विविध अहवाल व निर्देशांक (जानेवारी ते डिसेंबर 2017)
संकलन :- बालाजी
सुरणे
व्यवसाय
सुलभता निर्देशांकात भारत १०० वा
·
जागतिक
बंकेतर्फे जाहीर करण्यात येणार्या व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्देशांकच्या
यादीत भारताने यंदा १०० वे स्थान पटकाविले आहे.
·
गतवर्षीच्या
भारताच्या मानांकनात यंदा ३० अंकांनी सुधारणा झाली.
·
आपल्या
मानांकनात सुधारणा साधनार्या सर्वोत्तम १० देशांमध्येही यंदा भारताने स्थान
पटकाविले आहे.
·
दक्षिण
आशियाई देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
·
हा
निर्देशांक व मानांकन ठरविताना भारतातील मुंबई व दिल्ली या दोन शहरातील परिस्थिती
प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली.
·
हे
मानांकन ठरविण्यासाठी १ जून २०१६ ते २ जून २०१७ या काळातील विविध मापदंड तपासण्यात
आले.
·
भारताने
यंदा एकूण १० पैकी ८ निकषांवर उत्तम कामगिरी केली.
·
केंद्र
सरकारने २०१७-१८ या आर्थिक वर्षात या यादीत ९० व्या स्थानावर धडक मारण्याचे आणि
२०३० सालापर्यंत पहिल्या ३० देशांत स्थान पटकविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
·
जागतिक
बँकेकडून २००३ सालापासून दरवर्षी ही क्रमवारी जाहीर केली जाते.
भारताचा व्यवसायसुलभता दर्जा वधारण्याची करणे:-
ü दहापैकी ९ सुधारणा निकशांत टक्केवारीनुसार
सुधारणा उच्च आहे.
ü व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण करण्यास
सर्व व्यासपीठावरुण प्राधान्य देण्यात आले.
ü कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली तसेच
कर भरण्यास लागणारा वेळ कमी करण्यात आला.
ü बांधकामासाठी लागणार्या प्रक्रिया सुलभ व
वेगवान करण्यात आल्या.
ü ऊर्जा किंवा वीज मिळणे अधिक सुलभ व वेगवान
झाले असून त्याची किंमतही खाली आली.
ü विजेची किंमत दरडोई उत्पन्नाच्या १३३
टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आली.
व्यवसाय सुलभतेच्या विविध निकशांत भारत :-
निकष
|
भारताची कामगिरी
|
||
२०१८
|
२०१७
|
२०१६
|
|
व्यवसाय उभारणी
|
१५६
|
१५५
|
१५१
|
बांधकाम परवणग्या
|
१८१
|
१८५
|
१८४
|
वीज उपलब्धता
|
२९
|
२६
|
५१
|
मालमत्ता नोंदणी
|
१५४
|
१३८
|
१४०
|
पतपुरवठा उपलब्धी
|
२९
|
४४
|
४२
|
लहान गुंतवणूकदारांची सुरक्षा
|
४
|
१३
|
१०
|
कर भरणे
|
११९
|
१७२
|
१७२
|
सीमापार व्यापार
|
१४६
|
१४३
|
१४४
|
कंत्राटे राबविणे
|
१६४
|
१७२
|
१७८
|
नादारीसंबंधी प्रश्न मिटविणे
|
१०३
|
१३६
|
१३५
|
व्यवसाय सुलभ
निर्देशांक
|
१००
|
१३०
|
१३१
|
दरडोई
जीडीपीमध्ये भारत १२६ व्या स्थानावर
आंतरराष्ट्रीय
नाणेनिधीच्या ‘वर्ल्ड इकनॉमिक आऊटलुक’ अहवालामध्ये दरडोई जीडीपी यादीचे निकष
मांडण्यात आले असून यामध्ये भारत १२६ व्या स्थानावर आहे.
महत्त्वपूर्ण मुद्दे :-
-
भारताचा
दरडोई जीडीपी :- ७,१७० डॉलर्स (२०१७)
-
मागील
वर्षी भारताचा दरडोई जीडीपी :- ६,६९० डॉलर्स
-
मागील
वर्षी भारताचा क्रमांक :- १२७
-
ब्रिक्स
देश क्रमाने:- रशिया, चीन, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि भारत
-
पहिले
दहा देश क्रमाने :- कतार, मकाऊ, लक्झमबर्ग, सिंगापूर, ब्रूनेइ, आयर्लंड, नॉर्वे, कुवेत, यूएई, स्वित्झर्लंड
-
सर्वाधिक
दरडोई जीडीपी :-
क्रमांक
|
देश
|
दरडोई जीडीपी (डॉलर्स)
|
१
|
कतार
|
१,२४,९३०
|
२
|
मकाऊ
|
१,१४,४३०
|
३
|
लक्झमबर्ग
|
१,०९,१९०
|
१२६
|
भारत
|
७,१७०
|
१३
|
अमेरिका
|
५९,५००
|
सर्वाधिक विद्युत वाहनांच्या
वापरात गुजरात अव्वल
-
‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ
इलेक्ट्रिक वेहिकल्स’ या विद्युत वाहन उत्पादकांच्या
संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीत सर्वाधिक विद्युत वाहनांच्या वापरात गुजरात
अव्वल स्थानी आहे.
-
विक्री झालेल्या ई-वाहनात
९२% दुचाकी तर ८% चारचाकीवाहनाचा समावेश आहे.
-
यादीतील पहिले पाच राज्य :-
क्रमांक
|
राज्य
|
ई-वाहनांची विक्री
|
१.
|
गुजरात
|
४३३०
|
२.
|
पश्चिम बंगाल
|
२८४६
|
३.
|
उत्तर प्रदेश
|
२४६७
|
४.
|
राजस्थान
|
२३८८
|
५.
|
महाराष्ट्र
|
१९२६
|
जागतिक
लैंगिक अंतर निर्देशांक २०१७ (Global
Gender Gap Index)
-
१४४
देशांच्या यादीत भारत १०८ व्या स्थानी
-
‘वर्ल्ड इकनॉमिक फोरम’ने
हा निर्देशांक जाहीर केला.
-
मागील
वर्षी भारत ८७ व्या स्थानी होता.
-
भारताची
२१ स्थानांनी घसरण झाली.
-
सर्वांत
कमी लैंगिक अंतर असलेले पहिले पाच देश :-
१) आइसलँड
२) नॉर्वे
३) फीनलँड
४) रवांडा
५) स्वीडन
-
जागतिक
स्तरावर ६८% लैंगिक अंतरामध्ये घसरण झाली.
-
या
आधारावर जागतिक पातळीवर जेंडर गॅप भरून निघण्यास १०० वर्षे लागतील
-
यंदा
प्रथमच जगभरामध्ये जेंडर गॅपमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
-
भारताला
मिळालेले गुण :- ०.६६९
-
भारताने
६७% लैंगिक अंतर बंद केले.
-
पुढील
चार निर्देशकाच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो:-
१) शैक्षणिक प्राप्ती
२) आरोग्य आणि राहणीमान
३) आर्थिक संधी
४) राजकीय सशक्तीकरण
-
०
ते १ दरम्यान गुण दिले जातात. (० म्हणजे सर्वांत कमी,
१ म्हणजे सर्वाधिक)
-
२००६
पासून दरवर्षी हा अहवाल जाहीर केला जातो.
राज्यांनुसार
इज ऑफ डूइंग बिझनेस क्रमवारी २०१७
-
तेलंगणा
यादीत पहिल्या क्रमांकावर
-
मागील
वर्षी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर होते.
-
‘बिझिनेस रिफॉर्म्स अॅक्शन प्लॅन २०१७’ च्या
अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्यासाठी ही राज्यवार वार्षिक रॅकिंग आहे.
-
पहिले
पाच राज्ये :-
१)
तेलंगणा
(६१.८३% गुण)
२)
हरयाणा
(५४.०३%)
३)
ओडिशा
(४५.७०%)
४)
छतीसगड
(४५.४३%)
५)
पश्चिम
बंगाल (४४.३५%)
जागतिक भूक निर्देशांक 2017
@ भारताचा क्रमांक: 119 देशांमध्ये 100 वा
@ 2016 मध्ये क्रमांक: 97 वा
@ भारताला मिळालेले गुण: 31.4
@ भारताचा ‘गंभीर उपासमार’ मध्ये समावेश.
@ भारतात उत्तर कोरिया (९३) आणि इराक (७८)
पेक्षाही जास्त उपासमार आहे.
@ भारत कुपोषित लोकसंख्येत जगात दुसर्या
क्रमांकावर आहे.
भारताचे शेजारील देश:
देश
|
क्रमांक
|
गुण
|
चीन
|
29
|
7.5
|
नेपाळ
|
72
|
22.0
|
म्यानमार
|
77
|
22.6
|
श्रीलंका
|
84
|
25.5
|
बांग्लादेश
|
88
|
26.5
|
भारत
|
100
|
31.4
|
पाकिस्तान
|
106
|
32.6
|
अफगाणिस्तान
|
107
|
33.3
|
ब्रिक्स देश
देश
|
क्रमांक
|
गुण
|
ब्राझिल
|
18
|
5.4
|
चीन
|
29
|
7.5
|
द. आफ्रिका
|
55
|
13.2
|
भारत
|
100
|
31.4
|
भारताचे निर्देशक:
लोकसंख्येतील
कुपोषणाचे प्रमाण
|
|
1991-93
|
62%
|
1998-02
|
54%
|
2002-06
|
48%
|
2012-16
|
38%
|
बालकांमधील
कुपोषणाचे प्रमाण (शुष्काता आधारित)
|
|
1990-94
|
20%
|
1998-02
|
17%
|
2002-06
|
20%
|
2012-16
|
21%
|
बालकांमधील
कुपोषणाचे प्रमाण (खुरटी आधारित)
|
|
1990-94
|
65%
|
1998-02
|
54%
|
2002-06
|
48%
|
2012-16
|
38%
|
बालमृत्यू दर
|
|
1992
|
11.9%
|
2000
|
9.1%
|
2008
|
6.6%
|
2015
|
4.8%
|
जागतिक भूक निर्देशांक
-
वाशिंग्टनस्थित
इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट ही संस्था जागतिक भूक निर्देशांक काढत
असते.
-
यामध्ये
चार घटकांचा विचार केला जातो:
1)
लोकसंख्येतील
कुपोषणाचे प्रमाण
2)
बालमृत्यू
दर (5 वर्षांखालील)
3)
बालकांमधील
कुपोषणाचे प्रमाण (शुष्काता -Wasted) (ऊंची-वजन आधारित)
4)
बालकांमधील
कुपोषणाचे प्रमाण (खुरटी -Stunted) (ऊंची-वय आधारित)
-
गुण:
0 ते 100 (0 = चांगला निर्देशांक, 100 = वाईट निर्देशांक)
-
गुणांचे
वर्गीकरण:
1)
0
ते 9.9 – कमी उपासमार
2)
10
ते 19.9 – मध्यम उपासमार
3)
20
ते 34.9 – गंभीर उपासमार
4)
35
ते 49.9 – धोक्याची घंटा
5)
50
ते पुढे – अत्यंत भयावह स्थिती.
जागतिक
व्यवसाय आशावाद क्रमवारी २०१७ (Global
Business Optimism Ranking)
-
भारत
जागतिक व्यवसाय आशावाद क्रमवारीत सप्टेंबर-नोव्हेंबर या तिमाहीत ७ व्या स्थानी
आहे.
-
पहिले
पाच देश :- इंडोनेशिया, फीनलँड, नेदरलँड, फिलिपाईन्स, ऑस्ट्रिया
किंमती
राष्ट्र ब्रँड यादीत भारत ८ वा (Valuable
Nation Brand)
-
ब्रँड
फायनान्सने जाहीर केलेल्या किंमती राष्ट्र ब्रँड २०१७ अहवालात भारत १०० देशांच्या
यादीत ८ व्या स्थानावर आहे.
-
मागील
वर्षी (२०१६) भारत ७ व्या क्रमांकावर होता.
-
पहिले
दहा किंमती ब्रँड :- १) अमेरिका, २) चीन, ३) जर्मनी, ४) जपान, ५) ब्रिटन, ६) फ्रान्स, ७) कॅनडा, ८) भारत, ९) इटली, १०) दक्षिण कोरिया.
-
भारताच्या
राष्ट्रीय ब्रँडची किंमत :- २.०४ ट्रिलियन डॉलर्स (२०१६ पेक्षा १% नी घट)
-
भारताच्या
ब्रँडचे रेटिंग :- एए (मागील वर्षी :- एए -)
-
सर्वोत्कृष्ट
कामगिरी राष्ट्रीय ब्रँड :- आइसलँड
जागतिक विकास अहवाल 2018
-
जागतिक बँकेने
नुकताच 2018 चा जागतिक विकास अहवाल (World Development
Report) जाहीर केला आहे.
-
1978 पासून हा
अहवाल जागतिक बँकेतर्फे जाहीर केला जातो.
-
‘लर्निग टू रियलाइज एज्युकेशन्स प्रॉमिस’ ही या अहवालाची संकल्पना होती.
अहवालातील
महत्त्वाची मुद्दे:
F भारत अशा 12 देशांच्या यादीत दुसर्या स्थानावर आहे, जेथे दुसरी
इयत्तेच्या विद्यार्थ्याला एक शब्द देखील वाचता येत नाही. यादीत मलावी पहिल्या
स्थानावर आहे.
F भारतासह अल्प आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या
निष्कर्षांचा हवाला देत जागतिक बँकेने ज्ञानरहित शिक्षण देणे विकासाची संधी वाया
घालविण्यासह जगभरात मुले आणि तरुणाईसोबत मोठा अन्याय असल्याचे म्हटले.
F जागतिक बँकेने आपल्या अहवालात जागतिक शिक्षणात ज्ञानाच्या संकटाचा इशारा
दिला. अशा देशांमध्ये लाखोंच्या संख्येतील तरुण-तरुणी पुढील आयुष्यरात कमी संधी
आणि अल्प वेतनाच्या समस्येला तोंड देतात.
F प्राथमिक आणि माध्यमिक शाळा त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठीचे शिक्षण
देण्यास अपयशी ठरत असल्याने असे होत असल्याचे अहवालात नमूद आहे.
F ग्रामीण भारतात तिसरी इयत्तेचे 3 चतुर्थांश विद्यार्थी 2 अंकी गणित सोडवू
शकत नाही आणि पाचवी इयत्तेचे निम्मे विद्यार्थी देखील यात अपयशी ठरत असल्याचे
म्हटले गेले.
F ज्ञानरहित शिक्षणामुळे गरीबी हटविणे आणि सर्वांसाठी संधी निर्माण करणे तसेच
समृद्धी आणण्याच्या मोहिमेला पूर्ण करण्यास अपयश येईल. शाळेत अनेक वर्षांनंतर
देखील लाखो मुले वाचू-लिहू शकत नाही किंवा गणिताचा सोपा प्रश्न सोडवू शकत नाहीत.
F 2016 मध्ये ग्रामीण भारतात पाचवी इयत्तेचे केवळ निम्मे विद्यार्थीच दुसरी
इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक सहजपणे वाचू शकले. ज्ञानाचे हे गंभीर संकट दूर
करण्यासाठी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी ठोस धोरणात्मक पावले उचलण्याची शिफारस
अहवालात करण्यात आली.
जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2017
(Global Competitiveness Index)
-
137 देशांमध्ये
भारताचा 40 वा क्रमांक.
-
2016 मध्ये भारत 39
व्या क्रमांकावर होता. एका स्थानाने घसरण.
-
जागतिक आर्थिक
मंचाने (WEF) सदर निर्देशांक जाहीर केला.
-
पहिले पाच
देश: स्वित्झर्लंड, अमेरिका, सिंगपोर, नेदर्लंड, जर्मनी
-
ब्रिक्स देश:
चीन (27), रशिया (38), भारत (40), दक्षिण आफ्रिका (61), ब्राझिल (80)
-
भारत दक्षिण
आशियातील सर्वाधिक स्पर्धात्मक देश.
-
भारताचे विविध निर्देशांकातील
स्थान:
निर्देशांक
|
क्रमांक/137
(2017-18)
|
गुण (1-7)
|
जागतिक
स्पर्धात्मकता निर्देशांक
|
40
|
4.6
|
संस्था
|
39
|
4.4
|
पायाभूत सुविधा
|
66
|
4.2
|
सूक्ष्मअर्थशास्त्रीय
वातावरण
|
80
|
4.5
|
आरोग्य आणि
प्राथमिक शिक्षण
|
91
|
5.5
|
उच्च शिक्षण आणि
प्रशिक्षण
|
75
|
4.3
|
वस्तु बाजार
क्षमता
|
56
|
4.5
|
वित्तीय बाजार
विकास
|
42
|
4.4
|
तांत्रिक तयारी
|
107
|
3.1
|
बाजार आकारमान
|
3
|
6.4
|
व्यवसाय
सुसंस्कृतपाणा
|
39
|
4.5
|
नाविन्यता
|
29
|
4.1
|
-
मागील काही
वर्षातील भारताचे स्थान:
2016-17
|
2015-16
|
2014-15
|
2013-14
|
2012-13
|
39/138
|
55/140
|
71/144
|
60/148
|
59/144
|
ग्लोबल ह्यूमन कॅपिटल इंडेक्स 2017
-
ग्लोबल ह्युमन
कॅपिटल इंडेक्स 2017 मध्ये भारताला 130 देशांच्या यादीत 103 वे स्थान प्राप्त झाले
आहे.
-
मागील वर्षीच्या
निर्देशांकमध्ये भारताचा 105 वा क्रमांक होता.
-
हा निर्देशांक
जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केल आहे.
-
यादीतील पहिले पाच
देश:
1) नॉर्वे
2) फिनलंड
3) स्वित्झर्लंड
4) अमेरिका
5) डेन्मार्क
-
ब्रिक्स देश –
रशिया (16), चीन (34), ब्राझिल (77) दक्षिण आफ्रिका (87), भारत (103)
जागतिक आणू उद्योग स्थिती अहवाल 2017
-
भारतचा सहा स्थापित
आणू रिएक्टरसह या अहवालात जगात तिसरा क्रमांक.
-
चीन 20 स्थापित
रिएक्टरसह जगात पहिल्या क्रमांकावर.
-
2016 मध्ये आणू
ऊर्जा निर्मितीत जगभरात 1.4% वाढ.
-
जगात पवन ऊर्जा
उत्पादनात 16% वाढ
-
सौर ऊर्जा
उत्पादनात 30% वाढ
-
आणू ऊर्जेपेक्षा
3.8 पट पवन ऊर्जेत वाढ
-
आणू ऊर्जेपेक्षा
2.2 पट सौर ऊर्जेत वाढ
शहरी विकास मंत्रालयाकडून ‘शहर जीवनमान निर्देशांक’ प्रसिद्ध
शहरी विकास
मंत्रालयाने स्मार्ट शहरे, राजधानी आणि 10 लाखाहून अधिक
लोकसंख्या असलेल्या शहरांमधील राहणीमान दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी अभ्यास पूर्ण
केला आहे. त्यासंदर्भात मंत्रालयाकडून देशातील 116 मुख्य शहरांचा ‘शहर जीवनमान निर्देशांक’ प्रसिद्ध करण्यात आला.
निर्देशांकमधील ठळक बाबी:
-
शहर सुधारणांमध्ये आंध्रप्रदेश
हे सर्वाधिक गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे.
-
पहिले दहा राज्ये:
आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड,
छत्तीसगढ, मध्यप्रदेश, तेलंगाना,
राजस्थान, पंजाब, केरळ,
गोवा ही राज्ये आहेत.
-
हा निर्देशांक शहरांच्या
पायाभूत सुविधांना 79 व्यापक मानदंडावर मूल्यांकित केले गेले आहे.
-
या मानदंडांमध्ये रस्त्यांची
उपलब्धता,
शिक्षण व आरोग्य देखरेख, गतिशीलता, रोजगाराच्या संधी, आपातकालीन प्रतिसाद, तक्रारीचे निवारण, प्रदूषण, खुल्या
व हिरवेगार वातावरणाची उपलब्धता, सांस्कृतिक आणि मनोरंजन
क्षेत्रात संधी यांचा समावेश आहे.
जागतिक आर्थिक केंद्र
निर्देशांक 2017
-
जागतिक आर्थिक केंद्र
निर्देशांकमध्ये लंडनने पहिले स्थान मिळविले आहे.
-
निर्देशांकमध्ये जगभरातील
एकूण 92 आर्थिक केंद्र दिली आहेत.
-
झेड/येन आणि चायना डेवलपमेंट इंस्टीट्यूटने हा निर्देशांक जाहीर केला.
-
भारताची आर्थिक राजधानी
मुंबईला या यादीमध्ये 60 वे स्थान मिळाले आहे.
-
मागील वर्षीच्या तुलनेत
मुंबईने तीन स्थान पुढे आहे.
-
पुढील पाच निर्देशकाच्या
आधारे ही यादी बनविण्यात आली आहे: व्यवसाय वातावरण,
आर्थिक क्षेत्र विकास, पायाभूत सुविधा घटक, मानवी भांडवल, प्रतिष्ठा आणि सामान्य घटक
-
पहिले पाच आर्थिक केंद्र:
1)
लंडन
2)
न्यूयोर्क
3)
सिंगापुर
4)
हाँग काँग
5)
टोकियो
महाराष्ट्राचा वीजनिर्मितीत
देशात सहावा क्रमांक
-
राज्यात दिवसेंदिवस
वीजनिर्मितीत वाढ होत असून 2014-15 मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती
झाली;
परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे.
-
पहिले पाच राज्य:
1) हिमाचल
प्रदेश
2) गुजरात
3) छत्तीसगड
4) पंजाब
5) हरियाणा
-
महाराष्ट्रात 2015-16 मध्ये
एकूण वीजनिर्मितीत पूर्वीच्या वर्षापेक्षा 9.6 टक्के इतकी वाढ झाली असून, 1 लाख 13 हजार 787 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.
-
2016-17 मध्ये डिसेंबरपर्यंत
राज्यात 82 हजार 441 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.
-
राज्यातील एकूण वीज निर्मितीत
विविध कंपन्यांचा वाटा:
क्रमांक
|
कंपनी
|
टक्केवारी
|
1
|
महानिर्मिती
|
41.9 टक्के
|
2
|
अदानी पॉवर कंपनी
|
17.6 टक्के
|
3
|
नवीकरणीय ऊर्जा
|
7.6 टक्के
|
4
|
जेएसडब्ल्यू एनर्जी
|
7.4 टक्के
|
5
|
टाटा पॉवर
|
7.1 टक्के
|
6
|
रतन इंडिया पॉवर
|
5.4 टक्के
|
7
|
व्हीआयपी बुटीबोरी
|
3.5 टक्के
|
8
|
एम्को पॉवर
|
3.5 टक्के
|
9
|
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर
|
3.1 टक्के
|
10
|
इतर
|
2.9 टक्के
|
डिजिटल इव्होल्यूशन इंडेक्स,२०१७
-
भारत ६० देशांच्या यादीत ५३
व्या स्थानी
-
पहिले पाच देश : नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड,
डेन्मार्क, फिनलंड
-
टफट्स विद्यापीठातील फ्लेचर
स्कूलने मास्टरकार्डच्या भागीदारीत हा निर्देशांक जाहीर केला.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण
2017
-
केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता
मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2017 ची आकडेवारी जाहीर केली आहे.
-
हे सर्वेक्षण क्वालिटी
कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे मे-जून 2017 दरम्यान करण्यात आले होते.
-
यामध्ये 4626 गावांचे
सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणातील महत्त्वाची मुद्दे:
-
62.45% कुटुंबियांकडे
स्वच्छतागृह आहे.
-
स्वच्छता गृह असलेल्यापैकी
91.29% त्याचा वापर करतात.
-
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण
सुरू केल्यापासुन 4.54 कोटी पेक्षा जास्त स्वच्छतागृह बांधले गेले.
-
160 जिल्हे, 2,20,104 गावे आणि 4 राज्ये उघड्यावरील सौचमुक्त
म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
-
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे
राज्ये: सिक्किम, नागालँड, मणीपुरमध्ये 95% ग्रामीण कुटुंब स्वच्छता गृह वापरतात. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये 90% ग्रामीण कुटुंब स्वच्छताग्रह वापरतात.
-
मोठ्या राज्यांची कामगिरी:
केरळ आणि हरियाणा मधील जवळपास सर्व ग्रामीण कुटुंब स्वच्छतागृह वापरतात. हेच
प्रमाण गुजरातमध्ये 85% तर तामिळनाडूत 79% आहे.
-
सर्वांत खराब कामगिरी: बिहार
(30%), उत्तर प्रदेश (37%), झारखंड (37%)
जागतिक सेवानिवृत्ती
निर्देशांक 2017
-
जागतिक सेवानिवृत्ती
निर्देशांकमध्ये भारताला 43 वे स्थान प्राप्त झाले आहे.
-
सदर निर्देशांक मालमत्ता
व्यवस्थापन कंपनी ‘Natixis Global’ ने तयार केला
आहे.
-
पहिले पाच देश: नॉर्वे, स्वित्झर्लंड, आइसलॅंड,
स्वीडन, न्यूझीलंड
-
भारताचा उपनिर्देशांकामधील
क्रमांक:
निर्देशांक
|
क्रमांक
|
निवृत्तींनंतरचे आरामदायी आयुष्य
|
41 वा क्रमांक
|
आरोग्य
|
43 वा क्रमांक
|
फिटनेस
|
39 वा क्रमांक
|
जीवनमानाचा दर्जा
|
43 वा क्रमांक
|
‘स्वीस’ बँकांच्या यादीत भारत 88व्या स्थानावर
काळा पैसाविरोधातील
देशव्यापी आंदोलनानंतर केंद्र सरकारने उचलेल्या पावलांमुळे स्वीस बँकेतील
भारताच्या खातेधारकांची संख्या कमी झाली आहे. 2014 मध्ये 61 व्या स्थानावर असणारा
भारत 88 व्या स्थानावर आला आहे. 0.04 टक्के (4,500 करोड रुपये) भारतीयांच्या
नावावर जमा आहे.
महत्त्वाची मुद्दे:-
-
ब्रिटन पहिल्या क्रमांकावर
असून अमेरिका दुसर्या क्रमांकावर आहे.
-
2004 मध्ये स्वीस बँकांमध्ये
ठेवीदारांच्या यादीत भारत 37 व्या स्थानवर होता. 2014 मध्ये 61 व्या स्थानी तर
2017 मध्ये 88 व्या स्थानावर आला आहे.
-
सुमारे 4,500 कोटी रुपयांच्या भारतीयांच्या ठेवी आहेत.
वर्ल्ड इकनॉमिक आऊटलुक जुलै
२०१७
-
आंतरराष्ट्रीय नाणे
निधीद्वारा हा अहवाल जाहीर केला जातो
-
हा अहवाल वर्षातून दोनदा
प्रकाशित केला जातो तर दोन वेळा अद्ययावत केला जातो.
-
यामध्ये २०१७-१८ साठी
भारताचा जीडीपी वृद्धीदर ७.२% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
-
जागतिक आर्थिक वृद्धीदर २०१७
मध्ये ३.५% तर २०१८ मध्ये ३.६% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
-
भारताची अर्थव्यवस्था ही
जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
भारतीय बहिष्करण अहवाल 2016
जाहीर
·
भारताच्या सेंटर फॉर इक्विटी
स्टडीजने भारतीय बहिष्करण अहवाल 2016 (Indian Exclusion Report
-IXR) नुकताच जाहीर केला असुन हा अहवाल दलित, आदिवासी
आणि मुस्लिम यांची सार्वजनिक सुविधांपासून वंचितता दर्शवतो.
·
सदर अहवाल पुढील चार
सार्वजनिक सुविधा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे: वृद्धांसाठी निवृत्तीवेतन, डिजिटलबाबींना वापर, शेतजमीन आणि विचाराधीन कैदीसाठी
कायदेशीर न्याय.
अहवालातील
महत्त्वाची मुद्दे
@ दलित
आणि आदिवासी मुख्यत्वे कृषी कामगार म्हणून राहतात.
@ दलितांमध्ये
भूमीहीनता सर्वाधिक म्हणजेच 57.3% आहे. तसेच, 52.6%
मुस्लीम आणि 56.8% स्त्रि प्रमुख असलेली कुटुंबे भूमीहीन आहेत.
@ विकासात्मक
उपक्रमांमुळे विस्थापित झालेल्यांमध्ये सुमारे 40% आदिवासी आहेत.
@ जमिनीबाबत
सुधारणेच्या प्रयत्नांचा दलितांना, स्त्रियांना
किंवा मुसलमानांना गरज असलेल्या प्रमाणात लाभ दिला जात नाही.
@ दलित
मुस्लिम आणि स्त्रियांकडे असलेला जमिनीचा पट्टा आकाराने फारच कमी आहे. फक्त 2.08%
दलित कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे.
सार्वजनिक व्यवहार
निर्देशांक
2017 साठीचा सार्वजनिक
व्यवहार निर्देशांक (Public affairs index (PAI)) नुकताच जाहीर करण्यात आला. हा अहवाल बंगळुरु येथील सार्वजनिक व्यवहार
केंद्राने जाहीर केला.
निर्देशांकतील
महत्त्वाची मुद्दे :-
@ 10
संकल्पना, 26 फोकस विषय आणि 82 निर्देशकाच्या आधारे हा निर्देशांक बनविण्यात आला.
@ पहिले
पाच राज्य : केरळ, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र
@ मोठ्या
राज्यांमध्ये शेवटचे चार राज्य : बिहार (18), झारखंड (17), ओडिशा (16) आणि आसाम (15)
@ 12
लहान राज्यांमध्ये (2 कोटी पेक्षा कमी लोकसंख्या) हिमाचल प्रदेश पहिल्या
क्रमांकावर असून त्यानंतर गोवा आणि मिझोरामचा क्रमांक लागतो.
@ लहान
राज्यांमध्ये शेवटी मेघालय (12), अरुणाचल प्रदेश आणि
जम्मू अनिकाश्मीर यांचा क्रमांक लागतो
@ आवश्यक
पायाभूत सुविधामध्ये चांगली कामगिरी करणारे पहिले पाच राज्य : पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात
@ मानवी
विकासामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि पंजाब पहिले
तीन राज्य असून उत्तर प्रदेश मध्यप्रदेश आणि आसामची कामगिरी अत्यंत खराब आहे.
@ सामाजिक
सुरक्षा धोरण अमलबजावणीमध्ये केरळ, आसाम आणि
मध्य प्रदेश पहिल्या तीन क्रमांकावर असून तेलंगणा, हरियाणा
आणि पंजाब विविध राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना लागू करण्यास मागे पडले आहेत
@ महिला
आणि बालक गटामध्ये केरळ, ओडिशा आणि कर्नाटक पहिल्या
तीन स्थानी असून झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रची यामध्ये
खराब कामगिरी आहे.
@ कायदा
आणि सुव्यवस्था राखन्यामध्ये तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे.
@ वित्तीय
व्यवस्थापणामध्ये तेलंगणाने चांगली कामगिरी केली आहे.
@ आर्थिक
स्वातंत्र्यामध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर असून बिहार सर्वांत शेवटी आहे.
संदर्भ : The
Hindu
वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अँड
प्रोस्पेक्ट
·
संयुक्त राष्ट्राने ‘वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अँड प्रोस्पेक्ट’ या
नावाने जाहीर अहवालात भारताचा 2017 मध्ये वृद्धी दर 7.3% असेल असा अंदाज
वर्तविण्यात आला आहे.
·
यापूर्वी जानेवारी 2017
मध्ये जाहीर केलेल्या अहवालात भारताचा वृद्धी दर 7.7% असेल असे भाकीत केले
होते.
·
या सुधारित अहवालामध्ये 2018
मध्ये भारताचा वृद्धीदर 7.9% असेल असाही
अंदाज व्यक्त करण्यात ल ए. जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या अहवालात 7.6% असा अंदाज
व्यक्त करण्यात आला होता.
·
भारत हा सर्वात जलद गतीने
वाढणारी विकसनशील अर्थव्यवस्था असून चीनच्याही पुढे आहे.
·
चीनचा विकास दर 2017 आणि
2018 मध्ये 6.5% असेल.
·
जागतिक स्थूल उत्पाद : 2017
मध्ये 2.7% तर 2018 मध्ये 2.9%.
जागतिक शांतता निर्देशांक
2017
·
अमेरिकेमधील इंस्टीट्यूट फॉर
इकनॉमिक्स अँड पीस (IEP) संस्थेने अकरावा ‘जागतिक शांतता
निर्देशांक-2017’ (Global Peace Index -GPI) प्रसिद्ध केला
आहे. हा अहवाल जागतिक शांततेविषयी जागतिक स्थिती दर्शवतो.
·
जागतिक शांतता निर्देशांकामध्ये
भारताचा 137 वा क्रमांक आहे. मागील वर्षी भारत 141 व्या स्थानी होता.
·
23 विविध गुणात्मक आणि
संख्यात्मक निर्देशांकच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो.
अहवालातील
महत्त्वाची मुद्दे:-
-
पहिले पाच देश
: आइसलँड (1), न्यूझीलंड (2), पोर्तुगाल
(3), ऑस्ट्रिया (4), डेन्मार्क (5)
-
आइसलँड हे जगातील सर्वात
शांत देश ठरले आहे. ही स्थिती या देशाने 2008 सालापासून राखून ठेवली आहे.
-
सर्वांत शेवटचे पाच देश
: सीरिया (163), अफगाणिस्तान (162), इराक
(161), दक्षिण सुदान (160), येमेन
(159)
-
सर्वाधिक प्रादेशिक
अशांततापूर्ण वातावरण उत्तर अमेरिकामध्ये आहे, तर त्यानंतर
याच बाबतीत उप-सहारा आफ्रिका आणि मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्राचा समावेश
आहे.
-
युरोप हा जगातील सर्वाधिक
शांत प्रदेश म्हणून कायम आहे. निर्देशांकमधील दहा सर्वाधिक शांत देशांमध्ये यातील
आठ देशांचा समावेश आहे.
-
अहवालामध्ये जगातील 99.7%
लोकसंख्येचा समावेश
-
गेल्या वर्षात अधिक
शांततापूर्ण वातावरण होते. मात्र, गेल्या दशकात जगात
शांतता लक्षणीयरित्या कमी आहे. गेल्या तीन दशकांत लष्करी शासनामध्ये घट झाली आहे.
-
सरासरीने दहा किमान
शांततापूर्ण देशांमध्ये हिंसाचारच्या घटना 37% आहेत तर दहा सर्वाधिक शांत
देशांमध्ये हा आकडा केवळ 3% आहे.
-
93 देशांमध्ये शांततेत वाढ
झाली आहे तर 68 देशांमध्ये याची स्थिती खालावली.
-
2008 सालापासून 2.14% ने
जागतिक शांततेत कमतरता आली आहे, तर 52% GPI देशांमध्ये अशांतता दिसून आली आहे.
जागतिक
शांतता निर्देशांक :-
@ अमेरिकेमधील
इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस (IEP) संस्थेकडून
जाहीर केला जातो.
@ हा
अहवाल शांतता संस्थांमधील शांतता तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या सल्लामसलताने
विकसित केला जातो.
@ यासाठी
लागणारी माहिती इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटकडून गोळा केली जाते.
@ पहिली
यादी मे 2007 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली.
जागतिक रिटेल क्षेत्र विकास
निर्देशांकात भारत पहिला
·
‘द एज ऑफ फोकस’ या शीर्षकाखाली जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या 30 विकसनशील देशांच्या
रेटेल क्षेत्रातील व्यवसाय सुलभतावर आधारित जागतिक रिटेल क्षेत्र विकास
निर्देशांकात भारताला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. हा 16 वा निर्देशांक आहे.
·
यादीत भारताने चीनला मागे
टाकले आहे. चीन दुसर्या स्थानी आहे.
ग्लोबल
रिटेल डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल:-
लंडनस्थित ए. टी.
कियर्नी या व्यवसाय व्यवस्थापन सल्लागार कंपनीकडून GRDI दरवर्षी
प्रकाशित केला जातो. हा अहवाल वर्तमानात सर्वाधिक आकर्षक बाजारपेठ कोणती आहे
त्याबद्दल चित्र स्पष्ट करते आणि यामुळे भविष्यातील संभाव्य परिस्थिती
गुंतवणूकदारांना ओळखण्यास मदत होते.
जागतिक विद्यापीठ क्रमवारी
·
‘क्यूएस’
(Quacquarelli Symonds) या ब्रिटिश संस्थेकडून दरवर्षी
विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली जाते त्यामध्ये यंदाही भारतीय विद्यापीठांना
पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळाले नाही.
·
आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई आणि आयआयएस बंगळूर या संस्थांनी
दोनशेमध्ये स्थान मिळविले आहे.
·
ब्रिक्स देशांचा विचार
केल्यास भारताच्या भारतीय विज्ञान संस्थेने (आयआयएस) सहावे स्थान प्राप्त केले
आहे.
·
क्यूएसने 2018 साठीची
सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली असून देशातील पहिल्या सर्वोत्तम दहा
विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे. (8 वे स्थान)
·
सवित्रिबाई फुले विद्यापीठ, पुणे आणि मुंबई विद्यापीठाला या क्रमवारीत 800 पेक्षाही खालचे स्थान
मिळाले आहे.
·
पहिल्या पाचशे मधील भारतीय
संस्था
संस्थेचे नाव
|
यंदाची क्रमवारी
|
गेल्या वर्षीची क्रमवारी
|
आयआयएस बंगळूर
|
190
|
152
|
आयआयटी दिल्ली
|
172
|
185
|
आयआयटी मुंबई
|
179
|
219
|
आयआयटी मद्रास
|
264
|
249
|
आयआयटी कानपूर
|
393
|
|
आयआयटी खरगपुर
|
308
|
|
आयआयटी रूरकी
|
||
दिल्ली विद्यापीठ
|
·
जगातील पहिल्या पाच संस्था
संस्था
|
यंदाचा क्रमांक
|
मागील वर्षीचा क्रमांक
|
मॅसॅच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी (एमआयटी),
अमेरिका
|
पहिला
|
पहिला
|
स्टानफोर्ड विद्यापीठ, अमेरिका
|
दूसरा
|
तिसरा
|
हॉवर्ड विद्यापीठ, अमेरिका
|
तिसरा
|
दूसरा
|
केंब्रिज विद्यापीठ, यूके
|
चौथा
|
चौथा
|
कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी,
अमेरिका
|
पाचवा
|
पाचवा
|
पहिल्या पंचविस
विद्यापीठामध्ये अमेरिकेचे सर्वाधिक विद्यापीठे आहेत. (13 विद्यापीठे)
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक
बाल कामगार
·
नुकत्याच प्रकाशित करण्यात
आलेल्या क्राय (CRY) अहवालामध्ये उत्तर प्रदेश
मध्ये सर्वाधिक बालकामगार असल्याचे आढळून आले आहे.
·
अहवालनुसार 5 ते 6 वयोगटातील भारतातील 8 लाख बालके बालकामगर आहेत.
·
चाइल्ड राईट्स अँड यू
(सीआरवाय) ही एक एनजीओ असून वंचित मुलांचे उत्थान करण्यासाठी काम करते. रिप्पन
कपूर यांनी 1979 मध्ये या संस्थेची स्थापना केली.
अहवालातील
प्रमुख मुद्दे :-
-
भारतातील 5 लाख बालके शाळेत
जात नाहीत. त्यापैकी बहुतेक बालके घरगुती कामात व्यस्त.
-
सर्वाधिक बालकामगार:
1)
उत्तर प्रदेश
– 2,50,672
2)
बिहार
– 1,28,087
3)
महाराष्ट्र
– 82,847
-
बालकामगारस करणीभूत
महत्त्वाचे घटक : गरीबीचे उच्च प्रमाण, बेरोजगारी, सामाजिक सुरक्षेची कमतरता.
-
बाल विकास कार्यक्रमात
(आयसीडीएस) फक्त 50% बालकामगारांचा समावेश.
-
2001-11 या दशकात 10-14
वयोगटातील बालकामगारात 30% येवधी घट झाली
-
मात्र याच दशकात 5-9 वयोगटातील बालकामगारात 37%
येवधी वाढ झाली.
ICDS : एकात्मिक
बाल विकास योजना:-
-
केंद्र पुरस्कृत योजना
-
अमलबजावणी : राज्ये आणि
केंद्रशासित प्रदेश
-
सुरुवात : 2 ऑक्टोबर 1975
-
उद्देश :
1)
0-6 वयोगटातील बालकांची पौष्टिक
आणि आरोग्य स्थिती सुधारणे.
2)
मृत्युदर, विकृती, कुपोषण आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
3)
बालकांच्या विकासास
प्रोत्साहन देण्यासाठी धोरण समन्वय आणि अंमलबजावणीस प्रोत्साहन
4)
मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक कल्याणासाठी योग्य पाया तयार करणे
भारत सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश
·
संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीने (आयएफएडी) केलेल्या ‘वन फॅमिली अॅट ए टाइम’ या अभ्यासात जगभरात काम करणार्या भारतीय व्यक्तींनी 2016 मध्ये 62.7
दशलक्ष अमेरिकन डॉलर्स भारतात पाठविले.
·
यासह भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक रेमिटन्स (परदेशातून प्राप्त
रक्कम) प्राप्त करणारा देश ठरला आहे.
महत्त्वाची मुद्दे :-
-
सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे देश:
1) भारत (62.7 अब्ज डॉलर)
2) चीन (61 अब्ज डॉलर)
3) फिलिपिन्स (30 अब्ज डॉलर)
4) पाकिस्तान (20 अब्ज डॉलर)
-
सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारे देश:
1) अमेरिका
2) सौदी अरेबिया
3) रशिया
-
23 देशांनी जगातील 80% रेमिटन्स प्राप्त केला आहे.
-
2007-2016 या कलावधीत भारताने चीनपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त केला आहे.
-
2007 मध्ये चीन प्रथम तर भारत दुसर्या स्थानी होता.
-
जगातील 55% रेमिटन्स एशियाने प्राप्त केला
आयएफएडी : इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रिकल्चरल
डेवलपमेंट:-
@ 1977 मध्ये संयुक्त राष्ट्राची 13 वी विशेष
संस्था म्हणून स्थापना
@ भारत संस्थापक सदस्य
@ जगभरात ग्रामीण भागातील उपासमारी आणि गरीबी कमी
करण्याचा प्रयत्न करते.
जागतिक नाविन्यता निर्देशांक 2017
·
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या जागतिक नाविन्यता निर्देशांकमध्ये (ग्लोबल
इनोव्हेशन इंडेक्स) भारताला 130 देशांच्या यादीत 60 वा क्रमांक मिळाला आहे.
·
कॉर्नेल युनिव्हर्सिटी, इनसीड आणि वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑरगनायझेशन (डब्ल्यूआयपीओ) यांनी
हा निर्देशांक तयार केला.
·
आत्तापर्यंतचा हा 10 वा नाविन्यता निर्देशांक होता. ‘इंडोव्हेशन फीडिंग द वर्ल्ड’ ही 2017 निर्देशांकाची संकल्पना आहे.
प्रमुख मुद्दे:-
-
पहिले पाच नाविन्यपूर्ण देश:
1) स्वित्झर्लंड
2) स्वीडन
3) नेदरलँड
4) अमेरिका
5) ब्रिटन
-
सलग सातव्या वर्षी स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर
-
यावर्षी निर्देशांकात भारत मागील वर्षाच्या तुलनेत सहा स्थानांनी वर चढत 60
व्या क्रमांकावर पोहचले आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत अग्रेसर आहे.
-
भारताच्या शेजारील देश - श्रीलंका (90), नेपाळ (109), पाकिस्तानला (113), बांगलादेश (114)
-
ब्रिक्स देश: ब्राझील
(69), रशिया (45), चीन (22), दक्षिण आफ्रिका (57).
पर्यावरणावर परिणाम सर्वेक्षण
·
ब्रिटनस्थित वित्तीय सेवा पुरवणारी वेबसाइट ‘मनी सुपर मार्केट’ने
तयार केलेल्या ‘पर्यावरणावर
दरडोई मानवी परिणाम’ या यादीमध्ये
भारताला 102 देशांमध्ये 75 वे स्थान प्राप्त झाले आहे.
·
यादीतील पहिले पाच देश : मोझांबिक, इथियोपिया, झांबिया, लाटविया, केनिया
·
सर्वात वाईट कामगिरी : त्रिनिदाद (Trinidad) आणि टोबॅगो (102), अमेरिका(101),
श्रीलंका (100), आयर्लंड (99), कॅनडा (98)
2024 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल :
संयुक्त राष्ट्र
संयुक्त राष्ट्राच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट्स : द रीविजन’ नुसार भारत 2024 मध्ये चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंखेचा देश
बनेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालातील प्रमुख मुद्दे :-
-
2050 पर्यन्त जगाची लोकसंख्या 9.8 अब्ज होईल
-
जगाची लोकसंख्या 2030 पर्यंत 8.6 अब्ज तर 2100 पर्यंत 11.2 अब्ज होईल.
-
सध्या जगाची लोकसंख्या 7.6 अब्ज आहे.
-
दरवर्षी जगत 82 दशलक्ष लोकांची भर पडते.
-
आफ्रिकन देशातील जनमदार 2050 पर्यंत दुप्पट होईल
-
सध्या 1.3 अब्ज असलेली भारताची लोकसंख्या 2024 पर्यन्त 1.4 अब्ज होईल.
हैदराबाद राहण्यास सर्वोत्तम
शहर
·
लागोपाठ तीन वर्षे मर्सर
क्वालिटी ऑफ लिव्हिंगद्वारा हैदराबादला राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून निवडण्यात
आल.
·
हैदराबादमधील विमानतळ
वार्षिक 5-15 दशलक्ष प्रवासी प्रवर्गातील जगातील पहिल्या क्रमांकाच विमानतळ आहे.
माइस इन एशिया करितासुधा ते सर्वोत्तम शहर आहे.
·
नॅशनल जीऑग्राफिक ट्रॅव्हलरने
मस्ट-सी डेस्टिनेशन म्हणून हैदराबादला जगातील दुसर्या क्रमांकाच स्थान दिल आहे.
जागतिक प्रतिभा
निर्देशांकामध्ये भारत 92 वा
|
2017 च्या जागतिक
प्रतिभा निर्देशांकामध्ये (Global index of talent
competitiveness) भारताला 118
देशांच्या यादीत 92 वे स्थान प्राप्त झाले आहे. जागतिक व्यवसाय शाळा INSEAD ने सिंगापूरच्या एडीको ग्रुप आणि ह्यूमन कॅपिटल लीडरशिप इन्स्टिट्यूट
(एचसीएलआय) यांच्या साहाय्याने हा निर्देशांक बनविला आहे.
अन्य
मुद्दे :-
@ पहिले
पाच देश : स्वित्झर्लंड, सिंगापूर, युनायटेड किंग्डम, अमेरिका, स्वीडन.
@ ब्रिक्स
देश : ब्रिक्स देशांत भारत सर्वांत शेवटी आहे. चीन (54 वा), रशिया (56 वा), दक्षिण आफ्रिका (67 वा) आणि ब्राझिल
(81 वा).
@ 2016
मध्ये या निर्देशांकत भारत 89 व्या क्रमांकरवर होता. आता 3 क्रमांकणी घसरण झाली
आहे.
शहरांची
क्रमवारी :-
जागतिक प्रतिभा
निर्देशांकामध्ये जागतिक शहरांचीही यादी तयार करण्यात आली असून झुरिच, हेलसिंकी, सॅन फ्रान्सिस्को, गॉथेनबर्ग,
माद्रिद ही शहरे पहिल्या पाच स्थानावर आहेत. भारतातील मुंबई हे
एकमेव शहर या यादीत आहे.
समावेशक विकास
निर्देशांकत भारत 60 वा
|
2017 च्या समावेशक
विकास निर्देशांकत 79 विकसनशील देशांच्या क्रमवारीत भारताला 60 वा क्रमांक
प्राप्त झाला आहे. जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) समावेशक वृद्धी आणि
विकास अहवालामध्ये हा निर्देशांक जाहीर केला.
महत्त्वाची
मुद्दे :-
@ पहिले
पाच विकसनशील देश : लिथुआनिया, अझरबैजान, हंगेरी, पोलंड,
रोमानिया
@ पहिल्या
पाच विकसित अर्थव्यवस्था : नॉर्वे, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड, आइसलँड आणि डेन्मार्क
@ ब्रिक
देश: रशिया (13), चीन
(30) आणि ब्राझील (30).
@ भारताचे
शेजारी: भारतातील अनेक शेजारी राष्ट्रे क्रमवारीत
पुढे आहेत. चीन (15), नेपाळ (27), बांगलादेश (36) आणि पाकिस्तान (52).
@ 1-7
गुणवारीत भारताला 3.38 गुण
असरचा अहवाल
|
शिक्षक आणि शैक्षणिक
साहित्यापेक्षा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आणि देखभालीसाठी सर्वाधिक खर्च
होत असतानाही राज्यातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे नुकत्याच असर
या संस्थेच्या अहवलातून समोर आले आहे.
अहवालातील
महत्त्वाची मुद्दे :-
@ राज्यातील
14.5% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2014 मध्ये हे प्रमाण 15.9%
होते.
@ पाण्याची
टाकी असलेल्या शाळांपैकी 18.4% शाळांमध्ये पाणी नाही.
@ राज्यातील
3.1% शाळांमध्ये स्वच्छता गृह नाही. (2014 मध्ये 2.9%)
@ 7.8%
शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाही. (2014 मध्ये 9.8%)
@ 17.7%
शाळांमध्ये वापरण्यायोगे स्वच्छता गृह नाहीत.
@ मुलींसाठी
स्वतंत्र आणि वापरण्याजोगे स्वच्छता गृह असलेल्या शाळांचे प्रमाण 62.5% आहे.
@ 67%
शाळांमध्ये पिण्याचे पाणी आहे तर 68% शाळांमध्ये वापरण्याजोगे स्वच्छता गृहे आहेत.
भ्रष्टाचार आकलन
निर्देशांकत भारत 79 वा
|
·
बर्लिनस्थित भ्रष्टाचार
वॉचडॉग ट्रास्परन्सी इंटरनॅशनल ने जाहीर केलेल्या 2016 च्या भ्रष्टाचार
आकलन निर्देशांकत (Corruption Perception Index)
176 देशांच्या यादीत भारत 79 व्या क्रमांकावर आहे.
·
जागतिक बँक आणि जागतिक
आर्थिक मंच यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही यादी बनविण्यात आली असून
प्रतेक देशाला 0 ते 100 दरम्यान गुंनांकन देण्यात आले आहे. (0 = सर्वाधिक भ्रष्ट)
·
पहिले पाच देश
: न्यूझीलंड आणि डेन्मार्क संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर (90 गुण) असून
त्यानंतर फिनालंड, स्वीडन आणि स्वित्झर्लंड यांचा क्रमांक आहे.
·
सर्वांत भ्रष्ट पाच देश
: सोमालिया सर्वांत भ्रष्ट देश ठरला असून त्यानंतर सीरिया, दक्षिण सुदान, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान,
आणि इराक यांचा क्रमांक आहे.
·
भारतासह चीन आणि ब्राझीलला
40 गुण प्राप्त झाले आहेत.
आर्थिक स्वतंत्रता
निर्देशांकात भारत 143 वा
|
अमेरिका स्थित थिंक टॅंक
‘हेरिटेज फाउंडेशन’ने जाहीर केलेल्या आर्थिक
स्वतंत्रता निर्देशांकात भारताला 143 वा क्रमांक मिळाला आहे. भारताला या
निर्देशांकात 52.6 गुण प्राप्त झाले आहेत.
महत्त्वपूर्ण
मुद्दे :-
-
पहिले पाच देश : हाँगकाँग, सिंगापूर,न्यूझीलंड,
स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया
-
2016 मध्ये भारताचा 123 वा
क्रमांक होता.
-
दक्षिण आशियाई देश: भूतान
(107),
श्रीलंका (112), नेपाळ (125), बांग्लादेश (128), पाकिस्तान (141), अफगाणिस्तान (163), मालदीव (157).
-
चीन 111 व्या तर अमेरिका 17
व्या स्थानावर
-
जागतिक सरासरी गुण 60.9 असून
23 वर्षांच्या इतिहासात ही सर्वाधिक नोंद.
-
भारताचा समावेश ‘मोस्ट्ली अनफ्री’ श्रेणीमध्ये
2050 मध्ये भारतात
सर्वाधिक मुस्लिम असणार
|
·
जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची
वेगाने वाढ होत असून, सन 2050 मध्ये भारतात
सर्वाधिक मुस्लिम असणार आहेत, असे अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च
सेंटरने अहवालात म्हटले आहे. अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने जगभरातील
लोकसंख्येवर आधारीत अहवाल तयार केला आहे.
काय
आहे अहवालात?
-
जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या
लोकसंख्येनंतर मुस्लिमांच्या लोकसंख्येचा क्रमांक आहे.
-
ख्रिश्चन लोकसंख्येच्या
तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे.
-
सन 2050 मध्ये मुस्लिमांची
संख्या सर्वाधिक असणार आहे.
-
विशेष म्हणजे जगामध्ये
सर्वाधिक मुस्लिम भारतात असणार असून, त्यांचा
वयोगट 30 असणार आहे.
-
जगातील लोकसंख्येच्या तुलनेट
मुस्लिम धर्माची लोकसंख्या 23 टक्के एवढी आहे.
-
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण व
तुर्कीमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे.
-
इंडोनेशियामध्ये सध्या
सर्वाधिक मुस्लिम नागरिकांची राहात आहेत.
आशिया पॅसिफिक
देशांमध्ये लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वल
|
·
आशिया पॅसिफिक देशांमध्ये लाच
देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे
ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनलच्या सर्व्हेमधून निष्पन्न झाले आहे. अहवालनुसार भारतातील 69
टक्के नागरिकांना कधी ना कधी लाच द्यावी लागते. त्यापाठोपाठ व्हिएतनाममध्ये लाच मागणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के आहे.
अहवालातील
अन्य मुद्दे :-
-
सार्वजनिक सेवा सुविधा धेण्यासाठी
तब्बल दोन तृतियांश भारतीयांना लाच द्यावी
लागते
-
भारतातील 69 टक्के
नागरिकांनी आपल्याला कधी ना कधी लाच द्यावी लागल्याचे सांगितले.
-
व्हिएतनाममधील 65 टक्के
लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याचे कबूल केले.
-
पाकिस्तानमध्ये लाचखोरीचे
प्रमाण भारतापेक्षा कमी आहे.
पाकिस्तानमधील 40 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याची माहिती
दिली.
-
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये
लाचखोरीचे प्रमाण सर्वात कमी आहे.
-
या सर्व्हेनुसार भारत
लाचखोरीच्याबाबतीत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार,
श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनंतर सातव्या स्थानी आहे.
हैदराबाद विमानतळ
जगातील सर्वोत्तम विमानतळ
|
·
भारतातील हैदराबाद विमानतळ
जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे
(एसीआय) ही निवड करण्यात आली आहे.
·
विमानतळावर मिळणार्या
सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी) आणि विमानतळावरील प्रवाशांच्या
संख्येच्या आधारे ही निवड केली जाते.
·
याद्वारे 50 लाख ते दीड कोटी
प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या यादीत हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय
विमातळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले
आहे.
·
वर्षाला चार कोटी
प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाने
दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिल्या स्थानी दक्षिण कोरियातील
विमानतळाचा नंबर लागला आहे.
टाइम्स हायर
एज्यूकेशनच्या क्रमवारीत IIS
|
·
टाइम्स हायर एद्युकेशनच्या
टॉप 10 सर्वोत्कृष्ट लहान विध्यपीठाच्या (2017) च्या क्रमवारीत भारतीय विज्ञान
संस्थेने (IIS) स्थान मिळविले आहे. या क्रमवारीत IIS
ला आठवे स्थान प्राप्त झाले आहे.
·
यामध्ये 5000 पेक्षा कमी
विद्यार्थी संख्या असलेल्या विध्यपीठांचा विचार करण्यात आला आहे.
·
IIS ही आशियाई विध्यपीठांमध्ये
दुसर्या स्थानी आहे.
·
या क्रमवारीत पहिल्या
स्थानावर कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी आहे.
#IIS ही एक
वैज्ञानिक संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी सार्वजनिक विद्यापीठ असून 1909 मध्ये IIS
ची स्थापना करण्यात आली. तत्कालीन म्हैसूरचा महाराजा कृष्णराजा
वाडेयर (चौथा) आणि जमशेदाजी टाटा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
# टाइम्स हायर
एद्युकेशन जागतिक विद्यापीठ क्रमवारीची स्थापना 2004 मध्ये टाइम्स हायर एद्युकेशन
(THE) या मासिकाकडून करण्यात आली.
गुणवत्तापूर्ण
राहण्यायोग्य ठिकाणांच्या क्रमवारीत व्हिएन्ना प्रथम
|
·
न्यूयॉर्क स्थित ‘मर्सर’ या मानव संसाधन सल्लागार संस्थेने जाहीर
केलेल्या गुणवत्तापूर्ण राहण्यायोग्य ठिकाणांच्या निर्देशांकात सलग चौथ्या वर्षी व्हिएन्ना
(ऑस्ट्रीया) या शहराने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
·
गुणवत्तापूर्ण राहण्यायोग्य
भारतातील शहरांमध्ये सलग तिसर्या वर्षी हैदराबादने (तेलंगणा) पहिला क्रमांक
पटकाविला आहे.
·
हैदराबाद 145 व्या तर पुणे
146 व्या स्थानावर
·
पहिली पाच शहरे : व्हिएन्ना, झुरीच, म्यूनिच, दुससेलदोर्फ, फ्रँकफर्ट
·
पहिल्या दहा पैकी 8 युरोपिय
शहरे. ऑकलंड आणि व्हॅन्कुव्हर ही दोनच शहरे पहिल्या दहामध्ये युरोप बाहेरील.
‘राजकारणाच्या
नकाशात महिला’ या अहवालात भारत 148 वा
|
·
संयुक्त राष्ट्राच्या ‘UN
Women’ ने जाहीर केलेल्या ‘राजकारणाच्या
नकाशात महिला’ या अहवालात भारताला 148 वा क्रमांक
मिळाला आहे.
अहवालातील
महत्त्वाची मुद्दे :-
·
पहिले पाच देश : रावांडा, बोविलीया, क्युबा, आइसलॅंड, निकारागुआ
·
एशियातिल 11% महिलांकडे
मंत्रिपद आहे.
·
एशियामध्ये सरकारमध्ये
सर्वाधिक महिलांचे प्रमाण इंडोनेशियामध्ये आहे (25.7%)
·
भारतात लोकसभेत 11.8%
महिलांचा सहभाग आहे. 545 सदस्यांपैकी 64 महिला सदस्य
·
भारतात राज्यसभेत महिलांचे
प्रमाण 11% आहे. 245 पैकी 27 महिला सदस्या
·
महिला मंत्र्यांच्या यादीत
भारताचा 88 वा क्रमांक
आनंदी देशांच्या
यादीत भारत 122 वा
|
संयुक्त राष्ट्राच्या
सस्टेनेबल डेवलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कने जागतिक आनंदी दिनाच्या (20 मार्च)
पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या जागतिक आनंदी अहवाल 2017 मध्ये भारताला 155
देशांमध्ये 122 वे स्थान प्राप्त झाले आहे.
असमानता, आयुर्मान, दरडोई जीडीपी,
सार्वजनिक ट्रस्ट (उदा. सरकारी आणि व्यापारात भ्रष्टाचाराची कमतरता),
आणि सामाजिक आधार या घटकांवर आधारित अहवाल तयार करण्यात आला आहे.
2012 मध्ये पहिल्यांदा हा अहवाल जाहीर करण्यात आला होता त्यानंतरचा हा पाचवा अहवाल
आहे.
अहवालातील
महत्त्वाची मुद्दे :-
@ पहिले
पाच देश : नॉर्वे (1), डेन्मार्क (2), आइसलँड (3), स्वित्झर्लंड (4), फिनलंड (5)
@ सर्वांत
दुःखी देश : रवांडा (151), सीरिया (152), तंजानिया (153), बुरुंडी (154) आणि मध्य अफ्रिकन
प्रजासत्ताक (155).
@ मागील
अहवालात भारताला 118 वे स्थान मिळाले होते.
@ आठ
सार्क राष्ट्र: पाकिस्तान (80), नेपाळ (99), भूतान (9 7), बांगलादेश (110) आणि श्रीलंका (120). अहवालात मालदीवचा उल्लेख नाही.
@ ब्रिक्स
देश: ब्राझील (17), रशिया (56), चीन (7 9), दक्षिण आफ्रिका (116) आणि भारत (122).
ऊर्जा स्थापत्य
कामगिरी निर्देशंकात भारत 87 वा
|
जिनिव्हास्थित जागतिक आर्थिक मंचाने जाहीर
केलेल्या जागतिक ऊर्जा स्थापत्य कामगिरी निर्देशंकात (Global
Energy Architecture Performance Index) भारताला 127 देशांमध्ये 87
वे स्थान प्राप्त झाले आहे. हा एक्सएन्शियल
स्ट्रॅटेजीच्या सहकार्याने डब्ल्यूईएफने विकसित केलेला संमिश्र निर्देशांक आहे.
आर्थिक वृद्धी आणि विकास, ऊर्जा वापर आणि सुरक्षा आणि
पर्यावरणीय शाश्वतता या तीन आधारस्तंभावर आधारित 18 निर्देशांकच्या आधारे ही
क्रमवारी जाहीर केली जाते. पहिल्या पाच स्थनांवर अनुक्रमे स्वित्झर्लंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क आणि
फ्रान्स हे देश आहेत. 2016 च्या यादीत भारताचा 90 वा क्रमांक होता.
डोपिंग उल्लंघन
अहवालात भारत तिसर्या क्रमांकावर
|
जागतिक
डोपिंग(उत्तेजक) विरोधी संस्थेने (WADA) जाहीर
केलेल्या 2015 च्या डोपिंग उल्लंघन अहवालात भारत तिसर्या क्रमांकावर आहे.
2015 मध्ये 117 भारतीय खेळाडूंवर बंदी असलेल्या घटकांचा वापर केल्याप्रकरणी
कार्यवाही करण्यात आली होती. 2013, 2014 आणि 2015 अशी सलग तीन वर्षे भारत तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या
स्थानी रशियन फेडरेशन तर दुसर्या क्रमांकावर इटली आहे. 2013 मध्ये
पहिल्यांदा वाडाने हा अहवाल जाहीर केला होता आत्तापर्यंतचा हा तिसरा अहवाल आहे.
WADA (World Anti-Doping
Agency)
@ सर्व
प्रकारच्या खेळांमधील आणि देशांमधील डोपिंग विरोधी नियमांचा मेळ घालणारी
अंतरराष्ट्रीय गैरशासकीय संघटना
@ 1999 मध्ये स्विझलँड येथे स्थापना
@ मुख्यालय
: मॉन्ट्रियल, कॅनडा
सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठ देशात दहावे
|
§ केंद्रीय
मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांची
रँकिंग जाहीर केली असून यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या
क्रमांकावर आहे.
§ विद्यापीठांच्या
यादीत बंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सने अव्वल क्रमांक मिळाला, तर विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेच्या एकत्रित यादीतही याच संस्थेने पहिला
नंबर मिळवला. तर आयआयटी मुंबई तिसऱ्या नंबरवर राहिली.
§ विद्यापीठांच्या
यादीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या नंबरवर आहे.
तर देशभरातील एकूण शिक्षण संस्थांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा
18 वा नंबर आहे.
शिक्षणसंस्था
रँकिंग :-
1. आयआयएस, बंगळुरू
2. आयआयटी
चेन्नई
3. आयआयटी
मुंबई
4. आयआयटी
खरगपूर
5. आयआयटी
दिल्ली
6. जेएनयू
विद्यापीठ
7. आयआयटी
कानपूर
8. गुवाहटी
आयआयटी
9. आयआयटी
रुरकी
10. बनारस
हिंदू विद्यापीठ
विद्यापीठ
रँकिंग:-
1. इंडियन
इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू
2. जेएनयू
3. बनारस
हिंदू विद्यापीठ
4. जवाहरलाल
नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्च
5. जादावपूर
विद्यापीठ, कोलकाता
6. अण्णा
विद्यापीठ, चेन्नई
7. हैदराबाद
विद्यापीठ
8. दिल्ली
विद्यापीठ
9. अमृत
विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर
10. सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ
इंजिनिअरींग
रँकिंग:-
1.
आयआयटी मद्रास
2.
आयआयटी मुंबई
3.
आयआयटी खरगपूर
4.
दिल्ली आयआयटी
5.
कानपूर आयआयटी
मॅनेजमेंट
रँकिंग:-
1.
आयआयएम, अहमदाबाद
2.
आयआयएम बंगळुरु
3.
आयआयएम कोलकाता
4.
आयआयएम लखनौ
5. आयआयएम
कोझिकोड
व्यवसायातील भ्रष्टाचारामध्ये भारत 9 वा
|
§ ईवाय
युरोप, मिडल ईस्ट, इंडिया अँड आफ्रिका (EMEIA) फ्रॉड सर्व्हे 2017 मध्ये व्यवसायातील लाचखोरी व भ्रष्ट व्यवहार यात
भारताचा 41 देशांमध्ये 9 वा क्रमांक आहे.
§ 2015
च्या सर्वेक्षणात सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारताचा दर्जा सुधारला आहे.
§ युक्रेन, सायप्रस, ग्रीस, स्लोव्हेनिया,
क्रोएशिया, केनिया, दक्षिण
आफ्रिका आणि हंगेरी यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
§ यासाठी
करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 78% जनतेणी भारतामध्ये व्यवसायात भ्रष्टाचार आणि लाच
घेतली जाते आशे संगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत