• New

    चलन विषयक धोरण

    देशाच्या आर्थिक धोरणाचे मुख्यतः तीन घटक असतात.
    1. अर्थसंकल्पीय धोरण: दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना  मांडलं जातं (कर, खर्च व कर्ज).अर्थसंकल्पीय धोरण सरकारच्या वतीनं अर्थमंत्री मांडतात.सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार तसेच पंतप्रधानांचं आर्थिक सल्लागार मंडळ यांच्या विचारांचाही या धोरणांवर प्रभाव पडतोच.
    2. चलन विषयक धोरण : दर तीन ते सहा महिन्यांनी मांडलं जातं. सरकारच्या प्रभावापासून दूर असतं.
    3. इतर धोरणं : या घटकात शेती, उद्योग, कामगार, नियोजन, शिक्षण, आरोग्य धोरण आदींचा समावेश होतो. 
    चलन विषयक धोरण
    • रिझर्व्ह बॅंकेच्या कायद्यात (१९३४) तसेच रिझर्व्ह बॅंकेच्या राष्ट्रीयीकरणाच्या (१९४९) कायद्यातही या संबंधीच्या व्यावहारिक तरतुदी करण्यात आल्या. 
    • भारतीय राज्यघटनेत कलम २४६ खाली घटक क्रमांक ३८ प्रमाणे रिझर्व्ह बॅंक हा विषय पूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.
     चलन विषयक धोरणाची उद्दिष्ट 
    1. आर्थिक विकास, वृद्धीदराची वाढ, 
    2. भाववाढीचं नियंत्रण  
    3. विनियम दराचं स्थैर्य 
    • या उद्दिष्टांच्या माध्यमातून उत्पादन, रोजगार व समतेमध्ये वाढ या उद्दिष्टांची पूर्तता करणं यांचा समावेश होतो. 
    त्यासाठी रिझर्व्ह बॅंक पुढील साधनांचा वापर करते
    1. व्याजदर बदल
    2. कर्जरोख्यांची खुल्या बाजारातील खरेदी-विक्री
    3. रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल
    4. कर्ज मार्जिनमध्ये बदल
    5. भेदात्मक व्याजदर
    6. नियंत्रित पतवाटप व नैतिक मनधरणी
    • व्याजदर बदल, हे अधिक नैसर्गिक, समावेशक, समभारी अशा प्रकारचं साधन आहे. ज्या व्याजदरानं रिझर्व्ह बॅंक गरजू व्यापारी बॅंकांना कर्जपुरवठा करते, त्यास व्याजदर म्हणतात. 
    www.balajisurne.blogspot.in
    व्याजदर कमी केल्यास:
    1. कर्जपुरवठा स्वस्त होतो
    2. गुंतवणूक वाढते
    3. रोजगार वाढतो (तंत्र स्थिर धरल्यास) 
    4. वृद्धीदर वाढतो.
    • भाववाढ नियंत्रण करणं हेच एकूण आर्थिक धोरणांचं, विशेषतः चलन धोरणाचं प्रधान उद्दिष्ट मानलं जातं. अलीकडच्या काळात सर्वच प्रमुख देशांमध्ये चलन धोरणाचा प्रधान हेतू हा भाववाढीचं नियंत्रण करणं हाच असतो.
    •  मधल्या काळात माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या वित्तीय संस्थात्मक सुधारणा अहवालामध्ये रिझर्व्ह बॅंकेचे नियमन करणारी स्वतंत्र संस्था असावी असं सुचविलं गेलं. 
    • केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील वाटाघाटीतून एक नवा प्रस्ताव पुढं आला. गव्हर्नराच्या एकमुखी धोरण निर्णयाऐवजी समितीच्या माध्यमातून, लोकशाही पद्धतीनं चलन धोरण ठरवावं असा प्रस्ताव २०१६-१७ चा अर्थसंकल्प मांडतानाच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केला. 
     चलन  धोरण समिती
    • अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केल्याप्रमाणं आता केंद्र सरकारनं (अर्थ मंत्रालयानं) चलन धोरण समिती (एमपीसी) ९ ऑगस्टपूर्वी स्थापन केली जाईल असं सांगितलं आहे. 
    • ही चलन धोरण समिती सहा सदस्यांची असेल. 
    • मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या एका निवड समितीमार्फत यातल्या तीन सदस्यांची निवड केली जाईल. 
    • चलन धोरण समितीचं अध्यक्षपद गव्हर्नरकडं असेल. 
    • रिझर्व्ह बॅंकेच्या इतर संचालकमधून आणखी दोन अधिकारी बॅंक नियुक्त करेल. 
    • या समितीमध्ये गव्हर्नरला निर्णायक मताचा (casting vote) अधिकार असेल. 
    • केंद्र सरकार मध्यवर्ती बॅंकेला भाववाढ - दर लक्ष्य (inflation target) देईल (४% अधिक उणे २%) व ते प्राप्त करण्यासाठी मध्यवर्ती बॅंकेची चलन धोरण समिती, व्याजदर, राखीव निधी, कर्ज मार्जिन, कर्ज नियंत्रण व नैतिक मनधरणी या साधनांचा वापर करेल. 
    • उपस्थित सदस्यांपैकी किमान मतदान करणाऱ्या ४ सदस्यांच्या मतानं धोरण निश्‍चित होईल.
    • विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅंक कायद्याच्या प्रस्ताविकेत भाववाढ नियंत्रण हेच चलन धोरणाचं प्रधान उद्दिष्ट असेल असं नमूद केलेलं आहे.

    www.balajisurne.blogspot.in

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad