रिसोर्स सॅट-टू एचे यशस्वी प्रक्षेपण
- इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने रिसोर्स सॅट-टू ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
- हा उपग्रह पूर्णपणे स्थापित झाल्यानंतर तो प्रामुख्याने शेतीविषयक कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
- आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन तळावरून पीएसएलव्ही-सी३६ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हा उपग्रह सोडण्यात आला.
- जमीन व पाणीविषयक माहिती मिळवण्यासाठी या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणारी छायाचित्रे उपयुक्त ठरतील.
- हे पीएसएलव्हीचे ३८ वे उड्डाण असून XL गरजांचे अग्निबाण वापरण्यात आले आहे.
रिसोर्स सॅट-टू ए
- वजन १२३५ किलोग्रॅम
- मोहिमेचा कालावधी पाच वर्षे
- यापूर्वी २००३ मध्ये रिसोर्स सॅट-१ तर २०११ मध्ये रिसोर्स सॅट-२ अवकाशात सोडण्यात आले होते.
- दूर संवेदन माहिती सेवा उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे.
- पुढील कॅमेरे त्यावर बसविण्यात आले आहेत
- Linear Imaging Self Scanner (LISS-4) camera,
- medium resolution LISS-3 camera,
- coarse resolution Advanced Wide Field Sensor (AWiFS) camera.
पीएसएलव्ही
- १९९४ पासून २०१६ पर्यंत पीएसएलव्हीने एकूण १२१ उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
- त्यापैकी ४२ भारतीय तर ७९ परकीय उपग्रहांचा समावेश आहे.
- पीएसएलव्ही-एक्सएल : उंची = ४४.४, वजन ३२०१ टन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत