संक्षिप्त घडामोडी 2017 : भाग 2
संकलन :- बालाजी सुरणे (चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचे लेखक)
w राफेल
नादाल :-
-
अमेरिका ओपन पुरुष एकेरीचा
वेजेता
-
अमेरिका ओपनचे त्याचे हे
तिसरे ग्रँड स्लाम आहे (२०१०, २०१३)
-
एकुणात १६ वे ग्रँड स्लाम
-
त्याने दक्षिण आफ्रिकेच्या
केविन अँडरसनचा पराभव केला
-
तो स्पेन या देशाचा आहे.
w तेनजिंग
नोर्गे, एडमंड हिलरी :-
-
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय
संघाने (आयएयू) प्लूटोवरील दोन पर्वत रांगांना तेनजिंग नोर्गे, एडमंड हिलरी यांची नावे दिली आहेत.
-
हे दोघे जगातील सर्वोच्च शिखर
माऊंट एव्हरेस्ट वर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ति आहेत.
-
भारतीय-नेपाळी गिर्यारोहक
तेनजिंग नोर्गे आणि न्यूझीलंडचे
गिर्यारोहक एडमंड हिलरी यांनी २९ मे १९५३ रोजी माऊंट एव्हरेस्ट सर केले होते.
-
प्लूटो ग्रहावरील विविध
भूरुपाना देण्यात आलेल्या १४ व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.
w नाविका
सागर परिक्रमा :-
-
नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा
चमूचा जगप्रवास
-
भारतात महिला कर्मचाऱ्यांसह
सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे.
-
भारतीय बनावटीच्या
आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेतून
हा जगप्रवास
-
गोव्यात संरक्षण मंत्री निर्मला
सीतारामन यांनी या नौकेला हिरवा झेंडा दाखवला
-
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या
आयएनएसव्ही तारिणीतल्या चमूमध्ये - लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर
स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी आणि लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
-
पहिला भारतीय वैयक्तिक
जागतिक जलप्रवास 19 ऑगस्ट 2009 ते 19 मे 2010 या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत
निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता. तसेच पहिला भारतीय विनाथांबा
वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या
कालावधीत केला होता.
-
नाविका सागर परिक्रमा पाच
टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे.
१)
गोवा ते फ्रेमेंटल
(ऑस्ट्रेलिया) हा प्रवास १० सप्टेंबर २०१७ ते १२ ऑक्टोबर २०१७ दरम्यान
२)
फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया) ते
लेटलटन (न्यूझीलंड) हा प्रवास २५ ऑक्टोबर २०१७ ते १६ नोव्हेंबर २०१७ दरम्यान
३)
लेटलटन (न्यूझीलंड) ते पोर्ट
स्टॅन्ले (फॉकलंड्स) हा प्रवास २३ नोव्हेंबर २०१७ ते २८ डिसेंबर २०१७ दरम्यान
४)
पोर्ट स्टॅन्ले (फॉकलंड्स)
ते केप टाउन (दक्षिण आफ्रिका) हा प्रवास १० जानेवारी २०१८ ते ८ फेब्रुवारी २०१८
दरम्यान
५)
केप टाउन (दक्षिण आफ्रिका)
इथून गोव्यासाठी परतीचा प्रवास २१ फेब्रुवारी २०१८ ला सुरु होऊन ४ एप्रिल २०१८
रोजी हा चमू गोव्यात पोहोचणार आहे.
आयएनएसव्ही
तारिणी
‘आयएनएसव्ही
तारिणी’ ही ‘आयएनएसव्ही म्हादई’ची पुढील आवृत्ती आहे. आयएसएनव्ही तारिणी, या 55 फुट
नौकेची बांधणी गोव्यातील मेसर्स एक्वारीअस शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीने केली
आहे. 18 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय नौदलात या नौकेचा समावेश करण्यात आला.
आतापर्यंत या नौकेने सुमारे 8000 सागरी मैल प्रवास केला आहे.
w जागतिक
वित्तीय केंद्र निर्देशांक २०१७:-
-
झेड/येन आणि चायना डेवलपमेंट
इंस्टीट्यूटने हा निर्देशांक जारी केला.
-
एकूण ९२ वित्तीय केंद्रांत लंडन
अव्वल स्थानी
-
मुंबई ६० व्या स्थानी (मागील
निर्देशांकात ५७ वा)
w भारतातील
पहिली होमिओपॅथी व्हायरोलॉजी लॅब :-
-
कलकत्ता येथे उद्घाटन
w इंद्रा
-२०१७ :-
-
भारत रशिया लष्कर सराव
-
पहिल्यांदाच तिन्ही
सेवादलांचा समावेश (आर्मी, नेवि,
एयरफोर्स)
-
ऑक्टोबर २०१७ मध्ये
रशियामध्ये पार पडला
w चकमा
आणि हाजोंग निर्वासित :-
-
केंद्र सरकारने ईशान्य
भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
१९६० च्या दशकात चकमा आणि
हाजोंग समाजातील सुमारे एक लाख नागरिकांनी बांगलादेशमधून ईशान्य भारतात विशेषतः
अरुणाचल प्रदेशमध्ये आश्रय घेतला होता.
-
तेव्हापासून या लोकांचे
भारतात वास्तव्य असून त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने
२०१५ मध्ये दिले होते.
w ग्लोबल
ह्यूमन कॅपिटल इंडेक्स २०१७:-
-
१३० देशांच्या यादीत भारत १०३
व्या स्थानी
-
मागील क्रमवारीत भारताचा १०५
वा क्रमांक
-
जागतिक आर्थिक मंचाने हा
निर्देशांक जारी केला.
-
पहिले पाच देश
:- १) नॉर्वे, २) फिनलंड, ३)
स्वित्झर्लंड, ४) अमेरिका, ५) डेन्मार्क
-
ब्रिक्स देश :-
रशिया (१६), चीन (३४), ब्राझिल
(७७), दक्षिण आफ्रिका (८७)
-
दक्षिण आशियाई देश :- श्रीलंका
(७०), नेपाळ (९८), भारत (१०३),
बांग्लादेश (१११), पाकिस्तान (१२५)
w ऑपरेशन
इंसानियत :-
-
परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयाने बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांना मदत करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू
केले.
w अस्त्र
क्षेपणास्त्र :-
-
भारतीय हवाई दलाने अस्त्र
क्षेपणास्त्राची विकासाधीन चाचणी चाचणी घेतली
-
स्वदेशी बनावटीचे हवेतून
हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
-
डीआरडीओने विकसित केले.
-
लांबी :- ३.८ मीटर
-
वजन :- १५४ किलो
-
एकेरी स्तर घन इंधन
-
वेग :- जास्तीत जास्त ४ मॅक
w स्वच्छता
ही सेवा अभियान :-
-
केंद्र सरकारने स्वच्छ भारत
मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरू केले
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी ईश्वरीगंज (कानपुर मधील गाव, उत्तर
प्रदेश) येथून सुरुवात केली.
-
हे अभियान १५ सप्टेंबर ते २
ऑक्टोबर पर्यन्त राबविण्यात आले.
w आंतरराष्ट्रीय
ओझोन दिन :-
-
दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी
साजरा केला जातो.
-
२०१७ ची संकल्पना :- ‘Caring
for all life under the sun’
-
१९ डिसेंबर १९९४ रोजी
संयुक्त राष्ट्र साधारण परिषदेकडून स्थापन
-
१६ सप्टेंबर १९८७ रोजी ओझोन
थरासंबंधी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर साह्य करण्यात आल्या
w अर्जन
सिंह :-
-
भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि
'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अधिकारी
-
२००२ मध्ये त्यांना मार्शल
सर्वोच्च लष्करी रँक देण्यात आला. यापूर्वी फक्त दोन लष्कर प्रमुखांना का रॅंक देण्यात
आला - के एम करीअप्पा आणि सॅम मानेकशॉ
-
अर्जन सिंह यांच्या ९७ व्या
वाढदिवसाच्या निमित्ताने २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाईदल तळाला
त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
-
त्यांचा जन्म
स्वातंत्र्यपूर्व काळात १५ एप्रिल १९१९ रोजी फैसलाबादमध्ये एका सैन्य परिवारात
झाला होता.
-
पद्मविभूषण पुरस्काराने
सन्मानित करण्यात आलेल्या अर्जन सिंह यांनी दुसरे महायुद्ध आणि १९६५च्या
भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला.
-
फिल्ड मार्शलच्या बरोबरीचा
दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे एकमेव हवाईदल अधिकारी होते.
w युद्ध
अभ्यास -२०१७ :-
-
भारत आणि अमेरिकेतील १३ वा
संयुक्त लष्कर सराव
-
वॉशिंग्टन, अमेरिका येथे पार पडला
w सरदार
सरोवर धरण :-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी बहूउद्देशीय सरदार सरोवर धरणाचे लोकार्पन सप्टेंबर २०१७ मध्ये केले.
-
भारतातील सर्वांत उंच धरण
-
जगातील सर्वांत मोठे दुसरे
गुरुत्व धरण
-
हे धरण भारताचे पहिले
उपपंतप्रधान सरदार वल्लभई पटेल यांचे लक्ष्य होते
-
५ एप्रिल १९६१ रोजी पंडित
जवाहरलाल नेहरू यांनी याचे भूमिपूजन केले होते.
-
लांबी :- १.२ किलोमीटर
-
खोली :- १६३ मीटर
-
लाभार्थी राज्ये :- गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र
-
जलसिंचन :- २२,००० हेक्टर जमीन
-
विजेतील वाटा :- महाराष्ट्र
(५७%), मध्य प्रदेश (२७%), गुजरात (१६%)
-
निर्मितीत वापरण्यात आलेल्या
सिमेंट काँक्रिटचे प्रमाण हे सर्वाधिक
-
धरणावरील दोन वीज
प्रकल्पांमधून आजवर ४,१४१ कोटी युनिट वीजेची
निर्मिती
-
या धरणाच्या प्रत्येक
दरवाजाचे वजन ४५० टनांपेक्षा जास्त आहे.
-
हे दरवाजे पूर्णपणे बंद
करण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो.
-
नव्या दरवाजांमुळे धरणाच्या
उंचीमध्ये १३८.६८ मीटरने वाढ झाली आहे.
-
सामाजिक कार्यकर्त्या मेधा
पाटकर या प्रकल्पाविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. या प्रकल्पामुळे
विस्थापित झालेल्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांच्या नर्मदा बचाव
आंदोलनाने पर्य़ावरण आणि पुनवर्वसनाच्या मुद्द्यावरून सरकारला सर्वोच्च न्यायालयात
खेचले होते.
w शहीद
ग्राम विकास योजना :-
-
झारखंड सरकारची योजना
-
उद्देश :- राज्यातील
स्वातंत्र्य सैनिकांची गावे विकसित करणे.
w डॉ.
एम. एस. सुब्बलक्ष्मी :-
-
प्रख्यात कर्नाटिक संगीतकार
-
त्यांच्या १०१ व्या
जयंतिनिमित्त १०० आणि १० रुपयाचे नाणे काढण्यात आले.
-
उपराष्ट्रपती एम व्येंकया
नायडू यांच्या हस्ते अनावरण
w बिमस्टेक
आपत्ती व्यवस्थापन सराव :-
-
१०-१३ ऑक्टोबर २०१७ दरम्यान
भारतात पार पडला
-
आयोजक :- राष्ट्रीय आपत्ती
प्रतिसाद दल
w आंतरराष्ट्रीय
शांतता दिन :-
-
२१ सप्टेंबर रोजी साजरा
करण्यात आला. सप्टेंबरमधील तिसर्या मंगळवारी साजरा केला जातो.
-
संकल्पना :- शांततेसाठी एकत्र: सर्वांसाठी आदर, सुरक्षितता आणि
सन्मान (Together for Peace: Respect, Safety and Dignity for All)
-
१९८१ मध्ये स्थापना. १९८२
मध्ये पहिल्यांदा साजरा.
w वस्त्र
२०१७ :-
-
आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग
आणि पोशाख मेळा
-
जयपुर (राजस्थान) येथे पार पडला
-
आयोजक :- फिक्की आणि
राजस्थान सरकार
-
६ वी आवृत्ती
w भारतातील
पहिली इलेक्ट्रिक बस सेवा :-
-
रोहतांग खिंड, हिमाचल प्रदेश येथे सुरुवात
-
१३००० फुट उंचवरील जगातील
पहिली सेवा
-
ही सेवा मनाली ते रोहतांग
दरम्यान
w आयएनएस
कलवरी :-
-
आयएनएस कलवरी नौदलाकडे
सुफुर्द
-
स्वदेशी बनावटीची पहिली
पाणबुडी
-
बांधणी :- माझगाव डॉक
लिमिटेड, मुंबई
-
प्रोजेक्ट ७५ अंतर्गत
बांधण्यात येणार्या ६ स्कोर्पियन वर्गातील पाणबुड्यांपैकी एक
-
वजन :- १७०० टन
-
लांबी :- २१६ फुट
-
रुंदी :- २० फुट
-
भारतीय संरक्षण मंत्रालय आणि
फ्रेंच कंपनी डीसीएनएस यांची निर्मिती
w न्यूटन
: भारतातून ऑस्कर साठी पाठविण्यात आलेला चित्रपट
-
दिग्दर्शक : अमित मसुरकर
-
न्यूटन कुमारची भूमिका -
राजकुमार राव
-
भारतीय भाषांमधील २६
चित्रपटांमधून 'न्यूटन'ला ऑस्करच्या
शर्यतीत पाठवण्याचा निर्णय १४ सदस्यीय निवड समितीनं घेतला.
-
विशेष म्हणजे ज्या दिवशी
सिनेमा प्रदर्शित झालाय, त्याच दिवशी या सिनेमाची
ऑस्करसाठी निवड झाली.
w दीनदयाल
हस्तकला संकुल :-
-
हस्तकलेसाठीचे व्यापार
सुविधा केंद्र आणि शिल्प संग्रहालाय
-
वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
w प्रधानमंत्री
एलपीजी पंचायत :-
-
पेट्रोलियम आणि नैसर्गिक
वायु मंत्रालयाचा उपक्रम
-
उद्देश :- जेथे पारंपारिक
इंधन स्थानिक उपयोगांसाठी वापरले जाते अशा ग्रामीण भागात एलपीजी कनेक्शन वितरीत
करणे
-
गांधींनागर जिल्ह्यातील मोटा
ईशाणपूर गावातून धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात
w प्रलय
सहायम :-
-
शहरी पुर स्थितीत मदत आणि
बचाव अभियानात ताळमेळ स्थापित करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला बहू-एजन्सी
अभ्यास
-
हा अभ्यास हैद्राबाद येथे
घेण्यात आला.
w सीएनआर
राव :-
-
प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि
भारतरत्न पुरस्कार विजेते
-
वोन हिप्पल पुरस्कर २०१७ ने
सन्मानित
-
हा पुरस्कार मिळवणारे पहिले
आशियाई
-
पदार्थ संशोधन क्षेत्रातील
मनाचा पुरस्कार
-
चिंतामणी नागेश रामचंद्र राव
असं त्यांचं संपूर्ण नाव आहे.
-
घन स्थिती आणि संरचनात्मक
रसायनशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत.
-
कानपूर आयआयटी आणि बंगरुळू
मधल्या भारतीय विज्ञान संस्थेत त्यांनी प्राध्यापकाचं काम केलंय.
-
केंद्रसरकारनं यापुर्वी
त्यांना भारतरत्न, पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्कारानं गौरवलेलं
आहे.
-
भारतामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी
आणण्यात राव यांची महत्त्वाची भूमिका होती.
-
जगभरातल्या मानाच्या तब्बल
४० युनिव्हर्सिटीजनी राव यांना मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे.
w जागतिक
पर्यटन दिन :-
-
दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी
साजरा केला जातो.
-
संकल्पना :- ‘शाश्वत पर्यटन – विकासाचे एक साधन’
w दीनदयाल
बंदर :-
-
कांडला बंदराचे नामकरण
दीनदयाल बंदर असे करण्यात आले आहे.
-
इंडियन पोर्ट्स अॅक्ट १९०८
नुसार केंद्रीय शिपिंग मंत्रालयाने हा बदल केला.
-
भारतातील १२ मोठ्या
बंदरांपैकी एक
-
हे बंदर कच्छच्या अखतात
गुजरातमध्ये आहे.
-
कार्गो हाताळणीच्या
अकरमानाचा विचार केल्यास देशातील सर्वांत मोठे बंदर
-
भारत पाकिस्तान विभाजनानंतर
कराची बंदरची जागा घेण्यासाठी बांधणी
w आयएनएस
तरसा :-
-
२६ सप्टेंबर २०१७ रोजी
आयएनएस तरासाला नौदलात सामील करण्यात आले.
-
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर
नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह विकसित केलेली एक
पाळत ठेवणारी युद्धनौका आहे.
-
अंदमान निकोबारवरील एका
बेटाच्या नावावरून आयएनएस तरासा असे नाव ठेवण्यात आले.
-
अत्याधुनिक 4000 श्रंखलेतील
एमटीयू इंजिन
-
315 टन वाहन क्षमता
-
सर्वोत्तम वेग – 35 नॉट्स
w सौभाग्य
योजना :-
-
ऊर्जा मंत्रालयाने देशातील
प्रत्येक घरात वीज पोहचविण्यासाठी ‘सहज बिजली हर
घर (सौभाग्य)’ ही योजना सुरू केली आहे.
-
योजनेअंतर्गत सामाजिक-आर्थिक
आणि जात गणना २०११ च्या महितीचा आधार घेऊन सर्व गरीब कुटुंबीयांना मोफत वीज पुरवठा
करणार आहे.
-
दारिद्र्य रेषेवरील (एपीएल)
कुटुंबीयांना ५०० रुपये भरून (१० टप्प्यांत) वीज जोडणी देण्यात येणार.
-
दारिद्र्य रेषेखालील
(बीपीएल) कुटुंबांना मोफत वीज जोडणी देण्यात येणार.
-
राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांनी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत कुटुंबांना विद्युतजोडणी देण्याचे काम पूर्ण
करावयाचे आहे.
-
या योजनेच्या आमल्बाजवणीसाठी
ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ लि. ही नोडल संस्था असेल.
-
ही योजना १६,३२० कोटी रुपयांची असून यामध्ये केंद्र सरकार ६०% मदत करणार आहे. विशेष
दर्जा राज्यांना ८५% पर्यंत केंद्र सरकार मदत करेल.
-
योजनेतील १०% वाटा राज्य
सरकारांचा असेल आणि उर्वरित ३०% वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यात येणार आहे.
w जागतिक
स्पर्धात्मकता निर्देशांक :-
-
१३७ देशांमध्ये
भारताचा ४० वा क्रमांक.
-
२०१६ मध्ये भारत ३९
व्या क्रमांकावर होता. एका स्थानाने घसरण.
-
जागतिक आर्थिक
मंचाने (WEF) सदर निर्देशांक जाहीर केला.
-
पहिले पाच
देश: स्वित्झर्लंड, अमेरिका, सिंगपोर, नेदर्लंड, जर्मनी
-
ब्रिक्स देश:
चीन (२७), रशिया (३८), भारत (४०), दक्षिण आफ्रिका (६१), ब्राझिल (८०)
-
भारत दक्षिण
आशियातील सर्वाधिक स्पर्धात्मक देश.
w जागतिक
रेबिज दिन :-
-
दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी
साजरा केला जातो
-
२०१७ ची संकल्पना :- ‘Rabies:
Zero by 30’
-
२००७ मध्ये पहिल्यांदा साजरा
w यंदाचा
‘गानसम्राज्ञी’ पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना
जाहीर
-
राज्य शासनातर्फे संगीत
क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर
यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा
पागधरे यांना मुंबई येथे घोषित करण्यात आला.
-
सांस्कृतिक कार्यमंत्री
विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
-
प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे
गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर
पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
-
सांस्कृतिक कार्य मंत्री
विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका
पुष्पा पागधरे यांच्या नावाची शिफारस केली आहे.
-
या पुरस्काराचे स्वरुप रु.५
लाख रोख,
मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
w महाराष्ट्रात
प्रायोगिक तत्वावर मोटरबाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ
-
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे
3 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मोटरबाईक अॅम्ब्युलन्स’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात
आला आहे.
-
राष्ट्रीय आरोग्य
अभियानांतर्गत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा या प्रकल्पासाठी मध्यवर्ती
नियंत्रण कक्ष ऊरो रुग्णालय, औध, पुणे येथे उभारण्यात आलेला आहे.
-
देशात अशी सेवा देणारे मुंबई
हे पहिले शहर ठरले आहे.
w ‘स्वच्छ भारत मिशन’चे अॅम्बेसिडर :-
-
‘स्वच्छ भारत मिशन’चे अॅम्बेसिडर म्हणून सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
-
अन्य अॅम्बेसिडर:- सचिन तेंडुलकर, अमिताभ
बच्चन, प्रियंका चोप्रा, बाबा रामदेव,
सलमान खान, विराट कोहली, कमल हसन यांना स्वच्छ भारत मिशनचे अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले
आहे.
w व्हीव्हीपॅट
:-
-
गुजरातमधील आगामी विधानसभा
निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ‘व्होटर
व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यंत्राचा वापर
केला जाणार आहे.
-
केंद्रीय निवडणूक आयोगाने
घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला प्रथमच मतदान केल्याची
पावती मिळणार आहे.
-
‘व्हीव्हीपॅट’ यंत्रामुळे मतदारांना त्यांचे मत योग्य प्रकारे नोंद झाले आहे अथवा नाही,
याची खात्री करता येणार आहे. तसेच शंका आल्यास तक्रारही करता येणार
आहे.त्यानुसार संपूर्ण राज्यात ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे.
w माखनलाल
फोतेदार (निधन) :-
-
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ
नेते
-
त्यांना ‘काँग्रेसचे चाणक्य’ म्हणूनही ओळखले जात
-
१९८०-८४ या काळात इंदिरा
गांधींचे ते राजकीय सचिव
-
राजीव गांधी यांचेही ते काही
काळासाठी राजकीय सचिव
-
मुळचे जम्मू-काश्मीरचे
-
काँग्रेसच्या कार्यकारिणी
समितीचे दीर्घकाळ सदस्य होते
-
जम्मू-काश्मीर सरकारमध्ये
कॅबिनेट मंत्री
-
राज्यसभेत दोन टर्म निवडून
जाण्याची संधी त्यांना मिळाली होती.
-
फोतेदार यांच्या 'द चिनार लिव्हज' या पुस्तकाचे २००५ साली प्रकाशन
w ह्यूग
हेफ्नर (निधन) :-
-
‘प्लेबॉय’ या पुरुषांसाठी लैंगिक विषयावरच्या मासिकाचे संस्थापक
-
ते हेफ या नावानेही ओळखले
जात
-
अमेरिकेतील
व्यक्तीस्वातंत्र्याच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात.
-
१९५३ मध्ये ह्यूग हेफ्नर
यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात
-
मासिक सुरु केल्यानंतर ७
वर्षांनी १९६०मध्ये हेफ्नर यांनी पहिला प्लेबॉय क्लब सुरू केला.
-
प्लेबॉय या मॅगझिनच्या कव्हर
पेजवर झळकणारी शर्लिन चोपडा भारतातील एकमेव मॉडेल होती.
w ऑपरेशन
अर्जुन :-
-
सीमा सुरक्षा दलाच्या
जवानांनी ‘ऑपरेशन अर्जुन’च्या
माध्यमातून सीमेवरील पाकिस्तानच्या सैनिकांच्या आणि माजी सैनिकांच्या घरांवर तसेच
शेतात बेधूंद गोळीबार करून पाकिस्तानला भारताने जबरदस्त धडा शिकविला आहे.
-
गेल्यावर्षी भारताने 'ऑपरेशन रूस्तम' सुरू करून पाकिस्तानला असेच सळो की
पळो करून सोडले होते. त्याच धर्तीवर 'ऑपरेशन अर्जुन' सुरू केले आहे
w पुष्पा
पागधरे :-
-
राज्य सरकारतर्फे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर
-
स्वरूप :- पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह
w शीर
टेस्टर :-
-
दुधातील भेसळ त्वरित
ओळखणाऱ्या उपकरणाचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
-
या उपकरणाला ‘शीर टेस्टर’ असे नाव देण्यात आले आहे.
-
‘काऊन्सिल ऑफ सायन्टिफीक अॅण्ड
इंडस्ट्रियल रिसर्च’ म्हणजेच ‘सीएसआयआर’ने या उपकरणाची निर्मिती केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत