चिनी मांजावर बंदी
- काचेची पूड लावलेल्या चिनी मांजावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने १४ डिसेंबर २०१६ रोजी अंतरिम बंदी घातली.
- या मांजामुळे आतापर्यंत मनुष्यासह प्राणी आणि पक्ष्यांचेही जीव गेले आहेत.
- न्यायाधिकरणाचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
- काचेची पूड, धातूची पूड लावलेला हा मांजा पर्यावरणासाठी घातक असल्याचे न्यायाधिकरणाने निकालात नमूद केले.
- ही बंदी काचेची पावडर असलेल्या नायलॉन, चिनी आणि सुती अशा सर्व प्रकारच्या मांजावर लागू असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
- तसेच, या मांजाच्या घातक परिणामांबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचा आदेश मांजा असोसिएशन ऑफ इंडियाला दिला.
- पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) या संस्थेने ज्येष्ठ वकील संजय हेगडे आणि शदान फरासत यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
- अलाहाबाद हायकोर्टाने २०१५मध्ये उत्तर प्रदेशात चिनी मांजावर बंदी घातली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत