• New

    खडकांचे प्रकार

    खडकाची व्याख्या : 
    भूपृष्ठावरील अतिशय कठीण अशा दगडापासून तर अतिशय मृदू अशा बारीक मातीपर्यंत सर्व पदार्थाचा समावेश ‘खडक’ या संज्ञेत होतो.
    खडकांचे वर्गीकरण : 
    वेगवेगळ्या आधारभूत तत्त्वांचा वापर करून विविध प्रकारे खडकांचे वर्गीकरण केले जाते. उत्पत्तीनुसार झालेले खडकांचे वर्गीकरण सर्वमान्य आहे.
    खडकांचे उत्पत्तीनुसार वर्गीकरण :

    १. अग्निजन्य खडक २. जलजन्य किंवा स्तरीत किंवा गाळाचे खडक ३. रूपांतरित खडक.
    १) अग्निजन्य खडक : पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वी वायूरूपात होती. त्यानंतर तिचे रूपांतर तप्त अशा द्रवरूपात झाले. कालांतराने पृथ्वीचे कवच थंड होऊन जे कठीण खडक तयार झाले, त्यांना ‘अग्निजन्य खडक’ असे म्हणतात. भूपृष्ठावरील हे खडक अतिशय प्राचीन व सर्वात प्रथम निर्माण झालेले असल्याने त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. अग्निजन्य खडकांच्या निर्मितीनंतर इतर खडकांची निर्मिती अग्निजन्य खडकांपासून झाली आहे.
    लाव्हारस थंड होण्याच्या स्थितीवरून अग्निजन्य खडकांचे प्रकार : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तप्त लाव्हारस थंड होऊन भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक तयार झाले. अंतर्गत भागातही तप्त लाव्हारस थंड होऊन काही अग्निजन्य खडक तयार झाले. लाव्हारस ज्या ठिकाणी व ज्या स्थितीत थंड झाला त्यावरून त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात- भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक आणि भुपृष्ठांतर्गत अग्निजन्य खडक.

    १) भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक : 
    भूगर्भातील तप्त लाव्हारस भूपृष्ठाला पडलेल्या भेगांमधून ज्वालामुखीच्या रूपाने पृष्ठभागावर येऊन पसरतो. कालांतराने थंड होऊन त्याचे कठीण अशा खडकांत रूपांतर होते, अशा खडकांना ‘बानिर्मित अग्निजन्य खडक’ किंवा ‘ज्वालामुखी खडक’ म्हणतात.
    २) भूपृष्ठांतर्गत अग्निजन्य खडक : 
    बऱ्याच वेळा भूपृष्ठांतर्गत भागातील तप्त लाव्हारस भूपृष्ठावर न येता अंतर्गत भागातच थंड होतो. त्यापासूनही कठीण अशा खडकांची निर्मिती होते. त्यांना ‘अंतर्गत अग्निजन्य खडक’ असे म्हणतात. त्यांची निर्मिती भूपृष्ठापासून बऱ्याच खोलवर होत असल्याने त्यांना ‘पातालिक खडक’ असेही म्हणतात. अंतर्गत भागात लाव्हारस सावकाश थंड होत असल्याने स्फटिकीभवनास जास्त काळ लागतो. म्हणून त्यातील स्फटिक मोठे असतात. भूपृष्ठाची झीज झाल्यावर हे खडक उघडे पडतात. ग्रॅनाइट खडक हे याचे उत्तम उदाहरण आहे. आंध्र प्रदेशात हैद्राबादजवळ, कर्नाटक राज्यात व अबू पर्वतावर हे खडक आढळतात.

    Untitled-26


    अंतर्गत अग्निजन्य खडकांचे उपप्रकार : 
    अंतर्गत भागात तप्त लाव्हारस वेगवेगळ्या पद्धतीने थंड होऊन अग्निजन्य खडक तयार होतात, त्यावरून त्यांचे अनेक उपप्रकार पडतात


    बॅथोलिक : भूपृष्ठापासून जास्त खोलीवर लाव्हारस थंड होऊन अशा प्रकारचे खडक निर्माण होतात. त्यांचा आकार अवाढव्य व ओबडधोबड असतो. लाव्हारस पृष्ठभागावर न येता अंतर्गत भागातच थंड होत असल्याने हवेशी संबंध येत नाही. सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिक कण मोठे असतात.
    लॅकोलिथ : भूपृष्ठाच्या खाली परंतु कमी खोलीवर लाव्हारस थंड होऊन खडक तयार झाले तर त्यांना लॅकोलिथ म्हणतात. इतर बाबतीत त्यांचे बॅथोलिक खडकांशी बरेच साधम्र्य असते. यांचा आकार साधारणत: घुमटाकार असून तळाला पसरट व वरील भाग खडबडीत असतो.
    डाइक : जेव्हा अंतर्गत भागातील लाव्हारस भूपृष्ठातील भेगांमध्ये शिरतो आणि पृष्ठभागावर न येता त्याच ठिकाणी, उभ्या भिंतीसारख्या अवस्थेत थंड होतो. त्यांना डाइक असे म्हणतात. त्यांचा आकार जाडी व लांबी अनियमित असते. ऱ्होडेशियातील एक डाइक ५०० किमी लांब व ८ किमी. रुंदीचा आहे. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यत नंदुरबार व साक्री तालुक्यात अनेक डाइक परस्परांना समांतर आढळतात.
    स्टॉक : भूपृष्ठाला पडलेल्या उभ्या भेगांमध्ये अडकून लाव्हारस थंड होतो. त्याला गोलाकार उभ्या स्तंभासारखा आकार प्राप्त होतो त्याला स्टॉक असे म्हणतात. महाराष्ट्रात मनमाडजवळ असे स्टॉक आढळतात.
    भूपृष्ठाअंतर्गत भागात क्षितिजसमांतर भेगा पडलेल्या असतात. लाव्हारस वर येताना त्या भेगांमध्ये शिरून तिथेच थंड होतो. त्यापासून जे आडवे खडक तयार होतात, त्यांना सील म्हणतात. या प्रकारचा खडक फारच कठीण असतो.
    * रासायनिक गुणधर्मानुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार :
    अ) आम्लधर्मीय खडक : आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत असते. अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असते. हे खडक वजनाने हलके असून त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. घट्ट लाव्हारसापासून त्याची निर्मिती होत असल्याने या खडकांची उंची जास्त, पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे.
    ब) अल्कधर्मीय खडक : या प्रकारच्या अग्निजन्य खडकात ४०% सिलिका व ४०% मॅग्नेशियमचे प्रमाण असते. आयर्न ऑक्साइड व इतर पदार्थ २०% असतात. या खडकाचा रंग काळा असून त्याची झीज लवकर होते. बेसॉल्ट हे याचे उदाहरण आहे. पातळ लाव्हारसापासून हे खडक तयार होत असल्याने भूपृष्ठावर दूरवर पसरलेले असतात.
    * अग्निजन्य खडकांचे गुणधर्म :
    * अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात. निरनिराळ्या आकारांचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे, एकसंध झालेले असतात.
    * हे खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये थर आढळत नाहीत, परंतु जोड असतात.
    * या खडकांमध्ये छिद्र नसते. त्यात पाणी मुरत नाही.
    * अग्निजन्य खडकांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत, परंतु अनेक प्रकारची खनिजे आढळतात.
    २) स्तरित किंवा गाळाचे खडक : भूपृष्ठावर अनेक बा घटक खनन करतात. या घटकांद्वारे प्रथम अग्निजन्य खडकांची झीज होऊन झिजवलेले द्रव्य हे वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा यांद्वारे दुसरीकडे वाहून नेले जाते. शेवटी त्या पदार्थाचे संचयन समुद्रात किंवा एखाद्या जलाशयात होते. एकावर एक असे अनेक थर साचून कालांतराने त्यांचे खडक बनतात. त्यांनाच स्तरित किंवा गाळाचे खडक म्हणतात. त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात-
    * निर्मितीनुसार स्तरित खडकांचे प्रकार :
    १. असेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक.
    २. सेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक.
    * असेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक : हे खडक रासायनिक व यांत्रिक प्रक्रियेने तयार होतात. खनिजद्रव्यानुसार त्यांचे खालील उपप्रकार पडतात-
    अ) वालुकाश्म : बा घटकांद्वारे झालेल्या उत्खननात जर वाळूचे प्रमाण जास्त असेल व त्यांचे जलाशयांच्या तळभागावर संचयन होऊन खडकाची निर्मिती झाली असेल तर त्यांना वाळूचे खडक म्हणतात. यात क्वार्ट्झचे प्रमाण जास्त असून त्यातील सिलिका, आयर्न ऑक्साइड, चिकणमाती व कॅल्शियमचे कण यांसारख्या पदार्थ एकमेकांना चिकटून एकसंध होतात. काँग्लोमरेट व कुरुंदाचे खडक हे वालुकाश्माचे उत्तम उदाहरण आहेत. मध्य प्रदेशात पंचमढी, विंध्य पर्वतीय क्षेत्रात व नर्मदा नदीच्या खोऱ्यात वालुकाश्म मोठय़ा प्रमाणात आढळतात.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad