• New

    14 वा प्रवासी भारतीय दिन


    §  प्रवासी भारतीय दिनाची 14 वी आवृत्ती भारताचे माहिती तंत्रज्ञान हब असलेल्या बेंगूळुरू (कर्नाटक) येथे पार पडली.
    §  2017 ची थीम : Redefining Engagement with the Indian Diaspora
    §  3 दिवसाच्या या कार्यक्रमात पहिला दिवस युथ प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
    §  मुख्य अधिवेशनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँन्टोनिओ कोस्टा यांच्या हस्ते झाले.
    §  भारतीय वंशाचे पोर्तुगालचे पंतप्रधान अँन्टोनिओ कोस्टा हे यावर्षीच्या प्रवाशी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
    काय आहे प्रवासी भारतीय दिन ?
    @ परदेशात राहणारे भारतीय आणि भारत सरकार यांच्यामध्ये संवाद प्रस्थापित करण्यासाठी  परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि फिक्कीकडून 2003 पासून दरवर्षी साजरा केला जाणारा हा कार्यक्रम आहे.
    @ परदेशातील भारतीय समुदायासोबत प्रतिबद्ध राहण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकारला यामुळे मोठे व्यासपीठ प्राप्त झाले आहे.
    @ प्रवाशी भारतीयांसंबंधित स्थापन करण्यात आलेल्या एल एम सिंघवी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय समितीच्या सिफारशीवरून प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    @ 8 जानेवारी 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी या दिवसाची घोषणा केली होती.
    @ 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण  आफ्रिकेवरुन भारतात परत आले होते त्यामुळे 9 जानेवारी हा दिवस यासाठी निवडण्यात आला.
    @ आपणा भारत, आपणा गौरव या संकल्पनेसह 2015 चा प्रवासी भारतीय दिवस गुजरातमधील गांधीनगर येथे साजरा करण्यात आला होता.
    @ पहिला प्रवाशी भारतीय दिवस 2003मध्ये दिल्ली मध्ये साजरा करण्यात आला असून 2005 मधील तिसरा प्रवासी भारतीय दिवस महाराष्ट्रात मुंबई येथे साजरा करण्यात आला होता.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad