• New

    जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नरेंद्र मोदी




    जागतिक स्तरावरील अत्यंत मानाच्या फोर्ब्समासिकाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील टॉप १० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९ वे स्थान मिळाले आहे.

    महत्वाची मुद्दे :
    • या यादीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सलग चौथ्यांदा आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. 
    • फोर्ब्सने जाहीर केलेल्या या यादीत जगातील सर्वात शक्तिशाली अशा ७४ लोकांची नावे आहेत.  
    • अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २०१५ मध्ये ते या यादीत ७२ व्या स्थानी होते.  
    • बाराक ओबामांचे स्थान ४८ वे आहे, यापूर्वी २०१५ मध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते.
    •  जर्मनीचे चान्सलर एजेंला मर्केल तिस-या स्थानावर आहेत. चौथ्या स्थानावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आहेत. तर पोप फ्रांसिस पाचव्या स्थानी आहेत.  
    • या यादीमध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे ३८ व्या स्थानी आहेत. तर, मायक्रोसॉफ्टचे भारतीयवंशाचे सीईओ सत्या नडेला हे ५१ व्या स्थानावर आहेत. 
    • यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवणारे व्यक्ती: थेरेसा मे (१३), ट्रेव्हिस कलानिक (६४), बॉब इगर (६७), माईक पेन्स (६९), रॉड्रिगो डूतार्ते (७०), शेल्डन अडेल्सोन (७२), अँटोनियो गुटेरर्स (३६), रेसेप एर्दोगन (५६).
    # फोर्ब्स मासिकातर्फे दरवर्षी हि यादी प्रकाशित केली जाते. पहिल्यांदा २००९ मध्ये हि यादी प्रकाशित करण्यात आली .
     

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad