• New

    Participatary Notes (P Notes) म्हणजे काय?

    जेव्हा शेअरबाजार एकदम कोसळला तेव्हा सेबीने पार्टिसिपेटरी नोट्स (सहभाग पत्रे) च्या माध्यमातून झालेल्या विदेशी गुंतवणुकीवर र्निबध आणण्याचा इरादा जाहीर केला होता व तेव्हा P Notes हा विषय एकदम चच्रेत आला.
    विदेशात स्थापन झालेल्या व नोंदलेल्या संस्था ज्या भारतात गुंतवणूक करतात, त्यांना विदेशी गुंतवणूक संस्था असे म्हणतात. मात्र, अशा संस्थांना भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबीकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. १९९१ च्या उदार आíथक धोरणाचाच एक भाग म्हणून सेबीकडे नोंदलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली. भारतीय अर्थव्यवस्थेत विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढावा, हा यामागचा उद्देश होता. गेल्या काही वर्षांपासून असे अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे आकर्षति झाले आहेत. मात्र ज्या गुंतवणूकदारांना भारतातील शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांना सेबीकडे नोंदणी केल्याशिवाय गुंतवणूक करता येत नाही. अशा संस्था भारतात गुंतवणुकीसाठी P Notes या मार्गाचा वापर करतात. या कंपन्या भारतातील शेअर्समध्ये गुंतवणूक करताना त्या संस्थांच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. ज्यांनी सेबीकडे नोंदणी केलेली आहे, ज्या कंपन्यांनी सेबीकडे नोंदणी केलेली आहे, (FII) हे सर्व शेअर्सचे व्यवहार स्वत:च करतात व विदेशी गुंतवणूकदारांना या शेअर्सच्या आधारे त्या किमतीची P Notes देतात. या व्यवहारात झालेला लाभांश स्वाभाविकपणे विदेशी गुंतवणूकदारांना मिळतो. P Notes धारकांची नावे जाहीर करण्याचे कायदेशीर बंधन (FII) वर नाही.
    P Notes चा फायदा : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची कर आकारणी आणि येथील अन्य कायद्यांची बंधने P Notes ना लागू होत नाहीत, त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार P Notes च्या माध्यमातून गुंतवणूक करतात. त्यामुळे भारताकडे विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढतो.
    सहभागपत्राचे धोके : P Notes गुंतवणूकदाराला स्वत:ची ओळख देणे बंधनकारक नाही, त्यामुळे या माध्यमातून गुंतविलेल्या पशाचा स्रोत कळत नाही. तो पसा समाजविघातक संघटनांनी शेअर्स बाजारात लावलेला आहे की काळा पसा शेअर्स बाजारात आलेला आहे, हे कळत नाही.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad