• New

    भारताचा जीडीपी वृद्धीदर 2016-17 मध्ये 7.1% असेल : सीएसओ


    §  केंद्रीय संखीकी कार्यालयाने जाहीर केलेल्या वृद्धीदर अंदाजानुसार भारताचा जीडीपी 2016-17 मध्ये 7.1% असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2015-16 मध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर 7.6% होता.
    सीएसओचे 2016-17 चे अंदाज
    @ 2016-17 मध्ये दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 1,03,007 रुपये राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षापेक्षा ही वाढ 10.4% असेल. 2015-16 मध्ये 93,293 रुपये एवढे होते.
    @ 2016-17 मध्ये कृषी व संलग्न क्षेत्रातील वृद्धीदर 4.1% असेल. 2015-16 मध्ये हा दर 1.2% होता.
    @ निर्मिती क्षेत्राचा वृद्धीदर 7.4% असेल. यापूर्वी हा दर 9.3% होता.
    @ ढोबळ किंमत वर्धन (जीव्हीए) 7% असेल.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad