चक्रीवादळ
चक्रीवादळ
(सायक्लोन) हे नाव जरी उच्चारले तरी मोठ्या विध्वंसाचा आभास होतो. उत्तर
गोलार्धात घड्याळाच्या उलट्या दिशेने व दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या सरळ
दिशेने वाहणा-या जोराच्या वा-यामुळे हवेमध्ये भोवरा निर्माण होतो. त्याची
पोकळी व तीव्रता वाढत जाते. यामध्ये अफाट शक्तीचा समावेश असतो. सायक्लोन या
शब्दाची निर्मिती सायक्लोस या ग्रीक शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ
सापाचे वेटोळे असा होतो. बंगालची खाडी व अरबी समुद्रामध्ये या वादळांचे
सापाच्या वेटोळ्यासारखे चित्र दिसल्यामुळे हेन्री पेडिंगटन यांनी या
वादळांना सायक्लोन असे नाव दिले. तेथून पुढे या चक्रीवादळांना ‘सायक्लोन’
असे संबोधले जाऊ लागले.
चक्रीवादळांची निर्मिती कशी होते?
चक्रीवादळ हे अत्यंत कमी दाब असलेले क्षेत्र असते. यामध्ये वादळाच्या केंद्रातून दाब वाढत जातो. दबावाचे प्रमाण त्याच्या केंद्रामध्ये कमी कमी होत जाते व बाहेरील वादळाची तीव्रता व हवेचा वेग अधिक वाढत जातो. याचा वेग व शक्ती इतकी असते की, घराच्या भिंतीही ढासळून जातात. रस्त्यावर उभी असलेली कारसारखी वाहने हवेत उडतात. एक पूर्ण विकसित चक्रीवादळ १५० ते १००० कि. मी. एवढ्या अंतराचा टप्पा पार केल्यानंतर १० ते १५ कि. मी. एवढी त्याची उंची वाढते. त्याच्या या विक्राळ रूपात ते आपल्या रस्त्यात येणाºया प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व नष्ट करत चालते. या चक्रीवादळाचा सर्वात शांत भाग त्याच्या नेत्राला मानले जाते. या नेत्राचा व्यास ३० ते ५० कि.मी.पर्यंत असू शकतो. या क्षेत्रामध्ये ढगांसह हलक्या स्वरूपाची हवा असते. या स्वच्छ व शांत नेत्राच्या चारही बाजूंनी वादळी ढगांच्या भिंती असतात. यामध्ये वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कडाडणे आदी विध्वंसक गोष्टींचा समावेश असतो. चक्रीवादळाच्या नेत्रापासून वादळी ढग व हवेची भिंत दूरवर पसरत गेल्यास हवेचा वेग कमी कमी होत जातो. मात्र, काही मोठ्या चक्रीवादळांमध्ये नेत्रापासून ६०० कि.मी.पेक्षाही अधिक दूरवर हा हवेचा वेग ५० ते ६० कि.मी. प्रतितास एवढा असतो. हे चक्रीवादळ एका दिवसामध्ये ३०० ते ५०० कि. मी. अंतराचा टप्पा आपल्या वेगाने गाठते. यामुळेच असे वादळ आपल्यामागे सर्व गोष्टी सपाट करून मृत्यूच्या राशी उभ्या करून जाते. चक्रीवादळ आपल्याकडे नेहमी येत असल्याचे दिसते; मात्र त्यांची तीव्रता कमी-जास्त असते. काही वादळांचा वेग, शक्ती व विशालता खूप मोठी असल्याने त्यांना काही विशिष्ट नावेदेखील पडलेली आहेत.
वादळांना नावे का दिली जातात?
वादळांना नावे देण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. मात्र, अलीकडेच या चक्रीवादळांना महिलांची किंवा त्यांच्या नावाशी साधर्म्य साधणारी नावे दिली जात आहेत. वादळांचा अक्षांश व ते ज्या भागात आले होते तो भाग हे लक्षात ठेवण्यासाठी ही नावे दिली जातात. शिवाय अशी नावे दिल्यामुळे हवामान वेधशाळेद्वारे समुद्रातील जहाजांना सूचना देणे शक्य होते. मियामीपासून काही अंतरावरच नॅशनल हरिकेन सेंटर आहे. हे कें द्र सर्व समुद्रीय वादळांवर कटाक्षाने नजर ठेवते. हवेचा वेग ३९ मैल प्रतितास झाल्यानंतर लगेच त्याला चक्रीवादळ म्हणून घोषित केले जाते व त्याला विशिष्ट नावही देण्यात येते. सुरुवातीला या वादळांना विशिष्ट नाव दिल्यानंतर त्यांचे रूपांतर अधिकृत कागदपत्रांमध्येही केले जाते. ते बदलायचे झाल्यास सुरुवातीचे अक्षर व लिंग कायम ठेवूनच ते बदलले जाते. उदाहरणार्थ सांगावयाचे झाल्यास कॅटरिना या वादळाचे नाव नंतर कॅरीन किंवा कॅट असे ठेवले गेले. यामध्येही सुरुवातीचे अक्षर व लिंग तेच ठेवल्याचे दिसून येते.
भारतीय स्तरावर केले गेलेले प्रयत्न -
वादळांचा अंदाज घेऊन त्यापासून होऊ शकणारी जीवीत हानी टाळण्यासाठी आपल्याकडे काही यंत्रणा सज्ज करणे आवश्यक असते. अशी यंत्रणा असेल तर चक्रीवादळ येण्याचे संकेत मिळताच आपली बचाव व्यवस्था सज्ज ठेवता येते. भारत सरकारने हवामान विभागांना पूर्व किना-यांवरील कोलकाता, विशाखापट्टण, चेन्नई, मछलीपट्टण, पाराद्वीप आदी शहरांसाठी सायक्लोन सर्व्हिलन्स रडार उपलब्ध करून दिले आहेत. पश्चिम किनाºयावरील कोचीन, गोवा, मुंबई, भुज आदी शहरांसाठीदेखील ही सुविधा कार्यान्वित केली गेली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, विशाखापट्टण, कोलकाता व गुवाहाटी येथे लावण्यात आलेली उपकरणे चक्रीवादळांच्या उपग्रहावरून काढल्या जाणाºया चित्रांना रिसिव्ह करतात. त्यामुळे विशिष्ट वादळ कोणत्या दिशेला आणि किती वेगाने येत आहे हे कळते. यावरून आवश्यक उपाययोजना केल्या जातात. आपल्या देशात वातावरणामध्ये होणा-या बदलांचे संकेत मिळण्यासाठी सन १९८३ मध्ये ‘इन्सॅट-एलबी सॅटेलाइट’ बनवण्यात आले. बंगालच्या खाडीत व अरबी समुद्रामध्ये निर्माण होणा-या चक्रीवादळांच्या व त्सुनामीच्या पूर्वसूचना मिळण्यासाठी हवामान खात्याने एरिया सायक्लोन वॉर्निंग सेंटर व सायक्लोन वॉर्निंग सेंटरची स्थापना केली आहे. या दोन केंद्रांवरून समुद्रीय वादळांवर लक्ष ठेवले जाते. अशा वादळांची पूर्वसूचना मिळाल्यास जीवित व वित्तहानी कमीत कमी प्रमाणात होते. त्यामुळे अशा केंद्रांची स्थापना केली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न -
चक्रीवादळ कोणत्याही भागात केव्हाही येऊ शकते. शिवाय यात होणा-या वित्त व जीवित हानीचे प्रमाणही खूप मोठे असते. त्यामुळे या संकटातून वाचण्याच्या दृष्टिकोनातून वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशनने (जागतिक हवामान संघटना) १९७२ मध्ये ट्रॉपिकल सायक्लोन प्रोजेक्ट सुरू केला. या संघटनेच्या सदस्य देशांतील चक्रीवादळांची भीती कमी करणे हा मुख्य उद्देश या संघटनेचा आहे. या संघटनेच्या स्थापनेनंतर वादळांची पूर्वसूचना मिळाल्याने अनेकवेळा मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे. या प्रकल्पामध्ये डब्ल्यूएमओसह इकोनॉमिक अॅण्ड सोशल काऊन्सलिंग फॉर एशिया अॅण्ड पॅसिफिक या संस्थाही आपला सहयोग देत आहेत. या संस्थांच्या सहयोगामध्ये सुसंवाद व योग्य समन्वय साधण्यासाठी एका टेक्निकल सपोर्ट युनिटची (तांत्रिक सहायता गट) स्थापनादेखील केली गेली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय दर चार वर्षांनी सर्व देशांमध्ये बदलत राहते. सध्या हे कार्यालय बांगलादेशाची राजधानी ढाका येथे आहे. या डब्ल्यूएमओ / ईएससीएपी संस्थांचे सदस्य भारत, बांगलादेश, बर्मा, मालदीव, पाकिस्तान, श्रीलंका व थायलंड हे देश आहेत. कोणत्याही देशाकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी त्यांची यंत्रणा असल्याने सर्व देशांच्या चक्रीवादळांचा आढावा व वेध अचूक घेणे शक्य होते. चक्रीवादळ हे एक अक्राळविक्राळ रूप असलेले नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणेच क्रमप्राप्त ठरल्याने वरील जागतिक संघटनेची स्थापना केली गेली.
चक्रीवादळाने नाव
धोक्याचा इशारा तातडीने प्रसृत करता यावा आणि वादळांची नेमकी ओळख असावी, या उद्देशाने काही वर्षांपूर्वीपासून वादळांना नाव देण्याचे ठरवले गेले. आकडा किंवा तांत्रिक संज्ञेपेक्षा नाव लक्षात ठेवणे सोपे जात असल्याने ते ठरवण्यात आले. छोट्या, लक्षात राहण्यासारख्या आणि अर्थवाही नावांमुळे वादळांविषयीच्या बातम्या प्रसारित करणे, त्याविषयीची जागरूकता तयार करणे सोपे जाते. सन १९०० च्या दरम्यान वादळांना स्त्रीलिंगी नावे दिली जायची. नंतर नावांना अधिक शिस्तबद्ध रूप देण्यासाठी ती ‘अल्फाबेटिकली’ द्यायचे ठरवण्यात आले. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या चक्रीवादळाचे नाव ‘ए’ने सुरू व्हायचे. दक्षिण गोलार्धात तयार होणाऱ्या वादळांना पुल्लिंगी नावे देण्याची पद्धत सन १९००च्या अखेरीला सुरू झाली. अटलांटिक उष्णकटिबंधात तयार होणाऱ्या वादळांना १९५३ नंतर ‘नॅशनल हरिकेन सेंटर’ने तयार केलेली नावे दिली जाऊ लागली. आता जागतिक हवामानशास्त्र संघटनेची (वर्ल्ड मेटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन – डब्ल्यूएमओ) आंतरराष्ट्रीय समिती चक्रीवादळांची नावे निश्चित करते. उष्ण कटिबंधातील चक्रीवादळांची नावे कधीही एखाद्या व्यक्तीवरून किंवा ‘अल्फाबेटिकली’ दिली जात नाहीत.जगाच्या विविध प्रदेशांमधील देशांतील संबंधित संस्थांचे प्रतिनिधी ठराविक कालावधीच्या अंतराने भेटतात आणि प्रत्येक समुद्र/महासागरातील आगामी चक्रीवादळांसाठीची नावे निश्चित करतात. हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावे नवी दिल्लीतील ‘रीजनल स्पेशलाइज्ड मेटिऑरॉलॉजिकल सेंटर’कडून ठरवली जातात.
भारताकडून आतापर्यंत चक्रीवादळांना लहर, मेघ, सागर, वायू अशी काही नावे दिली गेली आहेत. आगामी चक्रीवादळांसाठीच्या नावांमध्ये वेगवेगळ्या देशांनी सुचवलेल्या निलोफर, प्रिया, कोमेन, चपला, रौणू आणि असिरी आशा नावांचा समावेश आहे.
चक्रीवादळांना नावे देण्याची प्रक्रिया संपूर्णपणे जाणून घ्यायची असेल, तर पुढील वेबसाइटला जरूर भेट द्या.
http://www.wmo.int/pages/prog/www/tcp/Storm-naming.
सादर लेख PDF स्वरूपात हवा असल्यास येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत