• New

    पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना :-

    १) संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यावरण कार्यक्रम [United Nations Environment Programme (UNEP)] :-
    » संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत झाली.
    » याचे प्रमुख कार्यालय केनियाची राजधानी नरोबी येथे आहे.
    » याचे प्रमुख कार्य म्हणजे- संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्फत पर्यावरणावर विविध परिषदांचे आयोजन करणे, त्यातून येणाऱ्या शिफारसींना व्यावहारिक रूप देते.

    दोहा परिषद :- 
    » कतारची राजधानी दोहा येथे ८ डिसेंबर २०१२ रोजी वातावरण बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण परिषद झाली.
    » यामध्ये क्योटो प्रोटोकॉलच्या जागी जागतिक सहमती असलेल्या करारास २०१५ पर्यंत अंतिम रूप देण्यात येईल हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.

    २) युनेस्कोचा मानव आणि जिवावरण कार्यक्रम:- (Man and Biosphere Programme) :- 
    »  मानव व जिवावरण (Man and Biosphere) यांच्यात जागतिक स्तरावर सुधारणा करण्यासाठी युनेस्कोद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात १९७० मध्ये करण्यात आली.

    ३) जागतिक वन्यजीव कोष (World Wildlife Fund) WWF :- 
    »  वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या हेतूने १९६१ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली
    » या संस्थेचे मुख्य कार्यालय स्वित्झरलँड येथे आहे.

    पर्यावरण रक्षणाचे कार्य करणाऱ्या भारतातील महत्त्वपूर्ण संस्था :-
    १) बॉटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया  (BSI ) :-
    »  या संस्थेची स्थापना १८९० साली कोलकाता येथे करण्यात आली, १९३९ सालानंतर काही वर्षांसाठी ही संस्था बंद होती, मात्र १९५४ साली ही पुन्हा सुरू करण्यात आली.

    २) झुलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (ZSI) :-
    »  या संस्थेची स्थापना १९१६ मध्ये करण्यात आली. या संस्थेमार्फत प्राण्यांचे वर्गीकरण व पर्यावरणासंबंधी मूलभूत संशोधन केले जाते.

    ३) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) :-
    »  ही निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्य व संशोधन करणारी सर्वात पुरातन बिगरशासकीय संस्था आहे.
    »  स्थापना:-  १८८३ मुबंई येथे
    »  या संस्थेमार्फत ‘हॉर्नबिल’ हे लोकप्रिय मासिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री’ हे संशोधनपर मासिक प्रकाशित होते.

    इतर महत्त्वपूर्ण संस्था 
    १. सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हिरॉनमेंट – नवी दिल्ली
    २. सेंटर फॉर एन्व्हिरॉनमेंट एज्युकेशन – अहमदाबाद
    ३. सलीम अली सेंटर फॉर ऑरनिथॉलॉजी अ‍ॅण्ड नॅचरल हिस्ट्री – कोईमतूर
    ४. वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया – डेहराडून
    ५. आशिया खंडातील पहिले मगर प्रजनन व संशोधन केंद्र (क्रोकोडाइल बॅक ट्रस्ट)- मद्रास 


    संदर्भ :- लोकसत्ता 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad