• New

    चालू घडामोडी प्रश्नसंच : २३ नोव्हेंबर २०१७

    प्र.१) खालीलपैकी कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनचा (Indian Mountaineering Foundation) जीवनगौरव पुरस्कार २०१७ प्राप्त झाला आहे?
    a) अजित पै 
    b) ताराशंकर बांदोपाध्याय 
    c) माणिक बॅनर्जी 
    d) सुमित घोष 

    प्र. 2) प्रसिद्ध पत्रकार सुदीप दत्त भौमिक यांना 21 नोव्हेंबर रोजी गूढ परिस्थितीमध्ये गोळ्या घालून ठार मारले गेले. त्यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा:
    a) ते त्रिपुरा या राज्याचे रहिवासी होते.
    b) ते स्थानिक भाषेतील दैनिक 'Syandan Patrikaand' मध्ये काम करीत होते.
    पर्याय:
    1) फक्त a बरोबर
    2) फक्त b बरोबर 
    3) a व b दोन्ही बरोबर 
    4) a व b दोन्ही चूक 

    प्र. 3) चुकीचे विधान ओळखा:
    a) दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक बालदिन साजरा केला जातो.
    b) 'इन्व्हेस्ट इन एज्यूकेशन' ही यावर्षीची संकल्पना होती.
    c) 1954 साली सार्वत्रिक बालदिनाची स्थापना झाली.
    पर्यायी उत्तरे:
    1) फक्त a
    2) फक्त b 
    3) फक्त c
    4) यापैकी नाही 

    प्र.4) किशोरवयीन आणि एचआयव्हीसाठी यूएनएड्स विशेष राजदूत म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या संशोधकाची नेमणूक करण्यात आली आहे?
    a) थॉमस कैलाठ 
    b) क्वारिशा अब्दूल करीम
    c) स्वेतक पटेल
    d) अजय अग्रवाल

    प्र. 5) उद्योजकतेला प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या बँकेने 'पट्टाभी सीतारमैय्या - सेल्फ बिजनेस ग्रुप' ही योजना सुरू केली आहे?
    a) भारतीय स्टेट बँक 
    b) आंध्रा बँक
    c) पंजाब नॅशनल बँक 
    d) बँक ऑफ इंडिया 

    प्र. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने युरोपियन पुनर्निर्माण आणि विकास बँकेसाठी (ईबीआरडी) भारताच्या सदस्यतेला मंजुरी दिली आहे. त्यासंबंधित पुढील विधांनांचा विचार करा.
    a) या बँकेची स्थापना 1991 साली झाली.
    b) या बँकेचे मुख्यालय लंडन या शहरात आहे.
    c) या बँकेचे प्रमुख सुमा चक्रवर्ती हे आहेत.
    वरीलपैकी कोणते विषण बरोबर आहे?
    1) फक्त a आणि b
    2) फक्त b आणि c
    3) फक्त a आणि c
    4) a, b आणि c 

    प्र. 7) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यासंबंधित चुकीचे विधान ओळखा.
    1) संविधान कलम 280 नुसार वीत्त आयोगाची स्थापना केली जाते.
    2) 1 एप्रिल 2015 पासून पाच वर्षाच्या कलावधीसाठी हा आयोग शिफारसी करेल.
    3) राष्ट्रपती वीत्त आयोगाची स्थापना करतील अशी घटनेत तरतूद आहे.
    4) यापूर्वीच्या 14 व्या वीत्त आयोगाचे अध्यक्ष वाय. व्ही. रेड्डी हे होते.

    प्र.8)  'सारंगखेडा चेतक महोत्सव' हा राज्यातील प्रसिद्ध अश्व मोहत्सव कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो?
    1) नंदुरबार 
    2) नाशिक 
    3) सोलापूर 
    4) यापैकी नाही 

    प्र.9) भारतीय लष्कराच्या ताफ्यातील महत्त्वाचे क्षेपणास्त्र असलेल्या ‘ब्रम्होस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे हवाई दलाच्या सुखोई-एमकेआय या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली. ब्रम्होस हे क्षेपणास्त्र कोणत्या देशांनी मिळून विकसित केले आहे?
    a) भारत-इस्राइल
    b) भारत - रशिया
    c) इस्राइल - रशिया 
    d) भारत - अमेरिका  

    Ans:
    1) माणिक बॅनर्जी 2) a व b दोन्ही बरोबर 3) फक्त b (यावर्षीची संकल्पना - किड्स टेक ओव्हर) 4) क्वारिशा अब्दूल करीम 5) आंध्रा बँक 6) a, b आणि c 7) दुसरे विधान चुकीचे आहे. 8) नंदुरबार 9) भारत - रशिया

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad