• New

    #आर्थिक संकल्पना

    किंमतवाढ / चलनवाढ म्हणजे काय?
    एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या पातळीत होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे किंमतवाढ होय. किंमतवाढीमुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात, मात्र चलनाची खरेदीशक्ती कमी होत असते.
    चलनवाढीचा परिणाम?
    - चलनाची खरेदीशक्ती कमी होते.
    - वस्तू व सेवांची मागणी वाढलेली असते.
    - रोजगार निर्मितीची क्षमता वाढलेली असते. बेरोजगारी कमी होते.
    - चलनवाढीचा फायदा ऋणकोंना (कर्ज घेणारा) होतो तर धनकोंना ( कर्ज देणारा) नुकसान होते.
    - ऋणको व्यक्ती जेव्हा कर्ज घेतात, तेव्हा चलनाची क्रयशक्ती अधिक असते मात्र तो जेव्हा कर्जाची परतफेड करतो तेव्हा तो धनकोला कमी क्रयशक्ती परत करत असतो.

    चलनघट म्हणजे काय?
    एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या साधारण किमतीच्या पातळीत होणारी घट म्हणजे किंमत घट होय. किंमत घटीमुळे वस्तू व सेवांच्या किमती कमी होतात मात्र चलनाची क्रयशक्ती वाढत असते.
    चलनघटीचा परिणाम काय होतो?
    - वस्तू व सेवांची मागणी कमी झालेली असते.
    - रोजगार निर्मितीची क्षमता कमी होते. यामुळे बेरोजगारी वाढते.
    - याचा फायदा धनकोंना तर तोटा ऋणकोंना होतो.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad