• New

    आर्थिक संकल्पना

    जिफेन वस्तू (Giffen goods) म्हणजे काय?
    सर रॉबर्ट जिफेन यांना असे आढळून आले की, ब्रेडच्या किमती वाढल्याने गरीब लोकांना इतर महाग खाद्यपदार्थ परवडेनासे झाले. त्यामुळे या काळात ब्रेडचा उपयोग वाढला म्हणजे त्यांची मागणी वाढली. याउलट ब्रेडच्या किमती कमी झाल्याने ब्रेडसाठी होणारा त्यांचा खर्च कमी होतो व ते वाचलेला पसा इतर वस्तू विकत घेण्यासाठी करतात. यामुळे ब्रेडची मागणी कमी होते. थोडक्यात जिफेन वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्यांची किंमत जास्त झाल्यास मागणी वाढते तर कमी किमतीत मागणी कमी होते.

    काय आहे फिलिप्स वक्र रेषा?
    फिलिप्स वक्र रेषा ही अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा दर व चलनवाढीतील दर यांतील व्यस्त प्रमाण दर्शवते. बेरोजगारीचा दर कमी असल्यास कामगारांच्या वेतनवाढीचा दर अधिक असतो व त्यामुळे चलनवाढीचा दर वाढतो.

    विनिमय दर म्हणजे काय?
    आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंची खरेदी – विक्री, सेवांचा पुरवठा, कर्जाची देवाणघेवाण, गुंतवणूक असे व्यवहार होतात, तेव्हा परकीय चलनाची गरज भासते. स्थानिक चलन देऊन त्या बदल्यात विदेशी चलन घ्यावे लागते. म्हणजेच स्थानिक चलनाचा विनिमय होतो व त्यासाठी दर ठरवावा लागतो. विदेशी चलनाचे एक परिमाण विकत घेण्यासाठी / विकण्यासाठी स्थानिक चलनाचे किती परिणाम लागते, त्याला विनिमय दर असे म्हणतात.
    एका चलनाची दुसऱ्या चलनाच्या भाषेतील किंमत म्हणजे विनिमय दर होय.
    या चलनाचा विनिमय दर हा जगातील मागणी व पुरवठय़ावर ठरत असतो. भारतात रुपयाचा विनिमय दर मागणी व पुरवठा यांवर ठरत असला तरी तो स्थिर ठेवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक महत्त्वाची भूमिका बजावते.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad