• New

    एकाचवेळी दोन जागांवरून निवडणूक लढण्यास प्रतिबंध करावा



    •  निवडणूक कायद्यात सुधारणा करून उमेदवाराला एकाचवेळी दोन जागांवरून निवडणूक लढण्यावर प्रतिबंध घालावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने कायदे मंत्रालयाकडे केली आहे.

    काय आहे आयोगाचे मत?

    • उमेदवाराला एकाचवेळी दोन जागांवरून निवडणूक लढण्यावर प्रतिबंध घालावा 
    • जर केंद्र सरकार यात कोणता बदल करण्यास तयार नसेल तर, अशा स्थितीत निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी संबंधित उमेदवारावर सोपवावी. 
    •  अशा उमेदवाराला निवडणूक खर्च म्हणून जमा कराव्या लागणाऱ्या रकमेत वाढ करावी.

    सुधारणा सुचविण्यामागचे कारण काय?

    • उमेदवाराला एकाचवेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यास कायद्याने मुभा आहे. मात्र, उमेदवार दोन्ही जागांवर निवडून आला तर, त्याला त्यापैकी एक जागा रिक्त करावी लागते. 
    • परिणामी एका जागेसाठी पुन्हा पोट निवडणूक घेऊन सर्व प्रकिया नव्याने पार पाडावी लागते. हा प्रकार एकाअर्थी मतदारांसाठी अन्यायकारक असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
    •  रिक्त जागेसाठी पुन्हा निवडणूक घेणे म्हणजे प्रशासकीय यंत्रणा, सरकारी तिजोरी तसेच, मतदार या सर्वांवर एक अनाहूत ओझे आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad