• New

    संक्षिप्त घडामोडी 2017 : भाग 1


    संक्षिप्त घडामोडी 2017 : भाग 1 (By बालाजी सुरणे, चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचे लेखक)

    w  प्रदीप सिंह खरोला
    -          कर्नाटक कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी
    -          एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड
    -          सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत
    -          राजीव बन्सल यांची जागा घेतली

    w  दीना वाडिया यांचे निधन:-
    -          पाकिस्तानचे जनक मोहम्मद आली जिना यांच्या एकुलत्या एक कन्या दीना वाडिया यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी २ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यूयॉर्क मध्ये निधन झाले.
    -          जन्म :- २५ ऑगस्ट १९१९ रोजी लंडन येथे झाला.
    -          त्यांनी भारतात राहणे पसंद करून नेव्हील वाडिया या पारशी व्यक्तीशी विवाह केला.
    -          त्यांनी मे हिज ड्रीम फॉर पाकिस्तान कम टु हे पुस्तक लिहिले.

    w  सुहासिनी कोरटकर यांचे निधन :-
    -          भेंडीबझार घराण्याच्या जेष्ठ गायिका
    -          टोपण नावे :- गुरु, निगुनी
    -          त्या अविवाहित होत्या
    -          जन्म :- ३० नोव्हेंबर १९४४
    -          पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन
    -          त्यांनी आपल्या गुरूंच्या नावे युवा गायक कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला.
    -          दिल्लीच्या प्रसिद्ध ठुमरी गायिका नैनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचे मार्गदर्शन घेतले.
    -          संगीताचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएचडी मिळवली.

    w  सुनील अरोरा :-
    -          निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक
    -          त्यांना चार वर्षांचा कार्यकाल लाभणार
    -          जुलै २०१७ मध्ये नसीम झैदी हे निवृत्त झाल्याने जागा रिक्त
    -          राजस्थान केडरचे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी
    -          एप्रिल २०१६ मध्ये माहिती व प्रसारण सचिव पदावरून निवृत्त
    -          त्यापूर्वी ते कौशल्य विकास सचिव होते.
    -          पाच वर्षे त्यांनी इंडियन एयरलाईन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय पद सांभाळले
    -          २००५-०८ राजस्थानचे मुख्य सचिव

    w  राजीव महर्षि :-
    -          वरिष्ठ आयएएस अधिकारी
    -          भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणून नेमणूक (कॅग)
    -          शशिकांत शर्मा यांची जागा त्यांनी घेतली.
    -          राजस्थान केडरचे १९७८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी
    -          ग्लासगो येथून व्यवसाय प्रशासनाची पदवी
    -          सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली येथून इतिहासामध्ये बीए आणि एमए
    -          राजस्थानचे माजी मुख्य सचिव
    -          केंद्रीय वित्त सचिव, केंद्रीय गृह सचिव

    w  राजीव कुमार :-
    -          प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ
    -          नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला
    -          अरविन्द पनगाडीया यांची जागा त्यांनी घेतली
    -          ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फील, लखनौ विद्यापीठातून पीएचडी
    -          फिक्कीचे माजी महासचिव
    -          २००६-०८ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य
    -          सीआयआयमध्ये प्रमुख अर्थतज्ञ
    -          एशियन डेवलपमेंट बँकेत अर्थतज्ञ
    -          नीती आयोगाचे उपाध्यक्ष :- कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
    -          अध्यक्ष :- पंतप्रधान 

    w  युरोपियन एक्स-रे फ्री इलेक्ट्रॉन लेझर (एक्सएफईएल) :-
    -          जगातील सर्वांत मोठी आणि शक्तीशाली एक्स-रे लेसर गन
    -          हंबर्ग, जर्मनी येथे अनावरण

    w  राष्ट्रीय पोषण आठवडा :-
    -          १ ते ७ सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो
    -          २०१७ ची संकल्पना :- शिशु आणि लहान मुलांची आहार पद्धती: उत्तम बाल आरोग्य

    w  राजस्व ज्ञान संगम २०१७ :-
    -          वरिष्ठ कर प्रशासकांची दोन दिवासीय वार्षिक परिषद
    -          विज्ञान भवन, दिल्ली येथे पार पडली.
    -          उद्घाटन :- नरेंद्र मोदी
    -          आयोजक :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क मंडळ

    w  अहमदाबाद:-
    -          यूनेस्को द्वारा जागतिक वारसा शहर म्हणून घोषित
    -          भारतातील पहिलेच शहर
    -          आशियातील तिसरे शहर (भक्तपुर-नेपाळ, गल्ले – श्रीलंका)
    -          ६०० वर्ष जुने आणि गुजरातची वाणिज्यिक राजधानी
    -          वॉल्ड सिटी म्हणून परिचित
    -          १५ व्या शतकात गुजरात सल्तनतच्या अहमद शहाकडून स्थापना
    -          साबरमती नदीच्या पूर्व किनार्‍यावर वसले आहे.
    -          भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून संरक्षित २८ स्मारके
    -          शहरात ५.५ किलोमीटरची ऐतिहासिक भिंत आहे.
    -          सध्या भारतात ३६ जागतिक वारसा स्थळे (२८ संस्कृतिक, ७ नैसर्गिक , १ मिश्र)
    -          वारसा स्थळांच्या संख्येत भारत जगात सातवा तर एशिया-पॅसिफिक क्षेत्रात चीन नंतर दूसरा

    w  प्रीती पटेल:-
    -          थेरेसा मे यांच्या सरकारमध्ये त्या आंतरराष्ट्रीय विकास खात्याच्या मंत्री होत्या. त्यांना या पदाचा गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा द्यावा लागला.
    -          भारतीय वंशाच्या (गुजरात) प्रीती पटेल या ग्रेट ब्रिटनमधील अल्पसंख्यांक समुदायाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. २०१० पासून त्या खासदार आहेत.
    -          त्या मे सरकारमध्ये आशियाई वंशाच्या एकमेव मंत्री होत्या.

    w  निशिकांत मिरजकर :-
    -          साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
    -          संमेलनाचे आयोजक :- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान 
    -          दिनांक :- २४-२५ डिसेंबर २०१७
    -          स्थळ :- यशवंतराव चव्हाण नात्याग्रह, पुणे

    w  जेफ बेजॉस जगात सर्वात श्रीमंत :-
    -          जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजॉस यांनी श्रीमंतीच्या बाबतीत बिल गेट्सचा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
    -          बेजॉस यांची संपत्ती १००.३ अब्ज डॉलर्स असून १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असणारी बेजॉस ही जगातली दुसरी व्यक्ती आहे. यापूर्वी १९९९मध्ये मायक्रोसॉफ्टचे संपादक बिल गेट्स यांनी हा विक्रम केला होता.

    w  ऊर्जित पटेलयांची बीआयएसमध्ये नेमणूक :-
    -          आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटवर (बीआयएस) नेमणूक करण्यात आली आहे.
    -          बीआयएस ला आर्थिक स्थिरता संस्था सल्लागार मंडळ या नावानेही ओळखले जाते.
    -          बीआयएसचे मुख्यालय :- बेसल (स्वित्झर्लंड)

    w  गोपी थोनाकल :-
    -          आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.
    -          डोंगुआन (चीन) येथे पार पाडलेल्या १६ व्या आवृत्तीमध्ये त्याने ही कामगिरी केली.
    -          २ तास १५ मिनिट ४८ सेकंदात ही शर्यत पूर्ण करून त्याने सुवर्ण पदक मिळविले.

    w  हिमंत विश्व शर्मा :-
    -          आसामचे वित्त मंत्री
    -          रेस्टॉरंट्सवरील जीएसटी दारांचे पुनःपरीक्षण करण्यासाठी आणि रचना योजना अधिक आकर्षक बनविण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.

    w  प्लेबॉयचे संस्थापक ह्यूग हेफनर यांचं निधन
    -          प्रसिद्ध अॅडल्ट मॅगझिन प्लेबॉयचे संस्थापक ह्यूग हेफनर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे.
    -          ह्यूग हेफनर यांनी 1960 च्या दशकात सेक्स आणि लैगिक विषयांबद्दलच्या पारंपरिक विचारांची असणारी चौकट मोडून काढली.
    -          रेड स्मोकिंग जॅकेट आणि हातात पाईप अशी ही हफनर यांची ओळख होती.

    w  सॅम शेपर्ड यांचे निधन :-
    -          पुलित्झर पुरस्कार विजेते अमेरिकन नाटककार सॅम शेपर्ड यांचे २७ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
    -          त्यांना ‘Buried Child’ या त्यांच्या नाटकासाठी १९७९ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.
    -          त्यांनी जवळपास ५० नाटके लिहिली.
    -          ते ऑस्कर नामांकित अभिनेते होते.

    w  रामभाऊ पोतदार :-
    -          बेळगावचे अजातशत्रू व्यक्तीमत्व, कर्नाटक विधान परिषदेचे माजी अध्यक्ष रामभाऊ पोतदार यांचे २६ ऑगस्ट २०१७ रोजी वार्धक्याने निधन झाले.
    -          जनता दलाचे रामक्रष्ण हेगडे यांचे सरकार कर्नाटकात सत्तेवर असताना रामभाऊ विधान परिषद अध्यक्ष होते.
    -          बेळगावात एपीएमसी स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

    w  नंदन निलकेणी :-
    -          इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधारचे निर्माते
    -          इन्फोसिस संचालक मंडळाच्या गैरकार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक
    -          २००२ ते २००७ दरम्यान ते इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

    w  टोनी डी ब्रुम :-
    -          प्रसिद्ध हवामान जागरूकता कार्यकर्ते टोनी डी ब्रुम यांचे निधन
    -          ते मार्शल आयलंड या देशाचे होते.

    w  दिगंबर बेहरा :-
    -          यांना वैज्ञानिक उत्कृष्टतेसाठीचा २०१६ चा बिजू पटनाईक पुरस्कार मिळाला आहे.
    -          याशिवाय प्रसनता मोहोपात्रा यांना २०१५ साठीचा पुरस्कार देण्यात आला.
    -          या पुरस्काराची सुरुवात ओडिशा बिज्ञान अकॅडेमीने केली.

    w  AFSPA:-
    -          सशस्त्र सेना (विशेष अधिकार) कायदा, १९५८
    -          या कायद्याच्या कलम ३ नुसार आसाम राज्याला आणखी ६ महिन्यासाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित
    -          पहिल्यांदाच राज्य सरकारने या कायद्याला मुदतवाढ दिली. सर्वसामान्यपणे ही मुदतवाढ केंद्र सरकार देत असते.
    -          सध्या हा कायदा ६ राज्यांत लागू

    w  निर्मला सीतारामन :-
    -          भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री
    -          अरुण जेटली यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला
    -          संरक्षण मंत्री होणार्‍या दुसर्‍या महिला (यापूर्वी-इंदिरा गांधी, १९८०-८२, अतिरिक्त भार)
    -          सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी मदुराई (तमिळनाडू) येथे झाला.
    -          सध्या त्या कर्नाटक मधून राज्यसभा सदस्य आहेत.
    -          त्या मुळच्या आंध्रप्रदेशच्या आहेत
    -          शिक्षण :- एमए अर्थशास्त्र (जेएनयू), पीएचडी, एमफील.
    -          प्रणव स्कूल, हैदराबाद संस्थापक सदस्या
    -          २००३-०५ राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या
    -          यापूर्वी मोदी सरकारमध्ये वित्त आणि वाणिज्य राज्यमंत्री

    w  सौनी योजना :-
    -          सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरीगेशन स्कीम (सौनी)
    -          राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते या योजनेच्या लिंक-४ ची पायाभरणी
    -          हा बहूद्देशीय प्रकल्प असून गुजरात मधील सौराष्ट्र क्षेत्रातील पाणी प्रश्न सोडविणे मुख्य उद्देश    

    w  राष्ट्रीय शिक्षक दिन :-
    -          दरवर्षी ५ स्पटेंबर रोजी साजरा केला जातो
    -          भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती.

    w  सूर्य किरण :-
    -          भारत-नेपाळ संयुक्त लष्कर सराव
    -          २०१७ – १२ वा सराव
    -          नेपाळ आर्मी बॅटल स्कूल, सालझांडी येथे पार पडला
    -          ३-१६ सप्टेंबर २०१७

    w  दीक्षा पोर्टल :-
    -          केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने शिक्षकांसाठी हे पोर्टल जारी केले.
    -          उद्देश :- शिक्षकांची जीवनशैली अधिक डिजिटल बनविण्यासाठी त्यांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

    w  स्लिनेक्स-२०१७ :-
    -          भारत-श्रीलंका संयुक्त नौदल सराव
    -          ७ ते १४ सप्टेंबर २०१७ दरम्यान विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे पार पडला
    -          सुरुवात – २००५

    w  राष्ट्रीय पोषण धोरण :-
    -          नीती आयोगाने कुपोषणमुक्त भारत बनविण्यासाठी हे धोरण जाहीर केले.
    -          उद्देश :- पोषनाला राष्ट्रीय विकास कार्यसूचीला केंद्रीय स्थान देणे.
    -          ही कार्यसूची देशभरात पोषनासंबंधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रस्तुत करण्यात आली. हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम एस स्वामीनाथन आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी काल नवी दिल्ली येथे ही कार्यसूची जारी केली आहे.
    -          या धोरणात पोषणाचे चार निर्धारक पैलू अर्थात भोजन, स्वास्थ्य सेवा, मिळकत आणि पिण्याचे पाणी यांच्या समन्वयावर भर देण्यात आला आहे.
    -          पोषण कार्य धोरणामध्ये कुपोषण भारतावर जोर देण्यात आला आहे, तसेच तो स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत यांच्याशी जोडलेला आहे.
    -          धोरणानुसार भारताच्या पोषण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच मागणी आणि समाजाला समाविष्ट करण्यासाठी अधिक लक्ष दिले जाणार

    w  ९ वी ब्रिक्स परिषद :-
    -          ३-५ सप्टेंबर २०१७ दरम्यान शियामेन, चीन येथे पार पडली.
    -          यापूर्वी २०११ मध्ये चीनमध्ये परिषद झाली होती.
    -          संकल्पना :- उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत भागीदारी (Stronger Partnership for brighter Future)
    -          शेवटच्या दिवासी शियामिन घोषणापत्राचा स्वीकार

    w  धार्मिक स्वातंत्र्य बिल, २०१७ :-
    -          झारखंड राज्याने नुकतेच या विध्येयकाला मान्यता दिली
    -          धर्मांतरण विरोधी कायदा करणारे झारखंड सातवे राज्य
    -          यापूर्वी – महाराष्ट्र, छतीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांनी कायदा केला.

    w  आय. राममोहन राव यांचे निधन
    -          देशाचे माजी प्रमुख माहिती अधिकारी आय राममोहन राव याचे 13 मे 2017 रोजी निधन झाले. राजीव गांधी, व्ही पी सिंह, इंद्रकुमार गुजराल आणि पी व्ही नरसिंहराव या चार पंतप्रधंनांचे ते माध्यम सल्लागार होते. ते मुळचे कारवरचे होते. कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेटर हे त्याचे आत्मचरित्रपर पुस्तक होते.

    w  राजीव कुमार तज्ञ कार्यगट :-
    -          नीती आयोगाने स्थापन केला
    -          उद्देश :-  भारताच्या निर्यातीत वाढ करून रोजगारनिर्मितीला मुख्य जोर देणे
    -          राजीव कुमार – नीती आयोगाचे उपाध्यक्ष

    w  जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०१८ :-
    -          टाइम्स या मासिकाने ही क्रमवारी जाहीर केली
    -          भारतीय विद्यापीठांत भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस) प्रथम क्रमांकावर
    -          मात्र जागतिक क्रमवारीत आयआयएसचा मागच्यापेक्षा घसरण
    -          पहिले पाच विद्यापीठ :-
    १)      ऑक्सफोर्ड विद्यापीठ (यूके)
    २)      केंब्रिज विद्यापीठ (यूके)
    ३)      कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी (अमेरिका)
    ४)      स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका)
    ५)      मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
    -          पहिल्या १० मध्ये अमेरिकेतील ६ विद्यापीठे
    -          भारतातील एकही विद्यापीठ पहिल्या १०० मध्ये नाही
    -          यादीत भारतातील एकूण ३० विद्यापीठांचा समावेश
    -          पहिल्या २०० मध्ये ३ भारतीय विद्यापीठे तर ५०० मध्ये ८
    -          पहिल्या २०० मध्ये :- आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी बंगळुरु 

    w  उजाला योजना :-
    -          UJALA :- Unnat Jyoti by Affordable Lighting for All
    -          भारताची ही योजना मलेशियाने आपल्या मेलका या राज्यात लागू केली.

    w  चीन  रोमनायझेशनचे जनक झोयू योऊग्वान्ग यांचे निधन
    -          आधुनिक चीनच्या पिनयीन रोमनायझेशन प्रणालीचे जनक झोयू योऊग्वान्ग यांचे वयाच्या 111 व्या वर्षी निधन झाले. चीनमधील अखेरच्या साम्राज्य घराणेशाहीच्या राजवटीत 1906 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. शांघायमधील सेंट जॉन विध्यपीठात पाश्चिमात्य शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत वॉल स्ट्रीट येथे काम केले.

    w  भारताचा पहिला हायपरलूप प्रकल्प :-
    -          भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प आंध्र प्रदेश मध्ये सुरू करण्यात येणार आहे.
    -          हा प्रकल्प विजयवडा आणि अमरावतीला जोडेल.
    -          यासाठी आंध्रप्रदेश इकनॉमिक डेवलपमेंट बोर्डने हायपरलोप ट्रांसपोर्टेशन टेक्नॉलॉजीजशी सामनजस्य करार केला आहे.
    काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान ?
    हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या ट्यूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या ट्यूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे ट्यूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरुन धावतील. ट्यूबमध्ये हवे प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करु शकतात. ३० सेकंदानंतर प्रत्येक कॅप्सूल सोडता येईल असा दावा कंपनीच्या अधिका-यांनी केला आहे. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हायपरलूप कंपनीने भारतात हा प्रकल्प राबवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

    w  विवेक गोएंका :-
    -          एक्सप्रेस ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
    -          प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (पीटीआय) अध्यक्षपदी एकमताने निवड
    -          एन. रवी यांची उपाध्यक्षपदी निवड. ते द हिंदूचे माजी मुख्य संपादक आहेत.
    -          पीटीआय – भारतातील सर्वांत मोठी न्यूज एजन्सी. मुख्यालय – नवी दिल्ली.

    w  इंदर जीत सिंग :-
    -          वरिष्ठ आयएएस अधिकारी
    -          नॅशनल अथॉरिटी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शनच्या (एनएसीडब्ल्यूसी) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार त्यांना दिला
    -          केरळ केडरच्या १९८५च्या बॅचचे आयएएस
    -          एनएसीडब्ल्यूसी – स्थापना : एप्रिल  २०१७

    w  आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन :-
    -          दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
    -          उद्देश :- व्यक्ती, समाज आणि समुदायांसाठी साक्षरतेचे महत्व अधोरेखित करणे.
    -          यूनेस्कोद्वारा १९६६ मध्ये स्थापना
    -          २०१७ ची संकल्पना :- डिजिटल जगातील साक्षरता (Literacy in a digital world)

    w  रोहिंग्यावरील बाली घोषणपत्र :-
    -          इंडोनेशियामध्ये जारी करण्यात आलेल्या बाली घोषणापत्राचा भाग होण्यास भारताने नकार दिला आहे.
    -          म्यानमारला अस्थिर देश म्हणून संबोधित करणार्‍या व‌र्ल्ड पार्लियामेंट्रीच्या या प्रस्तावाला भारताने नाकारले.
    -          भारताने म्हटले आहे की म्यानमारचे संकट हे आंतरिक असून ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उचलून धरण्याची गरज नाही.

    w  फेम इंडिया योजना :-
    -          सरकारने फेम इंडिया योजनेला सहा महीने मुदतवाढ दिली आहे.
    -          Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles (FAME)
    -          इलेक्ट्रिक आणि हायब्रीड गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
    -          योजनेचा पहिला टप्पा :- एप्रिल २०१५ ते मार्च २०१७
    -          दूसरा टप्पा :- सप्टेंबर २०१७ - ३१ मार्च २०१८

    w  भारत पेट्रोलियम :-
    -          भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) या कंपनीला महारत्न दर्जा देण्यात आला आहे.
    -          सध्या या कंपनीला नवरत्न दर्जा आहे.
    -          महारत्न दर्जा असलेली ८ वी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
    -          २००९ पासून हा दर्जा दिला जातो

    w  नाग क्षेपणास्त्र :-
    -          डीआरडीओकडून नाग क्षेपणास्त्राची राजस्थानमध्ये यशस्वी चाचणी
    -          संपूर्णत: स्वदेशी बनावटीचे रणगाडा विरोधी (अँटी टॅंक मिसाईल)
    -           हे गाईडेड क्षेपणास्र 4 कि.मी. अंतराच्या परिसरात असलेल्या शत्रूच्या रणगाड्यावर अचूकपणे आदळून त्याचा विध्वंस करू शकते.
    -          याला HET असेही म्हणतात. HET हे हाय एक्‍सप्लोसिव्ह अँटी टॅंक मिसाईलचे संक्षिप्त रूप आहे.
    -          नाग क्षेपणास्राचे आवरण फायबर ग्लासचे आहे. त्याचे वजन सुमारे 42 किलोग्रॅम आहे.
    -          नाग क्षेपणास्र सोडताना जेव्हा ध्रुव हेलिकॉप्टरचा उपयोग करतात तेव्हा हेलिना (HelinA) असा शब्दप्रयोग केला जातो.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad