी देश : नॉर्वे (1), डेन्मार्क (2). सर्वांत दुःखी देश : मध्य आफ्रिकन रिपब्लिक.
    56)  2017 ची विजय हजारे क्रिकेट ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकला आहे? बंगालला हरवून  तमिळनाडूने पाचव्यांदा जिकली. अंतिम सामन्यात बंगालवर तमिळनाडूचा तिसरा विजय.
    57)  जगातील जल दिन कधी साजरा केला जातो? 22 मार्च. 2017 ची थिम : व्हाय वेस्ट वाटर. 1993 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
    58)  मानव विकास निर्देशांक 2016 मध्ये भारताला किटवे स्थान प्राप्त झाले आहे? 131 वे
    59)  भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? माजुली (आसाम)
    60)  जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? 23 मार्च. 2017 ची थिम अन्डरस्टँडिंग क्लाउड्स
    61)  जागतिक क्षयरोगदिन कधी साजरा केला जातो? 24 मार्च. 2017 ची थिम युनाइट टु एंड टीबी
    62)  मार्च 2017 मध्ये भारतीय नौदलाने बराक क्षेपणास्त्र कोणत्या नौकेवरून यशस्वीरीत्या सोडले आहे? आयएनएस विक्रमादित्य.
    63)  अकरावा अर्थ आवर कोणत्या दिवशी पळण्यात आला ? 25 मार्च 2017 . पहिला अर्थ आवर 31 मार्च 2007 रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे पळण्यात आला.
    64)  2017 ची 71 वी संतोष ट्रॉफी (फुटबॉल) कोणत्या संघाने जिंकली आहे? पश्चिम बंगाल. गोव्याला हरवून. पश्चिम बंगालचा विक्रमी 32 वा विजय.
    65)  एसएचजी (सेल्फ हेल्प ग्रुप) आधारित वित्तीय समावेशन मॉडेल स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? ओडिशा
    66)  उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्यातील खाणकामावर पुर्णपणे बंदीचा आदेश दिला आहे.
    67)  धातू खाणींवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ? एल साल्वाडोर
    68)  भारतातील सर्वांत मोठा नदी महोत्सव नाममी ब्रम्हपुत्रा कोणत्या राज्यात पार पडला? आसाम
    69)  न्यू डेवलपमेंट बँकेची दुसरी वार्षिक बैठक कोणत्या देशात होत आहे? भारत
    70)  कोणत्या क्रिकेट संघाने 2017 ची देवधर ट्रॉफी जिंकली आहे? तमिळनाडू.
    71)  सरहूल हा आदिवशी महोत्सव कोणत्या राज्यात पार पडला? झारखंड
    72)  ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्व प्राप्त करणारी पहिली इ-कॉमर्स कंपनी कोणती? पेटीएम
    73)  अटलांटिक परिषदेच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीयची नेमणूक झाली आहे? अनिल अंबानी
    74)  नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनिझेशनचा सदस्य होण्याच्या मार्गावर असलेला देश कोणता? माँटेनिग्रो
    75)  माहिती व प्रसारण मंत्रालयाने कोणती ऑनलाइन चित्रपट प्रमाणन प्रणाली सुरू केली आहे? इ-सिनेप्रमाण 
    76)  कोणत्या क्रिकेट संघाने 2017 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे? ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने जिंकली. रविंद्र जाडेजा मॅन ऑफ द सिरिज
    77)  यूएन वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? डेविड बेसली
    78)  द लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिविल अँड ह्युमन राईट्स ची प्रमुख बनणारी पहिली महिला कोण? वनिता गुप्ता
    79)  कोणत्या अभिनेत्याला कला रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? अनुपम खेर



    अधिक महितीसाठी आमचे तेलेग्राम चॅनल जॉइन करा @mpscmantra
    टेलीग्राम लिंक : https://t.me/mpscmantra

    ©आर्टिकल कॉपी राइट : बालाजी सुरणे 


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad